डॉक्टर जीवन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कोणतेही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?

1 उत्तर
1 answers

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कोणतेही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?

0
प्रसंग पहिला 

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती तालुक्यातील ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे दहावीची परीक्षा देणार होते.

बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा यांनी विचार केला की आपली परिस्थिती सर्व कुटुंबाला तालुक्याला घेऊन जाण्यासारखी नाहीये म्हणून रामजी बाबा यांनी बाकी कुटुंबाला घरीच ठेवले.यानंतर बाबासाहेब अणि रामजी बाबा हे तालुक्याच्या ठिकाणी एक भाड्याची खोली विकत घेऊन आंबेडकर यांची परीक्षा होईपर्यंत राहु लागले.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वडील रामजी बाबा स्वता स्वयंपाक बनवून खाऊ घालत होते.बाबासाहेब आंबेडकर हे सकाळी अकरा वाजता पेपर देण्यासाठी जात होते.अणि पेपर संपल्यावर तीन वाजेच्या सुमारास खोलीवर परत यायचे.रोज बाबासाहेब पेपर देऊन येईपर्यंत त्यांचे वडील रामजी बाबा त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवायचे.मग पेपर देऊन आल्यावर भिमराव जेवण करायचे.एकेदिवशी भिमराव पेपर देऊन आले अणि जेवायला बसले त्यांनी वडिलांना विचारले बाबा तुम्ही नाही जेवत का यावर रामजी बाबा म्हटले आधी तु जेवून घे मग मी जेवण करेन.


असे रोज होऊ लागले बाबासाहेब पेपर देऊन यायचे रामजी बाबा यांना जेवणासाठी विचारायचे रामजी बाबा तुझे जेऊन झाले की मी जेवेन असे सांगायचे.

एकेदिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात ही गोष्ट आली की बाबासाहेब आंबेडकर यांचे जेवण झाल्यावर टोपली मध्ये भाकरीच उरत नव्हत्या त्यांचे वडील त्यांना परीक्षा काळात रोज पोटभर जेवू घालून स्वता उपाशीपोटी झोपत होते.


ही गोष्ट लक्षात आल्यावर बाबासाहेब यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की माझे जेवण झाल्यावर टोपली मध्ये भाकरीच शिल्लक राहत नाही मग माझे वडील काय खातात.एकेदिवशी बाबासाहेब आंबेडकर रामजी बाबा यांना विचारतात बाबा माझे जेवण झाल्यावर टोपली मध्ये भाकरीच शिल्लक राहत नाही.

मग तुम्ही इतक्या दिवसांपासून काय खाता आहे.रोज तुम्ही उपाशी राहता आहे का तुम्हाला भूक नाही लागत का?यावर रामजी बाबा बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले भिमराव ह्या भाकरीने माझी भूक भागणार नाही

जेव्हा तुम्ही खुप मोठे व्हाल अणि तुमच्या कडे बघताना मला मान वर करुन बघावे लागेल सर्व जग तुमचा जयजयकार करेल हे जेव्हा मी माझ्या डोळयांनी बघेल तेव्हा माझी भुक भागेल तोपर्यंत माझी भुक भागणार नाही.अणि भविष्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पित्याचे हे स्वप्न पूर्ण करून दाखवले.परदेशातुन उच्च शिक्षण प्राप्त केले बॅरिस्टर झाले.स्वताही शिकले अणि आपल्या समाजाला देखील शिकण्यासाठी प्रेरित केले.

अणि आज तोच भीमराव भारताच्या संविधानाचा कायदयाचा जनक म्हणून जगभरात ओळखला जातो.




प्रसंग दुसरा 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.

अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत...
शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.
उत्तर लिहिले · 3/9/2023
कर्म · 9415

Related Questions

आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय असल्यास कसा नसल्यास कसा?
नीसर्गातिल घटक व मानवी जीवन यांचा सँबन्ध स्पश्ट कर?
माणवी जीवनात संवादाचे महत्त्व याविशायी तुमचे मत लिहा?
सिंधू संस्कृतीच्या लोक जीवनाचा आढावा?
आद्यआत्मा आध्यात्म विद्य विज्ञान सुज्ञ प्रज्ञान सत्संग विवेक तसेच आर्त आर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन आयुष्याचं वस्त्र विणणे याला प्रेम नम्रता एकत्व ची जोड देणं याला जीवन ऐसे नाव ? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे , आषाढी एकादशी आहे
सतत चालणं , सतत सक्रीय राहणं , सतत हसतमुख राहणं , सतत संस्कृती परंपरा रितीरिवाज कायमदायम जपणं ही विवेक वृत्ती मिलवर्तन परिवर्तन नवं नवीन चांगलं ते देणं हेच सत्य प्रेम आनंदी मन जपणं व विनम्र राहणं हे जीवन पूर्णतृप्त असेल कां ?
सूर्य चंद्र तारे आणि निसर्ग चक्र यांचा पशुपक्षी ,मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते , त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी ?