Topic icon

ब्रम्हांड

0
प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई ! बोलावं तू आतां मी कोणत्या उपायीं ?

तूं माय, लेकरू मी, तू गाय, वासरू मी; ताटातुटी जहाली, आतां कसे करू मी ? गेली दुरी यशोदा, टाकुनी येथ कान्हा, अन् राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीही वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे; नैर्य त्या सतीचे, तूं दाविलेस माते, अक्षय्य हृत्प्रभूचे सामीप्य साधण्यातें.

नाही जगांत झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा, लाभे अतां मला ही,

आईविणे परी मी, हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,

तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई, तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे ! कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे. किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती, अव्यक्त अश्रुधारा, की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई पाहुनीया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ? घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी, खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

- माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

करुण रस आहे.
उत्तर लिहिले · 14/2/2023
कर्म · 9415
6
ओझोन थरावर अंतराळ सुरू होते, म्हणजे तिथे पृथ्वीचे वातावरण संपते.
वातावरणच नसल्याने आणि हवेची पोकळी असल्याने तुमचे शरीर जास्तीत जास्त वीस सेकंद ते एक मिनिट इतका वेळ तग धरू शकेल.

शरीरात मुख्यत्वे खालील बदल होतील.

अंतराळाची पोकळी तुमच्या शरीरातून हवा खेचून घेईल. त्यामुळे जर तुमच्या फुफ्फुसात हवा उरली असेल तर ते फुटतील.

तुमच्या शरीराच्या उर्वरित भागात ऑक्सिजनचा विस्तार होईल. तुम्ही तुमच्या सामान्य आकाराच्या दुप्पट फुगाल, पण तुमचा स्फोट होणार नाही. तुमची त्वचा तुम्हाला एकत्र ठेवण्यासाठी पुरेशी लवचिक आहे.

तुमच्या शरीरावरील कोणतेही उघड द्रव वाफ होऊ लागेल. त्यामुळे तुमच्या जीभ आणि डोळ्यांचे पृष्ठभाग उकळतील. तुमच्या फुफ्फुसात हवा नसल्यास, रक्त तुमच्या मेंदूला ऑक्सिजन पाठवणे थांबवेल.

सुमारे 15 सेकंदांनंतर तुम्ही मूर्च्छित व्हाल. 90 सेकंदांनंतर, तुमचा ऑक्सीजन अभावी श्वासोच्छवासामुळे मृत्यू होईल.

हनुमान, कार्तिक आणि यांच्या गोष्टी पुराणातील आहेत, त्यामुळे ते आकाशात कुठपर्यंत गेले आणि दुसऱ्या कोणत्या ग्रहावर गेले याला काही वैज्ञानिक पाठबळ नाही. त्यामुळे कदाचित त्यावेळी स्पेससुट असतील, किंवा त्यांच्याकडे काही आधुनिक साधने असतील जीच त्यांची ताकत असेल ज्याला आपण आज दिव्य शक्ती म्हणतो.
उत्तर लिहिले · 18/3/2022
कर्म · 283280
1
खूप छान प्रश्न आहे या चुकीच्या पद्धतीने व्रत होतं असल्याचा महिलांच्या मनातला भाव मला ही पटतं नाही हा मुद्दा मी अनेकदा महिलांच्या पुढे मांडला तेव्हा कुठे काहींना पटला तर काहींना परंपरा कशी मोडायची हा प्रश्न पडला, मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलश मांडायचा पण आपण व्रत करीत आहोत ह्याची साक्ष असावी म्हणून पाच पल्लवं किंवा विड्याची पाने व नारळ कलशावर पुजावे लागते आणि लक्ष्मी ची प्रतिमा, फोटो किंवा चांदीची , पीतळे ची कमळात बसलेली लक्ष्मी पूजेसाठी ठेवावी लागते व त्यास आपल्या आवडी प्रमाणे हार फुले वेणी वगैरे सजवून कहाणी वाचावी व फळं अथवा आपल्या सोयीने प्रसाद दाखवावा असं चार गुरुवार झाल्यानंतर उद्यापन करावे आपल्याला जमेल तसे कोणताही अती खर्च , दिखावा करू नये, नंतर तो नारळ लक्ष्मी किंवा गणपती मंदिरात किंवा आपल्या जवळच्या शक्ती मंदिरात अर्पण करावा किंवा कुणाला पटतं असेल तर वाढवून प्रसाद म्हणून घरीच खाण्यात यावा येथे मनापासून व्रत असावे बाकी उगाच त्याचा वाढीव पणा नकॊ,

या व्रताचा इतका मोठा बाऊ केला जातं आहे की त्यामुळे गरीबाची घरातली लक्ष्मी ऐपत नसताना बाहेर खर्च होते आणि व्यापारी, दुकानदार यांचे कडे भरघोष यश देते, याचे कारण सगळ्याच पूजेच्या सामानाचा भाव दामदुप्पट केला जातो व या व्रताची प्रत्येक गुरुवार च्या पूजेची तयारी 100 तें 125 रुपये इतक्या खर्चात पडते, न परवडणारं आहे पण सांगणार कोण, श्रद्धा व मनातला भाव असेल तर साधी पूजा अगदी दारातल्या झाडाचं पान ही चालतं व घरातल जेवणं ही मान्य होतं इतकं कळलं ना आपल्या माता भगिनी ना तर घरात खरच लक्ष्मी राहिलं व टिकेल ही , आम्ही केव्हाच बदल केला आहे कोणाला पटो अथवा ना पटो,

व्रताची कहाणी हेच सांगते पण अर्थपूर्ण लक्ष देऊन वाचन केल्यास कळते आणि मनातली तळमळ, काही चांगलं होण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी व्हावा व , दारिद्र्य , कर्जबाजारी पणा, आजार या सारख्या गोष्टी आपल्या आयुष्यातून हद्दपार व्हायात हा हेतू या व्रताची महती आहे 🙏🏼 ओम श्री महालक्ष्मी दैव्ये नमः
उत्तर लिहिले · 18/12/2021
कर्म · 121765
6
थोडक्यात सांगायचे झाले तर, पृथ्वीपासून मंगळापर्यंतचे किमान अंतर सुमारे 54.6 दशलक्ष किलोमीटर आहे. दूरवरचे अंतरावर सुमारे 401 दशलक्ष किमी आहे. दोन्ही ग्रहांचे एकमेकांपासून सरासरी अंतर सुमारे 225 दशलक्ष किमी आहे.

आपण विद्या बालन आणि अक्षय कुमार यांचा मिशन मंगल हा सिनेमा पहिला असेलच. राकेश धवन (अक्षय कुमार) हा इस्रोचे प्रमुख असलेल्या विक्रम गोखले यांना मंगळ ग्रहावर एका निश्चित तारखेला रॉकेट लाँच करण्याची विनंती करतो. विनंती करताना तो एक महत्वाची गोष्ट सांगतो. ती म्हणजे, आपण जर त्या ठराविक तारखेला रॉकेट लाँच केले, तरच आपण कमी खर्चात मंगळ ग्रहावर पोहोचू शकतो. आकडेवारी आणि वैज्ञानिक पुराव्यानुसार त्या वेळेस मंगळ ग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असेल. आणि एवढ्या कमी अंतरासाठी पुन्हा प्रयत्न करायचा म्हणजे त्यासाठी बरीच वर्षे वाट बघावी लागेल. विक्रम गोखले यांना या गोष्टीची कल्पना असते. म्हणून पैशांची कमतरता असताना देखील ते अक्षय कुमारला प्रोजेक्ट्साठी मान्यता देतात.

एका वैज्ञानिक प्रश्नामध्ये सिनेमामधील हा प्रसंग सांगायचे तात्पर्य म्हणजे, जरी सूर्यमालेत पृथ्वी आणि मंगळ ग्रह सलग असले, तरी त्यांच्यातील अंतर कमी-जास्त होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे, मंगळ व पृथ्वी यांच्या सूर्याभोवतालच्या कक्षा पूर्ण गोलाकार नसून, किंचित लंबवर्तुळाकार आहेत. म्हणून मंगळ ग्रह दर 26 महिन्यांनी पृथ्वीजवळ येतो. पण हे अंतर प्रत्येक वेळी वेगवेगळे असते.    

सोबत दिलेल्या चित्रावरून आपल्याला अंतरामधील फरकाचा अंदाज आला असेलच. सोबतच सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा वेळ सुद्धा या अंतरावर परिणाम करतो.

यामुळे मंगळ जवळ येताना पृथ्वीपासून 5.57 कोटी ते 10.1 कोटी किलोमीटरपर्यंत येत असतो. त्याच्या या जवळ येण्याचे साधारणपणे 15 ते 17 वर्षांचे चक्र असते. गेल्या काही वर्षांच्या नोंदीनुसार, 2003 मध्ये हा ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या 5.57 कोटी किमी अंतरावर आला होता. 22 मे 2016 रोजी आणि त्यानंतर 30 मे 2016 रोजी मंगळ ग्रह पृथ्वाच्या अगदी जवळ आला होता. पृथ्वीच्या इतक्या जवळ तो याआधी 60,000 वर्षांपूर्वी आला होता. आणि इथून पुढे ऑगस्ट 2287 मध्ये हा ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळ येईल.



धन्यवाद ||
उत्तर लिहिले · 2/8/2021
कर्म · 19610
3
बुध ग्रह हा आपल्या सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
उत्तर लिहिले · 8/3/2021
कर्म · 283280
5
पृथ्वीमध्ये गुरुत्वीय बल असते हे सर्वांना माहिती आहे, आपण त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो. ज्यामुळे पृथ्वी अवकाशात असलेल्या घटकांना आकर्षित करून घेते. त्याचप्रमाणे ती सूर्याला सुद्धा आपल्याकडे आकर्षित करून घेते. तिच्या या शक्तीमुळे तिला स्वतःभोवती व दुसऱ्याभोवती फिरण्याचा वेग मिळालेला असतो. या वेगात ती तिच्या कक्षेभोवती फिरते. सूर्य ही तिला स्वतःकडे खेचून घेतो. यामुळे सूर्य आणि पृथ्वी एकमेकांना स्वतःकडे खेचून घेतात. याच प्रमाणे इतर ग्रह ही कक्षेभोवती फिरत स्वतःचा समतोल राखतात.
उत्तर लिहिले · 20/1/2021
कर्म · 200
4

या विश्वाचा उगम एका महाविस्फोटातून झाला याबद्दल आता जवळजवळ सर्व वैज्ञानिकांचं एकमत झालेलं आहे. सुरुवातीला एक शून्य होतं. त्याचा महाविस्फोट झाला आणि त्यातून आजचं हे विश्व जन्माला आलं. महाविस्फोटातून फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडली. केवळ ऊर्जा आणि वायूंचा महाप्रचंड ढग! म्हणजे त्यावेळी तरी विश्व निराकार होतं. त्याला आकार यायला लागला काही काळानंतर. त्या वायूंच्या, धुळीच्या ढगांमधून हळूहळू तारे, तारकासमूह, आकाशगंगा यांची निर्मिती झा्ली. म्हणजे सर्वात जुन्या ताऱ्यांपेक्षाही विश्वाचं वय जास्त असलं पाहिजे. म्हणूनच वैज्ञानिक विश्वाच्या वयाचा अंदाज बांधण्यासाठी सर्वात जुने तारे कोणते याचा शोध घेतात आणि ते किती जुने आहेत याचं गणित मांडता. ताऱ्यांचा जन्म होतो तसाच त्यांचा मूत्यूही होतो. त्यांच्या आयुष्याचा गाडा मात्र त्यांच्या वजनावर अवलंबून असतो. जे तारे भारदस्त असतात ते अर्थात जास्त तेजस्वी असतात; पण त्यामुळे त्यांच्यामधला हायड्रोजन इंधनाचा साठा लवकर संपतो व ते तसे अल्पायुषी ठरतात. आपला सूर्य हा आपल्याला सर्वात जास्त माहिती असलेला तारा. त्याचं आयुष्य साधारण नऊ अब्ज वर्ष आहे. म्हणजे त्याच्याहून जास्त वजनदार तारे त्यापेक्षा कमी जगतील, तर त्याहून हलके असणाऱ्या ताऱ्यांचं आयुर्मान जास्त असेल. आजवर सर्वात जुने तारे आपल्या सूर्याच्या ७० टक्के वजनाचेच असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात, त्यांचं आयुर्मानही सूयपिक्षा जास्त असणार. तेव्हा त्यांच्या वजनावरून गणित केल्यास त्यांचं वय साधारण ११ ते १८ अब्ज वर्ष असलं पाहिजे. म्हणजेच विश्वाचं वय त्याहूनही जास्त असलं पाहिजे. आता कोणी विचारेल, की हे जे हलके तारे दिसले आहेत ते सर्वात जुने हे कसं समजलं? तर महाविस्फोटानंतर विश्व पसरत गेलं. अजूनही ते पसरतं आहे. तेव्हा या विश्वाच्या टोकाला आपल्यापासून जास्तीत जास्त अंतरावरचे तारे हे सर्वात जुने असले पाहिजेत. कारण जेव्हा कोणतीही वस्तू प्रसरण पावते तेव्हा तिच्या परिघावरच्या वस्तू केंद्रापासून सर्वात दूर असतात. जेव्हा एखादी वस्तू केंद्रापासून जवळ तेवढा त्या वस्तूला दूर जायला कमी वेळ लागेल. उलट सर्वात दूरची वस्तू तिथं पोहोचायला सर्वात जास्त वेळ घेईल. तेव्हा अशा दूरदूरच्या ताऱ्यांचा तपास घेतला तर सर्वात जुने तारे सापडतात. त्यांचीच वयं जर किमान ११ अब्ज वर्ष असतील तर मग विश्वाचं वयही त्यापेक्षा जास्त असायला हवं. याच गणितावरून वैज्ञानिकांनी आता विश्वाचे वय साडेचौदा अब्ज वर्ष असल्याचा निष्कर्ष काढला आहे. वैज्ञानिकांकडे आता याहूनही अचूक निदान करणारी इतर दोन तंत्रं आहेत. ती समजायला किचकट असली तरी त्यांच्या मदतीनं मोजलेलं विश्वाचं वयही १४-१५ अब्ज वर्ष असल्याचे दिसून आलं आहे. संकलन व संकल्पना अनिल देशपांडे बार्शी ९४२३३३२२३३ साभार *डाॅ. बाळ 
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105