रंग डॉक्टर

डॉक्टरांचे ड्रेस निळ्या किंवा हिरव्या रंगाचे का असतात?

1 उत्तर
1 answers

डॉक्टरांचे ड्रेस निळ्या किंवा हिरव्या रंगाचे का असतात?

2
*_🤔डॉक्टर पांढरा कोट का घालतात माहितीये ?_*

🎯 रुग्णालयात डॉक्टर नेहमी पांढऱ्या कोटमध्ये का दिसतात हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. परंतु डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे कपडे परिधान करण्यामागे काही खास कारण आहे. जाणून घेऊया कारणे....

_डॉक्टर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टरांनी परिधान केलेला पांढरा कोट आणि त्यांच्या गळ्यात अडकवलेलं स्टेथोस्कोप. रुग्णालयामध्ये गेल्यावर डॉक्टर आपल्याला कायम पांढऱ्या कोटमध्ये दिसून येतात. मात्र डॉक्टर किंवा तेथे काम करणारे कर्मचारी कायम पांढऱ्याच कपड्यांमध्ये का दिसतात हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. परंतु डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे कपडे परिधान करण्यामागे एक खास कारण आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मागचं खरं कारण_
💁‍♂ *ही आहेत कारणे* : 

▪ रुग्ण आणि डॉक्टर किंवा रुग्णालयातील अन्य कर्मचारी यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पांढऱ्या कोटचा वापर करत असतात.

▪ पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये कायम सकारात्मक वातावरण असावा यासाठी या रंगाला प्राधान्य देण्यात येतं.

▪ पांढऱ्या रंगामुळे शरीराचं तापमान स्थिर राहतं. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचंदेखील प्रतिक आहे.

▪ या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक सामान ठेवता यावं यासाठी, हे खिसे मोठे ठेवण्यात येतात.

◼पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये कायम सकारात्मक वातावरण असावा यासाठी या रंगाला प्राधान्य देण्यात येतं.

◼त्याप्रमाणेच जंतूसंसर्ग होऊ नये यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचा उपयोग होतो.

◼पांढऱ्या रंगामुळे शरीराचं तापमान स्थिर राहतं. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचंदेखील प्रतिक आहे.

◼विशेष म्हणजे पांढऱ्या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील महत्वाचे असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक असलेलं सामान ठेवता यावं यासाठी हे खिसे मोठे ठेवण्यात येतात.

*_📍दरम्यान, सध्याच्या काळामध्ये डॉक्टरांची ओळख पांढरा कोट म्हणूनच झाली आहे. मात्र हा पांढरा कोट नसून त्याला अॅप्रिन असं म्हटलं जातं. हा अॅप्रिन गुडघ्यापर्यंत लांब असून तो सूती, लिनन किंवा सूती पॉलिएस्टर यांच्यापासून तयार केलं जातो._*

जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो, पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत विशिष्ट रंगाचं कनेक्शन आहे दिसतं. जर आपण बारकाईने लक्ष दिले तर जाणवेल डॉक्टर बहुदा सफेद, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. त्यांच्या या रंगांच्या युनिफॉर्ममागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.

👨‍⚕ *डॉक्टर सफेद,निळ्या/हिरव्या रंगाचाच युनिफॉर्म का घालतात?*

1) *सफेद रंग* : हा रंग शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक आहे. यामुळे विविध प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ नये. शांत वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात.

2) *हिरवा/ निळा रंग* : 1914 साली एका डॉक्टरने सफेद रंगाच्या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले.

📝 'टूडे सर्जिकल नर्स' (1998) या वैद्यकिय अहवालावर आधारित एका लेखात याबाबत सांगण्यात आले आहे.

● हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले.
● जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते.
● वैद्यानिक दृष्टीकोणातून विचार करता आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत.
● ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही.

वरील सर्व कारणांचा विचार करून हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर पसंत करतात.
उत्तर लिहिले · 1/7/2023
कर्म · 569205

Related Questions

डॉक्टर सौदडकर यांनी समर् कॅम्प ची सुरुवात केव्हा केली?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कोणतेही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनातील कोणत्याही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डिग्री या?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरची पदवी कशी मिळाली?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणत्या दिवशी केली?