Topic icon

सुट्ट्या

4
जर आपण विज्ञानाचा योग्य वापर केला तर त्यामुळे आपल्याला भरपूर सारे फायदे होऊ शकतात पण जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर खूप सारी अशी जीवित हानी होऊ शकते याचा अनुभव आपण मागील काही वर्षात घेतलाच आहे कारण विज्ञानाचा दुरुपयोग करून मध्ये कोरणा निर्मिती करण्यात आली त्याचे आपण सर्वांनीच बघितले आहेतसाच ज्ञानाचा दुरुपयोग करून अनुबॉम सारख्या घातक अशा बॉम्बचा निर्माण करण्यात आला आहे जो एका क्षणार्धात कित्येक जीवित हानी करू शकतोम्हणूनच जर आपण विज्ञानाचा सुयोग्य प्रकारे वापर केला तरच मानवी जास्तीचे कल्याण होऊ शकते 
उत्तर लिहिले · 10/10/2022
कर्म · 90
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
14
🤨 _*भारीच! सुट्टी एन्जॉय करा आणि मिळणार बोनस*_


_एक सॉफ्टवेअर कंपनी अशीही आहे जी काम करण्याबद्दल नव्हे तर आपल्या कर्मचार्‍यांनी सुट्टी पूर्ण एन्जॉय करावी यासाठी भलाथोरला बोनस देते. जे कर्मचारी सुटी पुरेपणाने उपभोगणार नाहीत, त्यांचा बोनस कापलाही जातो. या कंपनीचे नांव आहे फूलकॉन्ट्रॅक्टस आणि यूएनमधील डेनेवर येथे ही कंपनी आहे._

_सुटटी घ्यावी म्हणून येथे 7,500 डॉलर्स म्हणजे 5 लाख रूपये बोनस दिला जातो मात्र त्यासाठी एक नियमही आहे. कंपनीची फायनान्स आणि ऑपरेशन डायरेक्टर जेनेट रसल सांगते, मी सुटीवर जाते तेव्हा मोबाईलमधून ईमेल अ‍ॅप डिलीट करून टाकते व लॅपटॉप एका कोपर्‍यात टाकून देते. कारण सुटीवर असताना कंपनीचे कोणतेही काम करायचे नाही हीच आमची पॉलिसी आहे._

_चार वर्षांपूर्वी आमची कंपनी स्थापन झाली आणि येथे कर्मचार्‍याची सुटी गंभीरतेने घेतली जाते. प्रत्येक कर्मचार्‍याला त्यासाठी वर्षाला भलाथोरला बोनस दिला जातो. नियम तोडणे म्हणजे बोनसच्या रकमेला मुकणे आहे._

_कंपनीचे बिझिनेस डेव्हलपमेंट संचालक ड्रीऊ लॉरेन्स सांगतात, सुटीसाठी बोनस ही कल्पना आम्हाला खूपच फायदेशीर ठरते आहे. कारण सुटी एन्जॉय करून परत कामावर हजर झाले की आमचे कर्मचारी नवीन उर्जेसह येतात आणि दिलेले कामाचे टार्गेट पूर्ण शक्तीनिशी काम करून पूर्णही करतात असा आमचा अनुभव आहे._
उत्तर लिहिले · 18/3/2019
कर्म · 569205
15
रविवार हा आठवड्यातील एक वार आहे. सोमवारपासून मोजला तर हा आठवड्यातील शेवटचा, म्हणजे सातवा दिवस येतो. भारतामध्ये हा ’रवि’चा म्हणजे सूर्याचा दिवस समजला जातो. त्यामुळे याला आदित्यवार (आदित्य==सूर्य) किंवा बोली भाषेत आइतवार म्हटले जाते; हिंदीत इतवार म्हणतात आणि इंग्रजीत सन्‌डे.

ज्या ज्या देशावर कधी काळी ब्रिटिश सत्ता होती त्या त्या देशात रविवार हा सुटीचा दिवस असतो. शिक्षणसंस्था, कार्यालये आणि बँका या दिवशी बंद असतात.

एके काळी भारतात कामगारांना रविवारची सुटी नसे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत इ.स. १८८४मध्ये ’बाँबे मिल हँड्स’ ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यांनी त्या काळच्या फॅक्टरी कमिशनकडे अनेक मागण्या केल्या. त्यातली रोजच्या कामातली अर्ध्या तासाची जेवणाची सुटी आणि रविवारची साप्ताहिक सुटी या दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या. त्यासाठी २४ एप्रिल १८९० रोजी हजारो कामगारांचा मोर्चा निघाला होता. अखेर १० जून १८९० पासून दर रविवारची सुटी देण्याचे गिरणी मालकांनी मान्य केले. २०१५ साली १० जूनला या रविवारच्या सुटीचा १२५वा वर्धापन दिन साजरा झाला.
उत्तर लिहिले · 23/7/2018
कर्म · 9340