7 उत्तरे
7 answers

मुघल सत्तेचा संस्थापक कोण?

15
मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होय.

मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
उत्तर लिहिले · 25/1/2018
कर्म · 458560
1
मुघल सत्तेचा संस्थापक बाबर आहे.

१९९५ साली বাবराने भिवंडी येथे संस्था स्थापन केली.
उत्तर लिहिले · 26/3/2018
कर्म · 20
0

मुघल सत्तेचा संस्थापक जहिरुद्दीन मुहम्मद बाबर होता. त्याने 1526 मध्ये दिल्ली सल्तनतचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी याचा पराभव करून भारतात मुघल सत्तेची स्थापना केली.

बाबर हा एक तुर्की-मंगोल वंशाचा होता आणि त्याने मध्य आशियातील फरगाना खोऱ्यातून आपले साम्राज्य वाढवण्यास सुरुवात केली.

अधिक माहितीसाठी आपण हे दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 860

Related Questions

मोहम्मद शमी काल रोजाबद्दल काय म्हणाला?
हिंदू आणि मुस्लिम यांची 2021 पर्यंत संख्या किती आहे?
भारतात हिंदू आणि मुस्लिम संख्या २०२१ पर्यंत किती आहे?
संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता का?
मक्का मशीद कोठे आहे?
इस्लाम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
मुस्लिम लोक श्रीमद्भगवदगीता शिकतात ते ठिकाण कोणते?