कला कीर्तन

महिला कीर्तनकार जैतुनबी यांच्याबद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

महिला कीर्तनकार जैतुनबी यांच्याबद्दल माहिती द्या?

0

जैतुनबी (जन्म: इ.स. १९४०; - मृत्यू: २३ ऑक्टोबर, इ.स. २०१०) या एक मराठी मुस्लिम कीर्तनकार होत्या. त्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत कीर्तन करत असत.

जीवन:

  • जैतुनबी यांचा जन्म एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडीलbricklaying चे काम करत होते.
  • त्यांनी शिक्षण फक्त दुसरी इयत्तेपर्यंतच घेतले.
  • त्यांचे लग्न लहान वयात झाले.
  • त्यांना Cataract चा त्रास होता.
  • त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मानवता, धार्मिक सलोखा आणि प्रेमळ संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.

कीर्तन:

  • जैतुनबी यांनी अनेक वर्षे कीर्तन केले.
  • त्यांच्या कीर्तनात त्या हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत असत.
  • त्यांच्या कीर्तनांना सर्व धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत.

पुरस्कार:

  • त्यांना अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला होता.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 11/4/2025
कर्म · 740
0
*🔯 महिला किर्तनकार जैतुनबी सय्यद*







————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
जन्माने मुस्लिम असूनही भागवत धर्माचा व्यासंग असणाऱया, जातीपातीच्या भिंती नष्ट व्हाव्यात म्हणून प्रबोधन करणाऱया महिला कीर्तनकार जैतुनबी सय्यद ऊर्फ संत जयदास महाराज. 
पुणे जिह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव येथे 1930 मध्ये जैतुनबी सय्यद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे व्यवसायाने गवंडी होते. एकदा मकबूलभाई यांची भेट वारकरी-संप्रदायातील गोविंदभाऊ यांच्याशी झाली. गोविंदभाऊ हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे गवंडीकाम करत असत. व्यवसाय मिळते-जुळते असल्याने दोघे घनिष्ठ स्नेही झाले आणि एकत्रच गवंडीकाम करू लागले.
अशा वातावरणात लहानग्या जैतुनबीवर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. त्यांना कीर्तनाची गोडी लागली आणि दहा वर्षांच्या असल्यापासून त्या भजन-कीर्तनात रंगू लागल्या. दरम्यान, त्यांची भेट संत हनुमानदास यांच्याशी झाली. त्यांना गुरू मानून जैतुनबी यांनी वारकरी-विचारांची पताका खांद्यावर घेतली. बारामतीच्या घाणेकर बुवांकडून त्यांनी शास्त्राrय संगीताचे धडे घेतले.
जैतुनबी यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर ठाम राहिल्या हे पचनी पडणारे नव्हतेच. त्यामुळे त्यांना तत्कालीन समाजाकडून रोषही पत्करावा लागला. पण त्यालाही न जुमानता त्यांची विठ्ठलभक्ती व साधना सुरूच राहिली. त्यांनी आयुष्यभर वारकरी-संप्रदायाचा प्रसार केला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. इतर वेळी जैतुनबी सायकलवरून गावोगावी जात व कीर्तने करीत. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫त्यांची रसाळ वाणी आणि सहजसोप्या भाषेतील सादरीकरण लोकांना भावायचे. सर्वधर्म समभाव, समानता व बंधुता ही मूल्ये समाजात रुजावीत, अंधश्रद्धा नष्ट व्हावी, स्त्रियांनी शिक्षण घ्यावे यासाठी कीर्तनकार जैतुनबी यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.विठ्ठल भक्ती आणि राष्ट्रशक्ती यांचा सुरेख संगम त्यांच्या कीर्तनात असायचा.जैतुनबी यांना मुल्ला-मौलवींकडून व नातेवाईकांकडून तीव्र विरोध होऊ लागला. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली, पण त्यांनी वारकरी-पंथ सोडला नाही. जैतुनबी मुस्लिम धर्मातील नमाज, रोजे, जकात, खिदमत आदी इस्लामी धार्मिक विधीही नित्यनेमाने करायच्या. त्यांनी आळंदी पंढरपूर येथे मठ बांधले. कल्याण येथील हाजीमलंग बाबांच्या पहाडावर जाण्यासाठी पायऱया बांधल्या. त्यासाठी दीड लाख रुपयांची मदत केली, तर पंढरपुरातील त्यांच्या मठात अन्नदानाचे कार्य सुरू केले, ते आजही सुरू आहे.आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही वारी त्या करीत. त्यांची दिंडी सासवडपासून प्रस्थान करीत असे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमागे एक मैल अंतर ठेवून ही दिंडी चालत असे. 


7 जुलै 2010 रोजी वारीदरम्यान पालख्या पुण्यात असताना त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.वारकऱ्यांमध्ये जैतुनबी यांच्याविषयी मोठा आदर आहे.