व्यवसाय व्यावसाईक डावपेच शेती दुकान

तीन लाखात मला कुठलाही उद्योग चालू करायचा आहे तर कुठला करू शेळीपालन केलेले चांगले कि किराणा दुकान मला दोन एकर शेतपण आहे शेळीपालन फायद्यात राहील कि किराणा दुकान ?

5 उत्तरे
5 answers

तीन लाखात मला कुठलाही उद्योग चालू करायचा आहे तर कुठला करू शेळीपालन केलेले चांगले कि किराणा दुकान मला दोन एकर शेतपण आहे शेळीपालन फायद्यात राहील कि किराणा दुकान ?

9
शेळी पालन हा एक विशेषतः शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून आहे...
तुमच्या तिन लाख बजेट नुसार तुम्ही शेळीपालन व्यवसाय करू शकता...
कारण या व्यवसाय मध्ये कमी भांडवल लागते...
नेटवर शेळी पालन विषयी अनेक माहिती मिळून जाईल...
आणि
किराणा दूकान देखील फायद्याचे असते...
पण किराणा दुकान साठी तशी जवळ असलेली वस्ती, भरपूर रहिवाशी, दर्जेदार माल तसेच स्वस्त वस्तू, अनेक विविध दररोज उपयोगात येणारे सामान, या सर्व गोष्टी आणि मालाची प्रति देवाण घेवाण, वस्तु विकण्यासाठी केलेल्या आकर्षक जाहिराती, मेहनत अधिक लागते... आणि मग नंतर हळूहळू सर्व सुरळीत होऊन काम जमायला लागते...

शेळीपालन उद्योग देखील फायद्याचे राहील...
पण तत्पूर्वी पूर्ण अभ्यास करुन माहिती मिळवून व्यवसाय करा...
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 458520
7
आपण कोणत्या ठिकाणी राहता याचा विचार करून उद्योग सुरू करा.
शक्यता :-
जर तुम्ही खेड्यात राहत असाल तर आणि आजूबाजूच्या परीसरात किराणा दुकान नसेल किंवा कमी प्रतिसाद असणारा किराणा दुकान असेल तर आपण किराणा दुकान टाकण्यास हरकत नसावी सोबत स्टेशनरी सामान व मोबाईल रिचार्ज ही फायदेशीर आहे.हा व्यवसाय शहरातही टाकू शकता.
किंवा शेळी पालन विषयी माहिती असल्यास शेळी पालन खेड्यात किंवा शहरात करता येईल.
महत्वाचे म्हणजे खेडे शहरांच्या जवळ असल्यास वाहतूक खर्च कमीत कमी होतो.
शेळी पालनातील माहिती हवी असल्यास  विकासपीडिया या लिंक वर जाणे.
यामध्ये शेळी व त्याची माहिती, शेड कसा करावा, पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात त्यांचे संगोपन कसे करावे,त्यांना होणारे आजार व उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
(सदरील उत्तर हे पशुधन व्यवस्थापक (स्वतः मी) यांनी दिले आहे.संबंधित असलेल्या व्यक्ती च्या  {प्रश्न विचारनारा }व्यवसायात झालेला नफा व तोटा यांच्याशी माझा काहीही संबंध नाही)
विकासपीडिया
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 5940
4
शेळीपालन फायद्यात राहील
पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे शेती आहे
शेळीपालन केल्याने रोख पैसे जास्त मिळतील
किराणा दुकान टाकल्यास उदारी जास्त जाऊन तोटा संभवतो
शेळीपालनासाठी पंचायत समितीत अधिक माहिती मिळेल
शेळी पालनातं कमी रिस्क आणि जास्त फायदा आहे
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 110

Related Questions

शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी?
सहकारी शेती पध्दती विषयी सविस्तर लिहा.?
शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या?
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शेती सुधार व सहकारी चळवळी विषयी विचार स्पष्ट करा?
केली पण शेती विनायक पाटील या लेखाचा समारोप?
. ' केली पण शेती ' या लेखातील गांधीजींचे शेती विषयक विचार स्पष्ट करा.?
'केली पण शेती' या लेखाचा आश्रय तुमाया शब्दात लिहा?