भारताचा इतिहास
आजार
निकाल
जीवन
ड जीवन स्वतःच्या यामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो दज घेऊन निकाल?
मूळ प्रश्न: ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो?
ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो
1 उत्तर
1
answers
ड जीवन स्वतःच्या यामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो दज घेऊन निकाल?
1
Answer link
☰
आरोग्य
बाल आरोग्य
जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार
'ड' जीवनसत्त्वाचा अभाव (मुडदूस)
हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. 'ड'जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांमध्ये चुन्याचे क्षार न जमल्याने हाडे दुबळी व मऊ बनतात.
लक्षणे व रोगनिदान
अशा मुलांचे कपाळ पुढे आलेले दिसते.
घाम जास्त येतो.
पुढची टाळू वर्षानंतरही वयाच्या प्रमाणात भरलेली नसते.
एरवी एक वर्ष वयाला खूपच थोडी टाळू शिल्लक राहिलेली असते व दीड वर्षापर्यंत भरून येते.
विकासाचे टप्पे लांबतात. उदा. आठ-नऊ महिन्यांचे झाले तरी अजून बाळ बसत नाही, एक वर्षाचे मूल उभे राहत नाही, चालण्याचे वय लांबते.
सांध्याच्या बाजूची हाडांची टोके फुगतात व सांधे सुजल्यासारखे दिसतात (विशेषत: मनगटे, गुडघे),
छातीच्या फासळया व पायांना बाक येतो.
पोट मोठे दिसते.
प्रतिबंधक उपाय
दूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये 'ड' जीवनसत्त्व भरपूर असते. सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली 'ड' जीवनसत्त्व त्यार होत असते. म्हणून मुले बाहेर हिंडायच्या वयाची झाली, की मुडदूस आपोआप कमी होतो. बाळास रोज सकाळच्या कोवळया उन्हात 15 मिनिटे ठेवल्यास 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागते.
उपचार
'ड' जीवनसत्त्वाची पुडी एकदाच दूधातून द्यावी. 'ड' जीवनसत्त्वाचा डोस दर सहा महिन्यांतून एकदा देता येतो.