निकाल
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
☰
आरोग्य
बाल आरोग्य
जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार
'ड' जीवनसत्त्वाचा अभाव (मुडदूस)
हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. 'ड'जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांमध्ये चुन्याचे क्षार न जमल्याने हाडे दुबळी व मऊ बनतात.
लक्षणे व रोगनिदान
अशा मुलांचे कपाळ पुढे आलेले दिसते.
घाम जास्त येतो.
पुढची टाळू वर्षानंतरही वयाच्या प्रमाणात भरलेली नसते.
एरवी एक वर्ष वयाला खूपच थोडी टाळू शिल्लक राहिलेली असते व दीड वर्षापर्यंत भरून येते.
विकासाचे टप्पे लांबतात. उदा. आठ-नऊ महिन्यांचे झाले तरी अजून बाळ बसत नाही, एक वर्षाचे मूल उभे राहत नाही, चालण्याचे वय लांबते.
सांध्याच्या बाजूची हाडांची टोके फुगतात व सांधे सुजल्यासारखे दिसतात (विशेषत: मनगटे, गुडघे),
छातीच्या फासळया व पायांना बाक येतो.
पोट मोठे दिसते.
प्रतिबंधक उपाय
दूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये 'ड' जीवनसत्त्व भरपूर असते. सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली 'ड' जीवनसत्त्व त्यार होत असते. म्हणून मुले बाहेर हिंडायच्या वयाची झाली, की मुडदूस आपोआप कमी होतो. बाळास रोज सकाळच्या कोवळया उन्हात 15 मिनिटे ठेवल्यास 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागते.
उपचार
'ड' जीवनसत्त्वाची पुडी एकदाच दूधातून द्यावी. 'ड' जीवनसत्त्वाचा डोस दर सहा महिन्यांतून एकदा देता येतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link
परीक्षेची परीक्षा
मार्च २०२० उगवला आणि परीक्षा कालावधी असल्याने सारेच तयारीला लागले. मार्च महिना म्हटला, की शाळांमध्ये सुरू असते परीक्षांची धावपळ. विद्यार्थी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली.
अशावेळी नेमकं जगभरातून कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या बातम्या येऊ लागल्या आणि एकामागोमाग शहर बंद झाले. कोरोना या रोगांवर कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये 'बंद' घोषित केला.
मग अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्वच सेवा बंद केल्या. शाळा बंद झाल्या. सुरू असलेल्या परीक्षा थांबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. कोणालाही काही कळत नव्हते. सामाजिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. 'जसा पावसाळा' हा ऋतू या धर्तीवर | नियमित येतो 'तसेच नियमित येती परीक्षा' असे समजून परीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी दिवसरात्र | मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली. अनेक विद्यार्थी खूश होते. काही जणांची परीक्षा झाली, तर काही जण परीक्षेची वाट पाहत राहिले. कोरोनाने जणू परीक्षेची परीक्षा घेतली होती. विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली होती. आपण पास होणार की नापास? आपल्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार, की नाही या चिंतेत सारा विद्यार्थीवर्ग होता. अशातच निकाल जाहिर झाले. न झालेल्या विषयांच्या पेपरचे गुण सरासरी गुणांच्या आधारे देऊन निकाल देण्यात आला होता. अनेकांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. जवळपास सारे विद्यार्थी आनंदीत होते. काहीजणांना, तर परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात संधीमिळाली होती. या साऱ्या परिस्थितीचा सामना केल्यावर एका गोष्टीचा बोध झाला, की निसर्गापुढे माणूस अगदी शून्य आहे. निसर्ग ही मानवाची निर्मिती नाही, तर मानव हा निसर्गाची निर्मिती आहे, मानवाला आपले स्थान या निसर्गाने दाखवून दिले. निसर्गावर विजय मिळवू पाहणाऱ्या | माणसाला त्याने वठणीवर आणले.
तात्पर्य: निसर्गापुढे मानव शून्य आहे, त्याचा | समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मानवाचा विनाश पक्का आहे.