मराठी कविता

आकाशात कवीला इंद्रधनुष्य पाहून काय वाटते?

1 उत्तर
1 answers

आकाशात कवीला इंद्रधनुष्य पाहून काय वाटते?

1
आकाशात कवीला इंद्रधनुष्य पाहून काय वाटले या कवितेत आहे 
श्रावणमासी हर्ष मानसी 

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे



देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

– बालकवी


कवितेचा अर्थ

श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते. क्षणात पाऊस पडतो, तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते. ऊनपावसाच हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपेडी गोफ विणलेला दिसतो. इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की, कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे.

ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला नि संध्याकाळ झाली असे वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन, उंच घरांवर नि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात जणू ते ढग संध्याराग गात आहेत ! सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणी (चित्रकाराने) रेखाटले आहे असे वाटते.


उत्तर लिहिले · 12/8/2022
कर्म · 48555

Related Questions

कथेची संकलपणा स्पश्ठ करा?
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण कोणते येईल? धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दुधभात भरवीन?
केशवसुतांच्या प्रीती कवितेतून कशाची माहिती सांगितली आहे?
मराठी काव्याचा प्रभात काल असे कोणी म्हटले आहे?
कवितेची व्याख्या कशी स्पष्ट कराल?
बहिणीसाठी एक कविता मिळेल का?
आशयानुसार कवितेचे प्रकार कोणते ते थोडक्यात कसे स्पष्ट कराल?