ब्रम्हांड अंतराळ

विश्वाचं वय कसे मोजतात?

2 उत्तरे
2 answers

विश्वाचं वय कसे मोजतात?

4

या विश्वाचा उगम एका महाविस्फोटातून झाला याबद्दल आता जवळजवळ सर्व वैज्ञानिकांचं एकमत झालेलं आहे. सुरुवातीला एक शून्य होतं. त्याचा महाविस्फोट झाला आणि त्यातून आजचं हे विश्व जन्माला आलं. महाविस्फोटातून फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडली. केवळ ऊर्जा आणि वायूंचा महाप्रचंड ढग! म्हणजे त्यावेळी तरी विश्व निराकार होतं. त्याला आकार यायला लागला काही काळानंतर. त्या वायूंच्या, धुळीच्या ढगांमधून हळूहळू तारे, तारकासमूह, आकाशगंगा यांची निर्मिती झा्ली. म्हणजे सर्वात जुन्या ताऱ्यांपेक्षाही विश्वाचं वय जास्त असलं पाहिजे. म्हणूनच वैज्ञानिक विश्वाच्या वयाचा अंदाज बांधण्यासाठी सर्वात जुने तारे कोणते याचा शोध घेतात आणि ते किती जुने आहेत याचं गणित मांडता. ताऱ्यांचा जन्म होतो तसाच त्यांचा मूत्यूही होतो. त्यांच्या आयुष्याचा गाडा मात्र त्यांच्या वजनावर अवलंबून असतो. जे तारे भारदस्त असतात ते अर्थात जास्त तेजस्वी असतात; पण त्यामुळे त्यांच्यामधला हायड्रोजन इंधनाचा साठा लवकर संपतो व ते तसे अल्पायुषी ठरतात. आपला सूर्य हा आपल्याला सर्वात जास्त माहिती असलेला तारा. त्याचं आयुष्य साधारण नऊ अब्ज वर्ष आहे. म्हणजे त्याच्याहून जास्त वजनदार तारे त्यापेक्षा कमी जगतील, तर त्याहून हलके असणाऱ्या ताऱ्यांचं आयुर्मान जास्त असेल. आजवर सर्वात जुने तारे आपल्या सूर्याच्या ७० टक्के वजनाचेच असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात, त्यांचं आयुर्मानही सूयपिक्षा जास्त असणार. तेव्हा त्यांच्या वजनावरून गणित केल्यास त्यांचं वय साधारण ११ ते १८ अब्ज वर्ष असलं पाहिजे. म्हणजेच विश्वाचं वय त्याहूनही जास्त असलं पाहिजे. आता कोणी विचारेल, की हे जे हलके तारे दिसले आहेत ते सर्वात जुने हे कसं समजलं? तर महाविस्फोटानंतर विश्व पसरत गेलं. अजूनही ते पसरतं आहे. तेव्हा या विश्वाच्या टोकाला आपल्यापासून जास्तीत जास्त अंतरावरचे तारे हे सर्वात जुने असले पाहिजेत. कारण जेव्हा कोणतीही वस्तू प्रसरण पावते तेव्हा तिच्या परिघावरच्या वस्तू केंद्रापासून सर्वात दूर असतात. जेव्हा एखादी वस्तू केंद्रापासून जवळ तेवढा त्या वस्तूला दूर जायला कमी वेळ लागेल. उलट सर्वात दूरची वस्तू तिथं पोहोचायला सर्वात जास्त वेळ घेईल. तेव्हा अशा दूरदूरच्या ताऱ्यांचा तपास घेतला तर सर्वात जुने तारे सापडतात. त्यांचीच वयं जर किमान ११ अब्ज वर्ष असतील तर मग विश्वाचं वयही त्यापेक्षा जास्त असायला हवं. याच गणितावरून वैज्ञानिकांनी आता विश्वाचे वय साडेचौदा अब्ज वर्ष असल्याचा निष्कर्ष काढला आहे. वैज्ञानिकांकडे आता याहूनही अचूक निदान करणारी इतर दोन तंत्रं आहेत. ती समजायला किचकट असली तरी त्यांच्या मदतीनं मोजलेलं विश्वाचं वयही १४-१५ अब्ज वर्ष असल्याचे दिसून आलं आहे. संकलन व संकल्पना अनिल देशपांडे बार्शी ९४२३३३२२३३ साभार *डाॅ. बाळ 
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

विश्वाचे वय मोजण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, त्यापैकी काही प्रमुख पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

1. महास्फोटाच्या (Big Bang) अवशेषांचा अभ्यास:

  • सुरुवातीच्या महास्फोटानंतरच्या प्रकाशाचा अभ्यास केला जातो, ज्याला 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशन' (Cosmic Microwave Background Radiation) म्हणतात.
  • या अवशेषांचे विश्लेषण करून विश्वाच्या निर्मितीच्या वेळेचा आणि त्यानंतरच्या विकासाचा अंदाज बांधता येतो.

2. ताऱ्यांचे वय आणि जीवनकाल:

  • सर्वात जुन्या ताऱ्यांचा अभ्यास केला जातो. ताऱ्यांचे प्रकार, त्यांचे तापमान आणि चमक यानुसार त्यांचे वय ठरवले जाते.
  • globular clusters मधील तारे हे विश्वातील सर्वात जुने तारे मानले जातात, त्यामुळे त्यांचे वय मोजून विश्वाच्या वयाचा अंदाज येतो.

3. विश्वाचा विस्तार (Expansion of the Universe):

  • एडविन हबल (Edwin Hubble) यांनी 1920 मध्ये सर्वप्रथम हे सिद्ध केले की विश्व सतत विस्तारत आहे.
  • आकाशगंगा (galaxies) किती वेगाने दूर जात आहेत, हे मोजण्यासाठी हबल स्थिरांक (Hubble Constant) वापरला जातो. यावरून विश्वाचा विस्तार दर काढला जातो आणि त्याद्वारे विश्वाचे वय निश्चित केले जाते.

4. रेडिओमेट्रीक डेटिंग (Radiometric Dating):

  • जमिनीवरील सर्वात जुन्या खडकांचे वय कार्बन डेटिंग (Carbon dating) आणि इतर किरणोत्सर्गी (radioactive) पद्धती वापरून मोजले जाते.
  • meteorites आणि इतर खगोलीय वस्तूंचे वय मोजूनही विश्वाच्या वयाचा अंदाज बांधता येतो.

सध्याच्या वैज्ञानिक संशोधनानुसार, विश्वाचे वय सुमारे 13.8 अब्ज (billion) वर्षे आहे.

अधिक माहितीसाठी:

  1. NASA - Universe Facts
  2. ESA - Planck reveals an older Universe
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 860

Related Questions

अंतराळात ग्रह कसे फिरतात, तेथे हवा का नसते?
सुनिता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिली व कशासाठी?
सुनिता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिल्या व कशासाठी राहिल्या?
मिशन ज्यूस हे कोणत्या अंतराळ संस्थेचे मिशन आहे?
सुनिता विलियम्स अंतराळात?
भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळ संशोधनात घेतलेल्या गरुड भरारीचे वर्णन करा.
सुनिता উইলিয়াম्स अंतराळात किती दिवस राहिल्या व कशासाठी?