परीक्षा निकाल कोरोना

कथालेखन कसे कराल? मार्च २०२० --परीक्षा कालावधी.... विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव .--.-सामाजिक परिस्थिती-विद्यार्थ्याची निराशा निकाल बोध

2 उत्तरे
2 answers

कथालेखन कसे कराल? मार्च २०२० --परीक्षा कालावधी.... विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव .--.-सामाजिक परिस्थिती-विद्यार्थ्याची निराशा निकाल बोध

2
परीक्षेची परीक्षा

मार्च २०२० उगवला आणि परीक्षा कालावधी असल्याने सारेच तयारीला लागले. मार्च महिना म्हटला, की शाळांमध्ये सुरू असते परीक्षांची धावपळ. विद्यार्थी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली.

अशावेळी नेमकं जगभरातून कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या बातम्या येऊ लागल्या आणि एकामागोमाग शहर बंद झाले. कोरोना या रोगांवर कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये 'बंद' घोषित केला.

मग अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्वच सेवा बंद केल्या. शाळा बंद झाल्या. सुरू असलेल्या परीक्षा थांबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. कोणालाही काही कळत नव्हते. सामाजिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. 'जसा पावसाळा' हा ऋतू या धर्तीवर | नियमित येतो 'तसेच नियमित येती परीक्षा' असे समजून परीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी दिवसरात्र | मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली. अनेक विद्यार्थी खूश होते. काही जणांची परीक्षा झाली, तर काही जण परीक्षेची वाट पाहत राहिले. कोरोनाने जणू परीक्षेची परीक्षा घेतली होती. विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली होती. आपण पास होणार की नापास? आपल्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार, की नाही या चिंतेत सारा विद्यार्थीवर्ग होता. अशातच निकाल जाहिर झाले. न झालेल्या विषयांच्या पेपरचे गुण सरासरी गुणांच्या आधारे देऊन निकाल देण्यात आला होता. अनेकांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. जवळपास सारे विद्यार्थी आनंदीत होते. काहीजणांना, तर परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात संधीमिळाली होती. या साऱ्या परिस्थितीचा सामना केल्यावर एका गोष्टीचा बोध झाला, की निसर्गापुढे माणूस अगदी शून्य आहे. निसर्ग ही मानवाची निर्मिती नाही, तर मानव हा निसर्गाची निर्मिती आहे, मानवाला आपले स्थान या निसर्गाने दाखवून दिले. निसर्गावर विजय मिळवू पाहणाऱ्या | माणसाला त्याने वठणीवर आणले.

तात्पर्य: निसर्गापुढे मानव शून्य आहे, त्याचा | समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मानवाचा विनाश पक्का आहे.
उत्तर लिहिले · 13/3/2022
कर्म · 130
0

कथालेखन करण्यासाठी, खालील गोष्टी विचारात घ्या:

शीर्षक: "कोरोना आणि परीक्षा"

कथानक:

  • मार्च २०२० - परीक्षा कालावधी:

    मार्च २०२० मध्ये परीक्षा सुरू होतात आणि विद्यार्थी तयारीला लागतात.

  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव:

    अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि परीक्षा रद्द होण्याची शक्यता निर्माण होते.

  • सामाजिक परिस्थिती:

    लॉकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असते, लोकांना घरातच थांबावे लागते.

  • विद्यार्थ्यांची निराशा:

    परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी निराश होतात, त्यांची वर्षभराची मेहनत वाया जाते की काय, असे त्यांना वाटते.

  • निकाल:

    सरकार निकाल जाहीर करते, विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या गुणांवर आधारित निकाल मिळतो.

कथेतील पात्रे:

  • विद्यार्थी (उदाहरण: राम, सीता)
  • शिक्षक
  • पालक

कथेतील संवाद:

पात्रांमधील संवाद नैसर्गिक आणि भावनात्मक असावेत.

बोध:

संकटकाळात खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. परिस्थितीचा सामना धैर्याने करावा.

उदाहरण कथा:

राम आणि सीता हे दोघे मित्र होते. ते दहावीच्या परीक्षेची तयारी करत होते. मार्च २०२० मध्ये परीक्षा सुरू झाल्या, पण कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. त्यांना खूप दुःख झाले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले आणि पुढील वर्षाच्या परीक्षेची तयारी केली.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 180

Related Questions

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन (postmortem) करणे योग्य आहे का, याबद्दल तज्ञांचे मत काय आहे?
आज रोजी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय माहिती सांगा?
कोरोना व्हायरस कोणत्या घटकांपासून बनलेला आहे?
कोरोनासाठी कोणती फवारणी करावी?
भारतामध्ये कोरोना वायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणती रसायने फवारली जातात?
कोरोनामध्ये स्वत:वर व परिवारावर कोणते परिणाम झाले याचे २०० ते ३०० शब्दांत वर्णन कसे कराल?
कोरोनावर निबंध कसा लिहाल?