ब्रम्हांड

मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलशाला लक्ष्मीप्रमाणे का सजवतात? नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. त्याअर्थी नारळ हा पुरुष रूपात असतो. त्याला स्त्रीस्वरूप सजवणे रास्त आहे का?

2 उत्तरे
2 answers

मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलशाला लक्ष्मीप्रमाणे का सजवतात? नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. त्याअर्थी नारळ हा पुरुष रूपात असतो. त्याला स्त्रीस्वरूप सजवणे रास्त आहे का?

1
खूप छान प्रश्न आहे या चुकीच्या पद्धतीने व्रत होतं असल्याचा महिलांच्या मनातला भाव मला ही पटतं नाही हा मुद्दा मी अनेकदा महिलांच्या पुढे मांडला तेव्हा कुठे काहींना पटला तर काहींना परंपरा कशी मोडायची हा प्रश्न पडला, मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलश मांडायचा पण आपण व्रत करीत आहोत ह्याची साक्ष असावी म्हणून पाच पल्लवं किंवा विड्याची पाने व नारळ कलशावर पुजावे लागते आणि लक्ष्मी ची प्रतिमा, फोटो किंवा चांदीची , पीतळे ची कमळात बसलेली लक्ष्मी पूजेसाठी ठेवावी लागते व त्यास आपल्या आवडी प्रमाणे हार फुले वेणी वगैरे सजवून कहाणी वाचावी व फळं अथवा आपल्या सोयीने प्रसाद दाखवावा असं चार गुरुवार झाल्यानंतर उद्यापन करावे आपल्याला जमेल तसे कोणताही अती खर्च , दिखावा करू नये, नंतर तो नारळ लक्ष्मी किंवा गणपती मंदिरात किंवा आपल्या जवळच्या शक्ती मंदिरात अर्पण करावा किंवा कुणाला पटतं असेल तर वाढवून प्रसाद म्हणून घरीच खाण्यात यावा येथे मनापासून व्रत असावे बाकी उगाच त्याचा वाढीव पणा नकॊ,

या व्रताचा इतका मोठा बाऊ केला जातं आहे की त्यामुळे गरीबाची घरातली लक्ष्मी ऐपत नसताना बाहेर खर्च होते आणि व्यापारी, दुकानदार यांचे कडे भरघोष यश देते, याचे कारण सगळ्याच पूजेच्या सामानाचा भाव दामदुप्पट केला जातो व या व्रताची प्रत्येक गुरुवार च्या पूजेची तयारी 100 तें 125 रुपये इतक्या खर्चात पडते, न परवडणारं आहे पण सांगणार कोण, श्रद्धा व मनातला भाव असेल तर साधी पूजा अगदी दारातल्या झाडाचं पान ही चालतं व घरातल जेवणं ही मान्य होतं इतकं कळलं ना आपल्या माता भगिनी ना तर घरात खरच लक्ष्मी राहिलं व टिकेल ही , आम्ही केव्हाच बदल केला आहे कोणाला पटो अथवा ना पटो,

व्रताची कहाणी हेच सांगते पण अर्थपूर्ण लक्ष देऊन वाचन केल्यास कळते आणि मनातली तळमळ, काही चांगलं होण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी व्हावा व , दारिद्र्य , कर्जबाजारी पणा, आजार या सारख्या गोष्टी आपल्या आयुष्यातून हद्दपार व्हायात हा हेतू या व्रताची महती आहे 🙏🏼 ओम श्री महालक्ष्मी दैव्ये नमः
उत्तर लिहिले · 18/12/2021
कर्म · 121765
0
मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतामध्ये कलशाला लक्ष्मीप्रमाणे सजवण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत:
  • कलश हे समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक: हिंदू धर्मात कलश हे समृद्धी, शुभता आणिpositive उर्जेचे प्रतीक मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजा केली जाते, आणि कलशामध्ये लक्ष्मी देवीचे आवाहन केले जाते. त्यामुळे कलशाला लक्ष्मीप्रमाणे सजवणे म्हणजे घरात समृद्धी आणिpositive ऊर्जा आकर्षित करणे आहे.
  • नारळ: नारळ हे फळ शुभ आणि पवित्र मानले जाते. नारळाला श्रीफळ देखील म्हणतात आणि ते गणपती बाप्पाला अर्पण केले जाते. नारळ हे fertility आणि abundance चे प्रतीक आहे.
  • लक्ष्मी देवीची कृपा: मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतामध्ये लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. कलशाला लक्ष्मीप्रमाणे सजवल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि भक्तांना सुख, समृद्धी आणिpositive आरोग्य प्रदान करते, अशी मान्यता आहे.
नारळाला स्त्री स्वरूप सजवणे योग्य आहे की नाही, याबद्दल काही विचार:
  • लिंगभाव (Gender) आणि प्रतीके: हिंदू धर्मात प्रतीकांना विशेष महत्त्व आहे. नारळ हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक असले तरी, लक्ष्मी ही देखील एक महत्त्वपूर्ण देवी आहे, जी सृजन, पोषण आणि समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे, नारळाला लक्ष्मीचे रूप देणे हे सृजनात्मक आणि सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते.
  • स्त्री-शक्तीचा आदर: नारळाला लक्ष्मीप्रमाणे सजवणे म्हणजे स्त्री-शक्तीचा आदर करणे आहे. हिंदू धर्मात स्त्री-शक्तीला आदराने पूजले जाते आणि तिला दैवी रूप मानले जाते.
  • प्रतीकात्मकता: धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू या प्रतीकात्मक असतात. नारळाला लक्ष्मीप्रमाणे सजवणे हे केवळ एक प्रतीक आहे, जे भक्तांना देवी लक्ष्मीच्या गुणांची आठवण करून देते आणि तिच्याप्रती आदर व्यक्त करते.
त्यामुळे, नारळ पुरुष रूपात असले तरी, त्याला लक्ष्मीचे रूप देणे हे धार्मिक परंपरेचा एक भाग आहे आणि ते स्त्री-शक्तीच्या आदराचे प्रतीक आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे रस काय?
जर माणूस कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय ओझोन थराच्या वर गेला तर काय होईल? हनुमान, कार्तिक, तसेच इतर देवता पृथ्वीच्या वर अंतरिक्षात कसे जाऊ शकले? हे विज्ञान आहे की चमत्कार? काय मी हे समजू की देवता प्राचीन परग्रही एलियन्स होते?
मंगळ ग्रह पृथ्वी पासून किती किलोमीटर अंतरावर आहे?
सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
ग्रह कुठलाही आधार नसताना तरंगतात कसे?
विश्वाचं वय कसे मोजतात?
प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो, मग या ब्रह्मांडाचा शेवट का नाही?