रचना

चिंचेच्या झाडाची रचना व वैशिष्ट्ये?

1 उत्तर
1 answers

चिंचेच्या झाडाची रचना व वैशिष्ट्ये?

0
चिंचेच्या उपयोग/वापर, वैशिष्ट्ये

खाद्य पदार्थात सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर गिरणीमध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते.

लागवड 
चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊस मानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून 9चिंचोक्यांपासून) चिंचेचे रॊप बनते. बियांपासून रोपे तयार करून व शिवाय कलमे तयार करून रोप तयार केले जाते.. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून भरतात. तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकतात. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरतात. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावतात आणि लगेच पाणी द्देतात..
उत्तर लिहिले · 25/4/2023
कर्म · 7460

Related Questions

इंटरनेटची रचना १९८० साली सर्वप्रथम कोणत्या देशाने मांडली?
शिकवयाच्या घटकाची आशयातील तपशिलाची छोट्या छोट्या घटकात आर्थिक क्रम लक्षात घेऊन केलेली रचना म्हणजे?
ई. स. पू. 1500 च्या सुमारास वैदिक लोकांनी_____या वेदांचे रचना केली?
परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या कोणी केली??
लिंबाच्या झाडाची रचना व उपयोग?
थांब ना भारुड म्हणजे काय भारुडाची रचना सांगा?
भारूड म्हणजे काय? भारूडाची रचना कशी असते?