कला शिल्पकला

बुरुोंडीच्या गणेश बद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

बुरुोंडीच्या गणेश बद्दल माहिती सांगा?

0

मला माफ करा, "बुरुंडीच्या गणेश" बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मला याबद्दल काहीच माहिती नाही.

तुम्ही मला या विषयावर अधिक माहिती देऊ शकता का?

उत्तर लिहिले · 17/4/2025
कर्म · 740
0
*🏪 बुरोंडीचा त्रिमुखी गणेश*












देवाची इच्छा असली की देव स्वत: त्याला पाहिजे त्या ठिकाणी येतो आणि नंतर भक्तांच्या कल्याण करतो मग तिथेच तो स्थानापन्न होतो. https://bit.ly/3RhY326 भक्तांचे भले करणारा हा सुखकर्ता आपल्याला अनेक पुराणकथां मधून सापडतो. 


पण अगदी आता आता म्हणजे जेमतेम ७-८ वर्षांपूर्वी अशी काही घटना घडली असे जर सांगितले तर ते खोटे वाटेल, थोतांड वाटेल. पण अशीच एक घटना घडली आहे इ.स. २००६ साली आपल्या कोकणात, दापोली जवळ. आणि त्या प्रसंगाचा नायक आजही मोठय़ा दिमाखात तिथे उभा आहे, भक्तांची वाट पाहतो आहे. बुरोंडी या दापोलीपासून फक्त १२ कि.मी. वर असलेल्या
गावातली ही गोष्ट आहे. या गावात कोळी आणि खारबी समाजाचे लोक राहतात. अर्थातच मासेमारी हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हण्रजवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेने त्यांनी ती काय आहे म्हणून बघितले तर एक लाकडाची श्रीगणेशाची मूर्ती होती ती. कोणीतरी ती विसर्जति केली असावी असे समजून या दोघांनी तिची पूजा केली आणि परत समुद्रात सोडून दिली.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫काही वेळाने अजून आत समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी परत ती सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा ती मूर्ती त्यांच्या होडीच्या जवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रावून गेले. हा काहीतरी चमत्कार असावा आणि गजाननाला आपल्याकडे यायचे असावे असे समजून त्यांनी ती मूर्ती परत किनाऱ्यावर आणली. सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. सगळ्या ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते, मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्रीसावरदेवाच्या मंदिरात एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून त्या गावाला,साखरकर कुटुंबीयांना भरभराटीचे दिवस आले असे लोक सांगतात.
चार फूट उंचीची शिसवीच्या लाकडाची ही मूर्ती तीन तोंडांची आहे. मूर्तीला ६ हात असून पाश, दंत अशी आयुधे तिच्या हातात आहेत. तुंदिलतनु आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीच्या अलंकारांची कलाकुसर अतिशय अप्रतिम आहे. गणेशाच्या पायाशी त्याचे वाहन मूषक आणि बाजूला बीजपूरक दिसते.
बीजपूरक हे फळ लाडवा सारखे दिसते. सुफलता आणि नवनिर्मिती याचे ते प्रतीक आहे. ते कायम गणपतीजवळ दाखवलेले असते. दापोली दाभोळ या परिसरात कायम लोकांचे जाणे होते. परंतु या गणेशाचे दर्शन आता मुद्दाम जाऊन घेतले पाहिजे. जवळच असलेला रम्य सागरकिनारा या मंदिराला आणि परिसराला अजूनच शोभा देतो.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24