डॉक्टर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डिग्री या?

1 उत्तर
1 answers

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डिग्री या?

2
प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 
 
डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, त्या पदव्यांकडे नजर जरी टाकली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जगमान्य विद्वत्ता लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला आणि १९२३च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यांचा शैक्षणिक वर्षांचा प्रवास हा २७ वर्षांचा आहे. या २७ वर्षांमध्ये प्रचंड हाल-अपेष्ट आणि कष्ट सहन करून फक्त आणि फक्त ज्ञानग्रहण करणारे अद्वितीय असे ज्ञानोपासक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी बी.ए., एम.ए., पीएच.डी., एम.एस्सी., डी.एस्सी. आणि बार अ‍ॅक्ट लॉ अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील कॅम्प स्कूल येथे १८९६ला सुरू झाले. पुढे सातारा हायस्कूल येथे १९००मध्ये त्यांनी पाचवीत प्रवेश घेतला. कुमारवयामध्ये हॉकी, क्रिकेट आणि फूटबॉल खेळण्यामध्ये त्यांना विशेष रूची होती. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी अकरावीपर्यंतचा (जुनी मॅट्रीक) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना या शाळेत संस्कृत भाषा घेता आली नाही म्हणून त्यांनी पार्शियन भाषा निवडली.उत्तम प्रकारे अवगत होत्या. बाबासाहेबांची ज्ञानलालसा आणि त्यांचे समाजोद्धाराचे प्रचंड कार्य बघून ५ जून १९५२ रोजी कोलंबिया विद्यापीठाने एलएल.डी. (डॉक्टर ऑफ लॉज्) ही सन्माननीय पदवी आपल्या जागतिक कीर्तीच्या माजी विद्यार्थ्याला सन्मानाने बहाल केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी हैदराबाद येथे त्यांना समारंभपूर्वक डी.लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय पदवी प्रदान केली. भारत सरकारने या विश्व मानवाला त्याच्या जागतिक तोडीच्या कार्यकतृर्त्वाचा सन्मान म्हणून १९९०मध्ये मरणोपरांत 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने सन्मानीत केले. 
 
डॉ. बाबासाहेबांची प्रचंड ज्ञानलालसा, त्यांचा वाचन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्वामधील विविधांगी व्यासंग बघितल्यावर त्यांच्या तोडीचा असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधूनही सापडू शकत नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव ज्ञानव्रती आहेत. त्यांचे सर्व संशोधनात्मक लेखन जागतिक पातळीवर गौरविल्या गेले आहे. त्यांच्या ज्ञानलालसेचा वारसा संपूर्ण विश्वाने घेतला पाहिजे. आज आपल्या देशात 'गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे', अशी जी ओरड होत आहे, त्याला पर्याय देण्यासाठी बाबासाहेबांसारखी ज्ञानलालसा वृद्धिंगत करणे हाच त्यावरचा एकमेव मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसाचे अठरा-अठरा, विस-विस तास स्वत:ला अभ्यासामध्ये गुंतवून घेत असत. प्रचंड वाचन, प्रत्येक क्षण अन् क्षण हा ज्ञान ग्रहणासाठीच असला पाहिजे, असा कटाक्ष त्यांनी पाळला. आयुष्यभर निर्व्यसनी राहून जीवनाच्या शेवटपर्यंत बाबासाहेब ज्ञानाचे उपासक राहिले. आजन्म विद्यार्थी असणारा हा ज्ञानयोगी, हजारो पदव्या आणि उपाधींच्या पुढे होता. कारण तो ज्ञानोपासक होता.
उत्तर लिहिले · 17/4/2023
कर्म · 9415

Related Questions

डॉक्टर सौदडकर यांनी समर् कॅम्प ची सुरुवात केव्हा केली?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कोणतेही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनातील कोणत्याही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?
डॉक्टरांचे ड्रेस निळ्या किंवा हिरव्या रंगाचे का असतात?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरची पदवी कशी मिळाली?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणत्या दिवशी केली?