सुट्ट्या

रविवार च्या सुट्टीबद्दल सर्व माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

रविवार च्या सुट्टीबद्दल सर्व माहिती मिळेल का?

15
रविवार हा आठवड्यातील एक वार आहे. सोमवारपासून मोजला तर हा आठवड्यातील शेवटचा, म्हणजे सातवा दिवस येतो. भारतामध्ये हा ’रवि’चा म्हणजे सूर्याचा दिवस समजला जातो. त्यामुळे याला आदित्यवार (आदित्य==सूर्य) किंवा बोली भाषेत आइतवार म्हटले जाते; हिंदीत इतवार म्हणतात आणि इंग्रजीत सन्‌डे.

ज्या ज्या देशावर कधी काळी ब्रिटिश सत्ता होती त्या त्या देशात रविवार हा सुटीचा दिवस असतो. शिक्षणसंस्था, कार्यालये आणि बँका या दिवशी बंद असतात.

एके काळी भारतात कामगारांना रविवारची सुटी नसे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत इ.स. १८८४मध्ये ’बाँबे मिल हँड्स’ ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यांनी त्या काळच्या फॅक्टरी कमिशनकडे अनेक मागण्या केल्या. त्यातली रोजच्या कामातली अर्ध्या तासाची जेवणाची सुटी आणि रविवारची साप्ताहिक सुटी या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या. त्यासाठी २४ एप्रिल १८९० रोजी हजारो कामगारांचा मोर्चा निघाला होता. अखेर १० जून १८९० पासून दर रविवारची सुटी देण्याचे गिरणी मालकांनी मान्य केले. २०१५ साली १० जूनला या रविवारच्या सुटीचा १२५वा वर्धापन दिन साजरा झाला.
उत्तर लिहिले · 23/7/2018
कर्म · 9340
2
उत्तर ->  *🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐* _📱+919168390345_ *®रसुल खडकाळे* :::::::::::::::::::::::::::::::::::::: *_''रविवार''च्या सुट्टीची अशी ...
https://www.uttar.co/answer/5b1d5b7d29e3e113f07e8d98
उत्तर लिहिले · 7/8/2019
कर्म · 569205

Related Questions

मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
अशी कंपनी जेथे सुट्टी घेतल्यावर पैसे मिळतात?
लाईनमनला रविवारी सुट्टी असते का ?
रविवारच्या सुट्टी मागचा काय इतिहास आहे?
जर आपण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सुट्टीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कुठे जावे भारतात आणि काय काय विचारावे लागेल हॉलिडे पैकेजसाठी ?
माझा कॉलेजला 1 ते 2 महीने सुट्टी आहे तर मी या सुट्टीमध्ये काय काय करू शकतो ?
मी आता पेपर दिले आहे मला आता सुट्ट्या लागलेल्या आहे माझं वय 18 आहे तर मी कोणते कोर्स करून घेऊ ?