प्रेम संस्कृती जीवन

सतत चालणं , सतत सक्रीय राहणं , सतत हसतमुख राहणं , सतत संस्कृती परंपरा रितीरिवाज कायमदायम जपणं ही विवेक वृत्ती मिलवर्तन परिवर्तन नवं नवीन चांगलं ते देणं हेच सत्य प्रेम आनंदी मन जपणं व विनम्र राहणं हे जीवन पूर्णतृप्त असेल कां ?

1 उत्तर
1 answers

सतत चालणं , सतत सक्रीय राहणं , सतत हसतमुख राहणं , सतत संस्कृती परंपरा रितीरिवाज कायमदायम जपणं ही विवेक वृत्ती मिलवर्तन परिवर्तन नवं नवीन चांगलं ते देणं हेच सत्य प्रेम आनंदी मन जपणं व विनम्र राहणं हे जीवन पूर्णतृप्त असेल कां ?

0
प्रश्न असा आहे की, मानव मी मानवासारिखा इतरां जैसा देह मला.... हा देह कसा मिळाला, कां मिळाला , येथे येण्याचे  प्रयोजन काय आहे... हे जाणून घेण्यासाठी आपले मन जे सतत मी का तू या चक्रात भ्रमिष्ट आहे. खरंतर ही बोलण्याची रीत आहे.. मला एक बोलायच़ आहे, शेवटी मी तुम्हांला एकच सांगतो हा शब्दही विश्वास स्थिरमनाचाच भाग आहे. मला दृढता स्थिरता विशालता तत्परता शांतता हवी आहे मग यासाठी मी या वृत्तीला नमविणे गरजेचे आहे. मी कोण , इतर कोण , स़पूर्ण मानव जात एकच आहे. तरीही भेदाभेद कां ? कोणी केला हा भेदाभेद ...कोणी केली नातीगोती,  कोणी केले व्यवहार व्यवसाय उद्योग... कोणी निर्मिले देवदानव ...काय आहेत या जाती ... मनातून जाता जात नाही ती जात .
काय हे द्वंद्व....सगळं देवदानवा नरें निर्मिले ,हे मज लोकां कळवू द्या .... काठोकाठ भरुद्या प्याला फेस भराभर उसळू द्या....असे हे मन रात्रंदिवस विचार वेध कल्पनेने भारलेले . अहो रात्री आपण झोपलो तरी श्वास कोण देतंय घेतंय, हे अनाकलनीय चक्र अव्याहत सुरू आहे. हे सर्व सुरूच आहे तर या देहादेही एक आत्माराम..हे ही खरं आहे. मग आपली जीवन गाडी कोण चालवतोय .... यावर विश्वास ठेवा....आपण ही सतत चालण़ शिकलं पाहिजे. मन मेंदू मनगट मजबूत करून सहजतेने जीवनक्रम सुरू ठेवला पाहिजे.चांगलं वाईट वंगाळ त्याज्य हे ओळखण्याचे विवेकी विचार मानव सतत करत आहे. तसेच आहार विहार व्यवहार ही तो करत असतो . केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार हा वावर ही त्याचे जवळ आहे . मानव हा परोपकार नीतीने व संवेदनशील वृत्तीने  सर्वोत्तम प्रेम कामगिरी विश्वासाने करत असतो . आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी सत्संग सिमरन सतत कार्यरत ठेवून माणुसकी धर्म ही वाढवत आहे. याकामी पुढाकार घेऊन राज्यशकट समाज कल्याण ही सुरू आहे आणि समाज रसातळाला न जाईल असेही तो समन्वय समन्यायी पद्धतीने सर्व काही सुरळीत चालू राहील हे पाहत आहे . उघडा डोळे बघा नीट, ही चौकस बुद्धी ठेवून जनजागृती सुरू आहे.
तरीसुद्धा आजकाल वर्तमान काळवंडला जातो आहे .
वर्तमान समोर आहे आणि तो आपल्या हातात आहे मग पाणी नाणी वाणी नासू नये यासाठी कर्म बोलते करावं लागतं आहे . अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित करण्यात आली तर मानवी जीवन पूर्णतृप्त होईल या विचाराने हा वर्तमान सजविता आला पाहिजे. तरच माणसाला माणूस प्रिय राहील.म्हणून सतत चांगल्या पद्धतीने या जीवनवाटा सुशोभित केल्या जाव्यात म्हणून सतत सक्रीय सक्षमपणे सहभागी होऊन समाजजीवन चालू राहिले पाहिजे यासाठी वर्तन सुरू रहावे , यासाठी सतत सोबत चाला , सतत संवाद ठेवा . 
भजन पूजन कीर्तन प्रवचन जेथे सुरू आहे तेथे भगवंताचे अधिष्ठान वास्तव्य आहे. होय याकरिता जीवन यज्ञ सुरू रहावा . हा विश्वास स्थिरमनाचा आहे . विवेक विचार सतत सुरू असावा असे वाटते.

 पण माणसाचे मन हे सारखं चपळाईने धावाधाव कां करत असते , ते कधी शांत असणार आहे,नेमकं खमंग खमकं उतर काय शोधावे ..
आणि याचा शोध बोध घ्यावा लागेल यासाठी जाणतेणं गुरू भजिजे, तेणें कृतकार्य होईजे....
हीच मानविय सद्गुणांनी युक्त अशी निर्मल भावना सतत कार्यप्रवण पाहिजे.
        मला सतत प्रेरणा देणारे, दिशा दाखवणारे असै कोणीतरी भेटावे , असा प्रकाशझोत हवाय . माझं अंतःकरण शुद्ध सात्विक हवे .मला शुचिर्भूत होण्यासाठी माझं तुमचं आणि सर्वांचं मनन चिंतन अभ्यास सुरू  रहावा.हा वर्तमान समोर आहे तो मला माणसासारखा सजविण्यात आनंद प्रसन्नता लाभली पाहिजे असे सुकृत कर्म उभे रहावे यासाठी मला पुढे पुढे चालावे लागेल आणि ते चरण मला दिसावेत . जेणेकरून आपल्याला सतत ऊर्जा सामर्थ्य ताकद शक्ति बळ मिळो अशी अपेक्षा आहे.
जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
मला दृढता स्थिरता विशालता तत्परता आनंद प्रसन्नता जशी हवी तशीच ती इतरांनीही हवी . माणसाला माणूस प्रिय असावा आणि त्याचा प्रवास ही अथक असावा . यासाठी भरीव कामगिरी विश्वासाने पार पडेल असे माझे तूझे एकच कर्म बनावे . बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी...हा विठ्ठल कोण आहे याची जाणीव झाली की वारी सतत सक्रीय सहभाग घेऊन विवेक वृत्ती जोमात  काम करेल. सर्वोत्तम प्रेम कामगिरी ही प्रेमाभक्ती वृद्धिंगत होवो.
समाजहितास प्रोत्साहन कसे मिळते , तर सेवा करण्यामुळे ... यासाठी तो हा विठ्ठल बरवा...तो हा माधव बरवा हे एकत्व सत्य प्रेम यांची समज उमज बांधिलकी दृढ व्हावी.. ही वारी , वारी वारी जन्ममरणांते वारी,हरी पडलो आता संकट निवारी... हे जाणून घेण्यासाठी सतत पुढे पुढे चालावे लागते.
चालण्यासाठी वाटसरूला वाट दिसावी आणि ही वाट हा विटेवरील उभा असलेला विठ्ठलच दाखवितो .अशी एकनिष्ठ श्रद्धा अढळ विश्वास हवाय . यासाठी मन मोकळं खुलं करून समतोल साधला असता हृदयांहृदयीं एक होऊन जातो.आपण चालत रहाणे ही एकत्वाची वारी आहे आणि ती पुढे पुढे एक जनसागर बनते . हा प्रवाह प्रवास सुरू आहे. एकनिष्ठ दैदिप्यमान प्रेम कामगिरी करीत ही पायी वारी सर्वांना बरोबर घेत मनं जोडण्याची किमया घडते . नम्रपणे हातात हात घेऊन सतत मुखाने राम म्हणत हा एक मानवी जीवन रथ पुढे चालावा हीच खरी संस्कृती खरा धर्म आहे . यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी हवेत. असे वर्तन आचरण ठेवून आपले जन जागरण हे किर्तन भजन बनले की , ऐंशी अक्षरें रसिके मिळविणं ..असे चालणं वागणं होते. तेच सक्रीय सक्षमपणे सहभागी होऊन एकरसी एकजीवी बनले की माझं येणं जाणं हे सफल झाले ही भावना पूर्णत्वाला जाते . माणसातला देव कळतो . एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ही तू तू कडे ओढीने वळतो आणि विठ्ठलाची ओळख होते , ही ओळख एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी.. इतकी एकरूप होऊन आम्ही गातो  बोलतो म्हणतो माऊली माऊली माऊली !!!
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी...
माझं तुमचं येथे येण्याचे प्रयोजन समजते .
आता आम्ही गाऊ एक विठोबाचे नाम.......
तर सेवा निर्मल महान कार्य करते यासाठी ही वारी वाट सतत कार्यरत रहावी ..आणि समाज मनं हे विनम्रपणे एकवटले की , मी माझं माझं उगाच म्हणसी काहीही नाही नरा तुझं...हे कळते . इतकी सहजता समरसतेने प्रगल्भ होते.अशी ही आपली संस्कृती सुसंगत बनत आहे.  पहावे आपणासी आपण तया बोलिजे ज्ञान...... असे ज्ञान एक नजर एक ध्यान एक ध्यास बनते. ही एक प्यास आहे ती एक लगन आहे असे एक मिलवर्तन होते.हा  एक सद्भाव सद्विचार एक परिवर्तन घडवून आणते . यासाठी गातच रहावं लागतं त्यासाठी चालतं बोलतं रहावं ... मन मेंदू मनगट मजबूत हवे . मन हे चंचल आहे.त्याला लगाम अंकुश रहावा. आपण विवेकी आहोत. आपलं जागरण अखंड सुरूच आहे पण ते सत्य प्रेम एकत्व वाढीस लागेल असे असावे. यासाठी समर्पित भावना हवी आणि प्रत्येक वेळी सहजतेने विशालतेकडे झेपावत रहायला हवे.हेच चांगले चालणे व्हावे. यासाठी वर्तमान सजविण्यात आपले आयुष्य खर्ची पडावे . यासाठी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अखंड नाम तोंडी असावे .तोच बळ सामर्थ्य ताकद शक्ति ऊर्जा भक्ती शक्ती युक्ती कृती प्रिती शांती शिस्त समाधान देतो हा जीवन यज्ञ अखंड सुरू ठेवून आपल्या समिधा अर्पण कराव्यात. हेच जीवन गानं गातच रहावं व पुढं पुढं जातच रहावं.

 हा विश्वास स्थिरमन शुभसंकेत शुभसंदेश देत आहे . हा कृपाप्रसाद मिळण्याने आपली वारी सफल होते आणि पाय हे चालतं राहतात.. ज्यामुळे मानविय सद्गुणांनी युक्त अशी जीवनशैली प्रकाश यात्रा घडते... यासाठी सतत पुढे पुढे चालावे लागते.. ते ही अथक परिश्रमाने...अविरत ... तू ही तू ही करीत  !! 
पूर्ण समर्पित होणं , जगणं आणि जीवंत आहोत तोपर्यंत हातात काम मुखाने राम म्हणणं व हीच खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती होय... असं जीवनगाणं गातच चाललो तर पूर्णतृप्त जगणं कळेल व  हे जग सुंदर होईल आणि तसे सुकृत कर्म‌‌‌ दिसणे म्हणजे पूर्णतृप्त होणे होय ... अवघाचि संसार सुखाचा करीन,आनंदें मरीन तिन्ही लोक ....
धन्यवाद जी.



उत्तर लिहिले · 13/7/2024
कर्म · 455

Related Questions

सिंधू संस्कृतीच्या लोक जीवनाचा आढावा?
आद्यआत्मा आध्यात्म विद्य विज्ञान सुज्ञ प्रज्ञान सत्संग विवेक तसेच आर्त आर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन आयुष्याचं वस्त्र विणणे याला प्रेम नम्रता एकत्व ची जोड देणं याला जीवन ऐसे नाव ? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे , आषाढी एकादशी आहे
सूर्य चंद्र तारे आणि निसर्ग चक्र यांचा पशुपक्षी ,मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते , त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी ?
आपण मानव मी मानवासारिखा...खरंच आपण एकमेका साहाय्य करू..असे जीवन जगतोय असं वास्तव आहे कां ?
मोबाईल मुळे होणारे परिणाम अभ्यासून तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाय योजना सुचविणे याचे निरीक्षकने सांगा?
मोबाईल मुळे होणारे परिणाम अभ्यासून तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासून त्यावर उपाय योजना सुचविणे?
जीवन सुंदर आहे मराठी भाषण?