ब्रम्हांड अंतराळ पृथ्वी

मंगळ ग्रह पृथ्वी पासून किती किलोमीटर अंतरावर आहे?

2 उत्तरे
2 answers

मंगळ ग्रह पृथ्वी पासून किती किलोमीटर अंतरावर आहे?

6
थोडक्यात सांगायचे झाले तर, पृथ्वीपासून मंगळापर्यंतचे किमान अंतर सुमारे 54.6 दशलक्ष किलोमीटर आहे. दूरवरचे अंतरावर सुमारे 401 दशलक्ष किमी आहे. दोन्ही ग्रहांचे एकमेकांपासून सरासरी अंतर सुमारे 225 दशलक्ष किमी आहे.

आपण विद्या बालन आणि अक्षय कुमार यांचा मिशन मंगल हा सिनेमा पहिला असेलच. राकेश धवन (अक्षय कुमार) हा इस्रोचे प्रमुख असलेल्या विक्रम गोखले यांना मंगळ ग्रहावर एका निश्चित तारखेला रॉकेट लाँच करण्याची विनंती करतो. विनंती करताना तो एक महत्वाची गोष्ट सांगतो. ती म्हणजे, आपण जर त्या ठराविक तारखेला रॉकेट लाँच केले, तरच आपण कमी खर्चात मंगळ ग्रहावर पोहोचू शकतो. आकडेवारी आणि वैज्ञानिक पुराव्यानुसार त्या वेळेस मंगळ ग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असेल. आणि एवढ्या कमी अंतरासाठी पुन्हा प्रयत्न करायचा म्हणजे त्यासाठी बरीच वर्षे वाट बघावी लागेल. विक्रम गोखले यांना या गोष्टीची कल्पना असते. म्हणून पैशांची कमतरता असताना देखील ते अक्षय कुमारला प्रोजेक्ट्साठी मान्यता देतात.

एका वैज्ञानिक प्रश्नामध्ये सिनेमामधील हा प्रसंग सांगायचे तात्पर्य म्हणजे, जरी सूर्यमालेत पृथ्वी आणि मंगळ ग्रह सलग असले, तरी त्यांच्यातील अंतर कमी-जास्त होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे, मंगळ व पृथ्वी यांच्या सूर्याभोवतालच्या कक्षा पूर्ण गोलाकार नसून, किंचित लंबवर्तुळाकार आहेत. म्हणून मंगळ ग्रह दर 26 महिन्यांनी पृथ्वीजवळ येतो. पण हे अंतर प्रत्येक वेळी वेगवेगळे असते.    

सोबत दिलेल्या चित्रावरून आपल्याला अंतरामधील फरकाचा अंदाज आला असेलच. सोबतच सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा वेळ सुद्धा या अंतरावर परिणाम करतो.

यामुळे मंगळ जवळ येताना पृथ्वीपासून 5.57 कोटी ते 10.1 कोटी किलोमीटरपर्यंत येत असतो. त्याच्या या जवळ येण्याचे साधारणपणे 15 ते 17 वर्षांचे चक्र असते. गेल्या काही वर्षांच्या नोंदीनुसार, 2003 मध्ये हा ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या 5.57 कोटी किमी अंतरावर आला होता. 22 मे 2016 रोजी आणि त्यानंतर 30 मे 2016 रोजी मंगळ ग्रह पृथ्वाच्या अगदी जवळ आला होता. पृथ्वीच्या इतक्या जवळ तो याआधी 60,000 वर्षांपूर्वी आला होता. आणि इथून पुढे ऑगस्ट 2287 मध्ये हा ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळ येईल.



धन्यवाद ||
उत्तर लिहिले · 2/8/2021
कर्म · 19610
0

मंगळ ग्रह पृथ्वीपासून त्याच्या कक्षीय स्थितीनुसार कमी-जास्त अंतरावर असतो. सर्वात कमी अंतर सुमारे 54.6 दशलक्ष किलोमीटर (5.46 कोटी किलोमीटर) असते. जेव्हा मंगळ आणि पृथ्वी एकमेकांच्या जवळ असतात, तेव्हा हे अंतर खालीलप्रमाणे असते:

  • सर्वात कमी अंतर: सुमारे 54.6 दशलक्ष किलोमीटर (33.9 दशलक्ष मैल).
  • सरासरी अंतर: सुमारे 225 दशलक्ष किलोमीटर (140 दशलक्ष मैल).

हे अंतर सतत बदलत असते कारण दोन्ही ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या गती आणि अंडाकार कक्षांमध्ये फिरतात.

अधिक माहितीसाठी, आपण नासा (NASA) किंवा इतर खगोलशास्त्रावरील वेबसाइट्सला भेट देऊ शकता.

उदाहरणार्थ: नासा - मंगळ ग्रह

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 860

Related Questions

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे रस काय?
जर माणूस कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय ओझोन थराच्या वर गेला तर काय होईल? हनुमान, कार्तिक, तसेच इतर देवता पृथ्वीच्या वर अंतरिक्षात कसे जाऊ शकले? हे विज्ञान आहे की चमत्कार? काय मी हे समजू की देवता प्राचीन परग्रही एलियन्स होते?
मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलशाला लक्ष्मीप्रमाणे का सजवतात? नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. त्याअर्थी नारळ हा पुरुष रूपात असतो. त्याला स्त्रीस्वरूप सजवणे रास्त आहे का?
सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
ग्रह कुठलाही आधार नसताना तरंगतात कसे?
विश्वाचं वय कसे मोजतात?
प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो, मग या ब्रह्मांडाचा शेवट का नाही?