सुट्ट्या नोकरी

अशी कंपनी जेथे सुट्टी घेतल्यावर पैसे मिळतात?

2 उत्तरे
2 answers

अशी कंपनी जेथे सुट्टी घेतल्यावर पैसे मिळतात?

14
🤨 _*भारीच! सुट्टी एन्जॉय करा आणि मिळणार बोनस*_


_एक सॉफ्टवेअर कंपनी अशीही आहे जी काम करण्याबद्दल नव्हे तर आपल्या कर्मचार्‍यांनी सुट्टी पूर्ण एन्जॉय करावी यासाठी भलाथोरला बोनस देते. जे कर्मचारी सुटी पुरेपणाने उपभोगणार नाहीत, त्यांचा बोनस कापलाही जातो. या कंपनीचे नांव आहे फूलकॉन्ट्रॅक्टस आणि यूएनमधील डेनेवर येथे ही कंपनी आहे._

_सुटटी घ्यावी म्हणून येथे 7,500 डॉलर्स म्हणजे 5 लाख रूपये बोनस दिला जातो मात्र त्यासाठी एक नियमही आहे. कंपनीची फायनान्स आणि ऑपरेशन डायरेक्टर जेनेट रसल सांगते, मी सुटीवर जाते तेव्हा मोबाईलमधून ईमेल अ‍ॅप डिलीट करून टाकते व लॅपटॉप एका कोपर्‍यात टाकून देते. कारण सुटीवर असताना कंपनीचे कोणतेही काम करायचे नाही हीच आमची पॉलिसी आहे._

_चार वर्षांपूर्वी आमची कंपनी स्थापन झाली आणि येथे कर्मचार्‍याची सुटी गंभीरतेने घेतली जाते. प्रत्येक कर्मचार्‍याला त्यासाठी वर्षाला भलाथोरला बोनस दिला जातो. नियम तोडणे म्हणजे बोनसच्या रकमेला मुकणे आहे._

_कंपनीचे बिझिनेस डेव्हलपमेंट संचालक ड्रीऊ लॉरेन्स सांगतात, सुटीसाठी बोनस ही कल्पना आम्हाला खूपच फायदेशीर ठरते आहे. कारण सुटी एन्जॉय करून परत कामावर हजर झाले की आमचे कर्मचारी नवीन उर्जेसह येतात आणि दिलेले कामाचे टार्गेट पूर्ण शक्तीनिशी काम करून पूर्णही करतात असा आमचा अनुभव आहे._
उत्तर लिहिले · 18/3/2019
कर्म · 569225
0

अशी एक कंपनी आहे जी सुट्टी घेतल्यावर पैसे देते, त्या कंपनीचे नाव 'नेटफ्लिक्स' (Netflix) आहे.

नेटफ्लिक्स (Netflix):

  • नेटफ्लिक्स कर्मचाऱ्यांसाठी 'अनलिमिटेड व्हेकेशन पॉलिसी' (Unlimited Vacation Policy) देते.
  • या पॉलिसी अंतर्गत, कर्मचारी वर्षातून कितीही दिवस सुट्टी घेऊ शकतात आणि त्यांचे वेतन (Salary) कापले जात नाही.
  • कंपनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन (Evaluation) त्यांच्या वेळेनुसार नाही, तर त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार करते.

संदर्भ: नेटफ्लिक्स अधिकृत वेबसाइट (Netflix Official Website)


टीप: कंपन्यांच्या धोरणांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे, कृपया खात्री करून घ्यावी.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 740

Related Questions

शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्षभराचे नियोजन (कॅलेंडर) सुट्ट्या, परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे कसे करावे?
मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
महिन्याचा पगार 4500 आहे, तर 13 दिवसांचा किंवा ऑड डे चा पगार कसा काढावा? किंवा सुट्ट्या cut (कट) केलेला पगार कसा काढावा?
2020 मधील सुट्ट्या?
ITI अप्रेंटिसशिप मध्ये किती सुट्ट्या घेऊ शकता? ॲक्ट 1961 ची माहिती द्या?
एखादी खाजगी कंपनी 'काम कमी आहे' या सबबीखाली कायमस्वरूपी कामगारांना सुट्ट्या घ्यायला सांगत असेल, तर काय करू शकतो?
मला कंपनीचे नियम सांगा, जसे की ८ तास काम, सकाळी वेळेवर जाणे, महिन्यामध्ये किती सुट्ट्या, CL, PL आणि नोकरी जॉईन केल्यावर किती दिवसांनी बोनस मिळतो, अशा प्रकारे सर्व कंपनीचे नियम सांगा?