औषधे आणि आरोग्य मुले घरगुती उपाय आरोग्य

लहान मुलांना जास्त ताप आल्यास काही घरगुती उपाय आहेत का? तसेच, डॉक्टरांकडे दाखवले आहे, पण मुलांना अचानक रात्री ताप आल्यास काय करावे?

3 उत्तरे
3 answers

लहान मुलांना जास्त ताप आल्यास काही घरगुती उपाय आहेत का? तसेच, डॉक्टरांकडे दाखवले आहे, पण मुलांना अचानक रात्री ताप आल्यास काय करावे?

6
बाळांसाठी तापावर घरगुती उपाय | Home Remedies For Fever In Babies

ताप हे एक मोठ्या आजाराचे संकेत हि होवू शकते. परंतु ताप येणे याचा अर्थ मोठ्या आजाराशी संबंध जोडला जावू नये.

बाळामध्ये बरेचदा सांसर्गिक संक्रमणामुळे ताप – Home Remedies For Fever In Babies येतो. बरेचदा दातांचे दुखण्यामुळे बाळामध्ये ताप येतो. जेव्हाही आपल्या शरीराचे तापमान वाढते. हे एक चिंतेचा विषय बनू शकते. त्यामुळे मनात अनेक दुविधा उत्पन्न होतात.

अशावेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषधी वेळेवर घेणे फार जरुरी आहे.

बाळांसाठी तापावर घरगुती उपाय – Home Remedies For Fever In Babies

नवजात बाळाला ताप आल्यास आपण डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांसह काही घरगुती उपायही करू शकतो.

खाली नवजात शिशूला तापिमध्ये औषधींचे काही उपाय दिले आहेत.

१) थंड पट्ट्या

आपल्या शिशूला जर ताप आला आहे असे जाणवल्यास एका नरम कपड्याला पाण्यात भिडवून त्यास शिशूच्या कपाळावर ठेवावे. पट्टी थोडी कोरडी झाल्यास परत २-3 वेळा पट्टी पाण्यात भिजवून ठेवावी. यामुळे शिशूचा ताप कमी होईल.

सूचना – पाणी फ्रीजमधील नसावे. त्यामुळे बाळाचा ताप वाढू शकतो.

२) कोमट पाण्यानी स्नान

बाळास ताप असतांना कोमट पाण्यातच आंघोळ करावी तसेच त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित होते.

– ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या शिशूस नरम कपड्याने कोमट पाण्यात भिजवून अंग चांगले पुसून काढावे. यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळेल.

– ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या शिशूस कोमट पाण्याने रोज आंघोळ करावी.
सूचना – जास्त गरम किंवा थंड पाणी आंघोळीस घेवू नये. असे केल्यास ताप आणखी वाढतो.

3) स्तनपान

६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या शिशूसाठी आपल्या मातेचे स्तनपान हे एक सर्वोत्तम औषध व टॉनिक मानले जाते. त्यात विविध रोगांशी लढण्याचि मातेच्या स्तनातील दुधातून मिळते.

त्यामुळे तापीत शुशुस स्तनपान करणे फार जरुरीचे व त्यास बहुपयोगी ठरते. यातून त्यास आवश्यक सर्व पोषके मिळतात. त्यामुळे शिशु विविध रोगांशी दोन हात करण्यास सक्षम असते.

-स्तनाचे दूध सहजतेने पचते व त्यामुळे बाळाची भूक वाढते. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

– बाळ स्तनाचे दूध पीत नसल्यास स्तनाचे दूध भांड्यात काढून बाळास चमच्याने पाजावे.

– ६ महिन्यांपर्यंत दररोज २-3 वेळा किंवा बालकाच्या रडल्यावर त्यास पाजावे.
उर्वरित माहिती खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता,

👇
.
"लहान बाळ"

आणि लहान मुलांना ताप आल्यास त्यावर उपाय
खालील लिंक पहा,

👇
.
"आजीबाईचा बटवा" आयुर्वेदिक उपाय

👇
     मोठ्यांना

"ताप आल्यावर काय करावे"

जर तुम्हाला थोडा फार ताप असेल तर डॉक्टर कडे जायची गरज नाही  तापाचे प्रकार खूप सारे आहेत . आज आम्ही आपल्याला ताप आल्यावर काय करावे मध्ये घरगुती उपचार करून सुद्धा तुम्ही ताप घालवू शकतात.

ताप येण्याची सामान्य लक्षणे :

शरीर गरम होणे, घाम न येणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, काहीही करायची इच्छा न होणे, इत्यादी लक्षणे दिसून येतात.

अंगावर ताप असल्यास काय खावे:

मूग, मसूर, साळीच्या लाह्या, दुधी, कारले, पालक, तांदूळ, मोसंबी, डाळिंब, पपई, तूप, धने, जिरे, गरम पाणी इत्यादी सेवन करावे

ताप असल्यास काय खाऊ नये:

गहू, चवळी, मटार, पावटा, सिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, दही, अननस, आंबा, चिकू, तळलेले व जड पदार्थ खाण्याचे टाळावे.

ताप असल्यास खालील दिलेले घरेलू उपचार करावे.

ताप आल्यावर काय करावे घरगुती उपचार:

*  ताप आल्यावर जीभ पांढरी होऊन आपल्याला भूक लागत नाही. अश्या वेळी मध घालून तुळशीच्या पानांचा अर्धा चमचा रस सकाळ संध्याकाळ घ्यावा. याने तोंडाला चव येईल आणि भूक लागेल.
*  पाळीचा ताप येत असल्यास ताप येण्याचा अगोदर तीन तास परिजक्ताची पाने ठेचून तयार केलेल्या सुपारीच्या आकाराची गोळी गुलासह खावी. याने ताप येत नाही व आल्यास लवकर बरा होतो.
*  अपचनामुळे ताप आल्यास पाव चमचा जिरेपूड व पाव चमचा धणेपूड कोमट पाण्यात दिवसातून चार वेळा घ्यावी. ताप लवकर बरा होईल.
*  ताप नसताना अंघोळ न करता रिठे व कडुलिंब घालून उकलेल्या कोमट पाण्याने अंग पुसून घ्यावे. असे केल्याने ताप वाढत नाही.
*  खुप ताप असल्यास कपाळावर मिठाच्या पानाच्या किंवा थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्या, हात पायाला कांद्याचा रस चोळावा. ह्या उपायाने ताप बरा होण्यास मदत होते. तरीही ताप कमी न झाल्यास थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे.
*  ताप आल्यावर सर्वप्रथम लंघन करावे. काहीही न खाता केवळ कोमट पाणी तहान लागेल तसे प्यावे. फार भूक लागत असल्यास सालीच्या लाह्या किंवा तांदूळ मुगाची मऊ खिचडी खाऊ घालावी.
*  दिवसभर प्यायचे पाणी वाळा, चंदन, व सुंठ घालून उकळून घेतलेले असावे.

याशिवाय ताप आलेला असताना जड, तळलेले, आंबवलेले पदार्थ, खाऊ नये. व्यायाम, मैथुन, व रात्री जागरण टाळावे. आणि पुरेपूर विश्रांती घ्यावी. ताप आल्यावर काय करावे मध्ये आम्ही आमच्या पद्धतीनेकाही घरगुती उपचार सांगितले आहेत त्यामुळे जर आपला ताप कमी नाही होत असेल तर आपल्याला लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे.
"लहान बाळ"
"आजीबाईचा बटवा" आयुर्वेदिक उपाय
उत्तर लिहिले · 20/2/2018
कर्म · 28530
0
नक्की वाचा...
एक ते सहा महिन्याच्या बाळाला ताप आल्यास काय करावे?
उत्तर लिहिले · 2/8/2024
कर्म · 70
0
लहान मुलांना जास्त ताप आल्यास काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे:
  • ताप कमी करण्यासाठी उपाय:
    • पाण्याचे स्पंजिंग (Sponge Bathing): कोमट पाण्याने (खूप थंड नाही) स्पंजने किंवा स्वच्छ কাপड्याने बाळाला पुसून घ्या. विशेषतः बगल, कपाळ आणि जांघेजवळ पुसा.
    • पुरेसा आराम: बाळाला खेळू न देता आराम करण्यासाठी शांत ठेवा.
    • पातळ कपडे: जाड कपडे न घालता हलके आणि पातळ कपडे घाला.
  • आहार आणि द्रव:
    • पुरेसे पाणी: तापामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे बाळाला पुरेसे पाणी, पातळ रस, नारळ पाणी किंवा ओआरएस (ORS) द्या.
    • हलका आहार: सहज पचेल असा आहार द्या, जसे की मऊ भात, खिचडी किंवा डाळ-भात.
  • इतर उपाय:
    • हवा खेळती ठेवा: खोलीतील हवा खेळती ठेवा जेणेकरून तापमान नियंत्रित राहील.
रात्री अचानक ताप आल्यास काय करावे:
  • डॉक्टरांनी दिलेले औषध: डॉक्टरांनी शिफारस केलेले पॅरासिटामोल (Paracetamol) किंवा आयबुप्रोफेन (Ibuprofen) तातडीने द्या. औषधाची मात्रा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच असावी.
  • ताप मोजा: डिजिटल थर्मामीटरने बाळाचा ताप तपासा आणि नोंद करा.
  • स्पंजिंग: कोमट पाण्याने बाळाला पुसून घ्या.
  • डॉक्टरांशी संपर्क: जर ताप खूप जास्त असेल आणि औषध देऊनही कमी होत नसेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
सूचना:
  • लहान मुलांना Aspirin देऊ नका: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे देऊ नका.
  • डिहायड्रेशन टाळा: मुलांना पुरेसे द्रवपदार्थ द्या.
जर ताप खूप जास्त असेल, बाळ सुस्त वाटत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा इतर गंभीर लक्षणे दिसत असतील, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 840

Related Questions

केसतोडा यावर औषध कोणते?
ऍसिडिटीवर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर सोपे घरगुती उपाय काय आहेत?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकर्णाचे चट्टे उठले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?