पैसा प्लास्टिक मनी

प्लास्टिक मनी बद्दल माहिती मिळेल का ?

2 उत्तरे
2 answers

प्लास्टिक मनी बद्दल माहिती मिळेल का ?

12
_प्लॅस्टिक मनी म्हणजे नेमका कोणता?

एटीएम, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या तीनही प्रकारांना ‘प्लॅस्टिक मनी’ म्हणतात. फक्त या तिघांच्या स्वरूपामध्ये साम्य असलं तरी त्यांचे उपयोग, वैशिष्ट्य आणि मर्यादा या सर्व बाबतीत या तिन्हींमध्येही फरक आहे.

*_पाहूया प्लास्टिक मनीचे प्रकार_*

👉 *_एटीएम_* :  एटीएम म्हणजे आॅटोमेटेड टेलर मशीन. याला ‘एनी टाइम मनी’ असेही म्हणतात. एटीएम कार्डाचा उपयोग एटीएममधून पैसे काढण्यापुरता मर्यादित आहे. हे कार्ड आपल्या ज्या खात्याशी जोडले आहे, त्यात जेवढे पैसे असतील तेवढेच आपण काढू शकतो. हे पैसे लगेचच आपल्या खात्यातून वळते होतात. व्यवहार पूर्ण करण्यासाठी एका विशिष्ट चार आकडी संख्येचा ‘पिन’ म्हणजेच  (Personal Identification Number)) चा वापर करावा लागतो.



👉 *_डेबिट कार्ड_* :  सेवांचं बिलं चुकतं करणारं आणि दुहेरी उपयोगाचं. त्याद्वारे एटीएम कार्डशी संबंधित असलेले सर्व व्यवहार तर करता येतातच; पण वस्तू खरेदी, हॉटेलचं बिल, सिनेमा, रेल्वे, प्रवासी बस, विमान यांची तिकिटं काढणं तसेच इतर काही सेवा घेणं अशा व्यवहारांसाठीही याचा उपयोग होतो. हे सर्व व्यवहार घरबसल्या आॅनलाइन पद्धतीनंही करता येतात. एटीएमप्रमाणेच हे कार्डही आपल्या खात्याशी जोडलेलं असतं आणि खात्यात जेवढी रक्कम शिल्लक आहे त्या मर्यादेपर्यंतच व्यवहार करता येतात. याचे व्यवहारही PIN वापरून करावे लागतात. मात्र याद्वारे जेव्हा आॅनलाइन व्यवहार केले जातात, तेव्हा आपल्या मोबाइलवर एक क्रमांक पाठवला जातो. त्याला ‘OTP’ (One Time Password) म्हणतात. हा ओटीपी वापरूनच आपण आॅनलाइन व्यवहार पूर्ण करू शकतो. या कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी आपल्याला सर्वसाधारणत: 1.36 टक्के ते 2.25 टक्के अधिक शल्क द्यावं लागतं. मात्र सर्वच आस्थापना हे शुल्क घेतात असं नाही. त्यामुळे अशा शुल्काबद्दल माहिती घेऊन मगच हे कार्ड वापरावं.

👉 *_क्रेडिट कार्ड _* :  क्रे डिट म्हणजे ‘पत’. जिला कार्ड द्यायचं ती व्यक्ती कुठे नोकरी करते, तिचा व्यवसाय काय, वार्षिक मिळकत किती, इत्यादी बाबींची चौकशी करून मगच बँका क्रे डिट कार्ड देतात. या कार्डावरसुद्धा किती रकमेपर्यंतचे व्यवहार व्हावेत यावर मर्यादा असते आणि वर उल्लेख केलेले निकष वापरून संबंधित बँक ही मर्यादा ठरवते. ते कार्ड वापरुन केलेल्या व्यवहाराची देय तारखेपूर्वी रक्कम चुकती न केल्यास वार्षिक ३६ टक्के ते ४८ टक्क्यांपर्यंत व्याज आकारलं जातं. कार्डाचा हा प्रकार म्हणजे एक जीवघेणं चक्र व्यूह आहे.
उत्तर लिहिले · 29/4/2018
कर्म · 458520
4
प्लास्टिक मनी म्हणजे जे व्यवहार रोख रकमेशिवाय  डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून पूर्ण होतात. प्रतक्ष रोख रक्कम न वापरता क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरत असता व व्यवहार पूर्ण करता त्यावेळी तुम्ही प्लास्टिक मणी वापरात असता. डेबिट/ क्रेडिट कार्ड किंवा इतर कार्ड व्यवहारासाठी वापरता त्यास प्लॅस्टिक मनी संबोधले जाते.
उत्तर लिहिले · 29/1/2018
कर्म · 210095

Related Questions

उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
पैसा कमाण्यासाठी काय करावं?
पैसा म्हणजे पैशाचे कार्य ही व्याख्या कोणी दिली?
पैसा म्हणजे काय पैशाचे प्राथमिक व दुय्यम कार्य कसे स्पष्ट कराल?
पैसा म्हणजे पैशाची कार्ये ही व्याख्या कोणाची आहे?
तात्काळ पैसा घेण्यासाठी कोणते app चांगले आहे?
पैस्याची व्याख्या कोणती येईल?