कला इतिहास

मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्या?

0
मुंबईमध्ये अनेक किल्ले आहेत, त्यापैकी काही महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
  • मुंबई किल्ला (Mumbai Castle): हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1715 मध्ये बांधला. हा किल्ला सेंट जॉर्ज किल्ल्याचा भाग होता.
  • वरळी किल्ला (Worli Fort): हा किल्ला 1675 मध्ये ब्रिटिशांनी बांधला. हा किल्ला माहीम खाडीच्या तोंडावर आहे.
  • वांद्रे किल्ला (Bandra Fort): या किल्ल्याला कॅस्टेला दि अगुडा (Castella de Aguada) या नावाने देखील ओळखले जाते. हा किल्ला पोर्तुगीजांनी 1640 मध्ये बांधला.
  • शिवडी किल्ला (Sewri Fort): हा किल्ला 1680 मध्ये ब्रिटिशांनी बांधला. या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात होता.
  • धारावी किल्ला (Dharavi Fort): हा किल्ला 1737 मध्ये बांधला गेला.

संदर्भ:
उत्तर लिहिले · 17/4/2025
कर्म · 740
0
*🏪मुंबईचे किल्ले*









————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
महाराष्ट्रभर पसरलेल्या विविध किल्ल्यांची आपल्याला माहिती असते, परंतु फार कमी लोकांना कल्पना आहे की, खुद्द मुंबईमध्ये शिवडी, सायन, वांद्रे, रेवा, माहीम, धारावी, वरळी असे सात किल्ले आहेत. 


फारशा लोकांना या किल्ल्यांची माहिती नसल्यामुळे तेथे फारसे मुंबईकर किंवा पर्यटकसुद्धा भेट देत नाहीत.. 
🉑वरळीचा किल्ला :
ब्रिटिशांनी १६७५ साली टेहळणीसाठी हा किल्ला बांधला. त्यावर स्थानिक व्यायामशाळेचे अतिक्रमण झाले असून किल्ल्यापर्यंत पोहोचण्याच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आजूबाजूला कचरा व मलब्याचे ढिगारे साठले असून केवळ पुरातत्त्व खात्याचा फलक तेवढा शाबूत आहे.
🉑माहीमचा किल्ला :
राजा भीमदेवने १३व्या शतकात-टेहळणी व संरक्षणासाठी हा किल्ला बांधला. तो आम्ही फक्त बाहेरूनच बघू शकलो. अतिक्रमणामुळे आत जाणे अशक्य होते. आजूबाजूला कचरा व मलब्याचे ढिगारे साठले आहेत. किल्ल्याची समुद्राची बाजू प्रातर्विधीसाठी वापरण्यात येत असल्यामुळे त्या बाजूने आत प्रवेश अशक्य होतो. पुरातत्त्व खात्याचा फलक तेवढा शाबूत आहे.
🈺वांद्रे किल्ला :
पोर्तुगीजांनी १६४० साली टेहळणी व गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर खासगी नियंत्रण आहे.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫सुरक्षारक्षकांकडे ओळखपत्र नाही, या गोष्टीची आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. किल्ल्याच्या परिसरात प्रेमी युगुलं बसली असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना कुटुंबासह फिरणे अशक्यप्राय आहे. पुरातत्त्व खात्याचा फलक शाबूत आहे.
🈺धारावी किल्ला :
ब्रिटिशांनी १७७३ साली टेहळणीसाठी हा किल्ला बांधला. किल्ल्यावर जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. किल्ल्यावर पूर्णपणे कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य आहे. आजूबाजूचा व किल्ल्याचा परिसर झोपडपट्टीने व्यापलेला, त्यामुळे किल्ल्याचे निरीक्षण करणे अशक्य होते. किल्ल्याच्या तळघराकडे जाणारा मार्ग गटाराने व्यापलेला आहे. आजूबाजूला कचरा व मलब्याचे ढिगारे साठले असून पुरातत्त्व खात्याचा फलक जागेवर नाही.
🈺सायन किल्ला :
१६३९ साली टेहळणीसाठी ब्रिटिशांनी बांधला. किल्ला व बाजूच्या बागेमध्ये कोणतेही विभाजन नाही. पुरातत्त्व खात्याचा फलक फक्त एकाच बाजूला शाबूत. बाग व किल्ल्याच्या मधील जागेत फलक नाही.
🈺शिवडी किल्ला :
१६८० साली टेहळणीसाठी ब्रिटिशांनी बांधला. किल्ला बराचसा सुस्थितीत, परंतु याच स्थितीत राहील याची शाश्वती नाही. किल्ल्याच्या आतमध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते. किल्ल्याच्या आत बसून लोक दारू पीत होते. पुरातत्त्व खात्याचा फलक शाबूत आहे.
मुंबईसारख्या शहरात असलेले हे किल्ले अतिशय वाईट परिस्थितीत असून त्यांची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


Related Questions

सोनू नावाचा मुलगा, चित्रकलेची आवड, शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर, सहभाग, चित्र काढण्यास सुरुवात, रंग पेटीतील रंग संपले, सोनू निराश, हार न मानणे, चित्र पूर्ण, प्रथम क्रमांक, कौतुक?
बुरुोंडीच्या गणेश बद्दल माहिती सांगा?
भारतीय मंदिरे हेमाडपंथी आहेत असे म्हटले जाते. हेमाडपंथी म्हणजे नेमके काय?
नरसिंग वर्मा यांच्या काळात _______येथील रथमंदिरे अखंड पाषाणात खोदावली गेली?
नरसिंग वर्मा यांच्या काळात _______येथील रथमंदिरे अखंड पाषाणात?
महिला कीर्तनकार जैतुनबी यांच्याबद्दल माहिती द्या?
शिकारी मातेच्या मंदिराच्या छताबद्दल काय गूढ आहे?