ब्रम्हांड

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे रस काय?

2 उत्तरे
2 answers

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे रस काय?

0
प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई ! बोलावं तू आतां मी कोणत्या उपायीं ?

तूं माय, लेकरू मी, तू गाय, वासरू मी; ताटातुटी जहाली, आतां कसे करू मी ? गेली दुरी यशोदा, टाकुनी येथ कान्हा, अन् राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीही वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे; नैर्य त्या सतीचे, तूं दाविलेस माते, अक्षय्य हृत्प्रभूचे सामीप्य साधण्यातें.

नाही जगांत झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा, लाभे अतां मला ही,

आईविणे परी मी, हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,

तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई, तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे ! कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे. किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती, अव्यक्त अश्रुधारा, की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई पाहुनीया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ? घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी, खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

- माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

करुण रस आहे.
उत्तर लिहिले · 14/2/2023
कर्म · 9415
0
आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे या ओळीमध्ये विरह (separation) रस आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 860

Related Questions

जर माणूस कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय ओझोन थराच्या वर गेला तर काय होईल? हनुमान, कार्तिक, तसेच इतर देवता पृथ्वीच्या वर अंतरिक्षात कसे जाऊ शकले? हे विज्ञान आहे की चमत्कार? काय मी हे समजू की देवता प्राचीन परग्रही एलियन्स होते?
मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलशाला लक्ष्मीप्रमाणे का सजवतात? नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. त्याअर्थी नारळ हा पुरुष रूपात असतो. त्याला स्त्रीस्वरूप सजवणे रास्त आहे का?
मंगळ ग्रह पृथ्वी पासून किती किलोमीटर अंतरावर आहे?
सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
ग्रह कुठलाही आधार नसताना तरंगतात कसे?
विश्वाचं वय कसे मोजतात?
प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो, मग या ब्रह्मांडाचा शेवट का नाही?