रचना
लिंबाच्या झाडाची रचना व उपयोग?
1 उत्तर
1
answers
लिंबाच्या झाडाची रचना व उपयोग?
0
Answer link
लिंबूपाणी
लोकांना लिंबूपाणी प्यायला आवडते कारण त्यात प्रथिने, कार्ब, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच, हे व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे.ते अनेक रोगांसाठी अत्यंत चांगले आहे. हे आरोग्य, केस आणि त्वचा निरोगी बनवते आणि या सर्व गोष्टी खरोखर उत्कृष्ट देखील आहेत. आजकाल लोक उन्हाळ्यात हे सर्वात जास्त पितात. तुम्ही ते सकाळी कोमट पाण्यासोबत प्यायल्याने तुमची पचनक्रियाही योग्य राहते.
झाड
लिंबाचे झाड हे साधारण आठ ते नऊ फूट उंच असते. त्याचा आकार घेरदार असतो. फांद्या पसरट असतात. या झाडाला मोठे मोठे काटे असतात. त्यांचा रंग हिरवा असतो, याची साल पांढरट राखाडी रंगाची असते. पाने हिरवीगार असून, त्यांना मंद सुगंध येतो. या झाडांना पांढऱ्या रंगाची फुले नंतर फळे येतात. ही फळे म्हणजेच दबू होय, कच्चे लिंबू हिरवेगार तर पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे होते. कार गोल असतो. लिंबात पाच-सहा बारीक पांढऱ्या बिया असतात. शिष्ट्य:या फळाची चव आंबट असते.
लिंबाची लागवड
पाणी निचरा करणारी जमीन याला लागते , थोडी भुसभुशीत, हलकी ,काळी मुरमाड असणारी जमीन याला लागते .आता आलेल्या सुधारित जाती साई शरबती तर फुले शरबती आहे. लाग्वादाचे अंतर 6 बाय 6 मीटर ठेवावे तर खड्ड्याचा आकार 1 बाय 1 असावा लागतो . रोप लागवड करण्यास सोपी जाते. 5 वर्षावरील एक झाड जवळपास 75 ते 125 किलो लिंबू देते.