मराठी भाषा मराठी कविता

बहिणीसाठी एक कविता मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

बहिणीसाठी एक कविता मिळेल का?

4
बहीण म्हणजे आपली दुसरी आई,
आपला सांभाळ करणारी,
आभ्यास राहिला तर पूर्ण करणारी,
आई नसेल तर खाऊ घालणारी,
खरचटलं तर तेल लावून देणारी,
आपल्यावर ओरडणारी,
कधी कधी राग आला की चिडणारी,
परत सॉरी म्हणून सोडून देणारी,
प्रश्न विचारला की नाही माहीत अस म्हणून टाकणारी,
सतत आपल्याला अभ्यास कर असं सांगणारी,
शेवटी बहीण आहे म्हणजे सगळं व्यवस्थित समजून सांगणारी म्हणाजे बहीण असणारी  
उत्तर लिहिले · 15/10/2022
कर्म · 110
1
            
        🥀🌹
छोटेसे बहिण – भाऊ ,

उद्याला मोठाले होऊ

उद्याच्या जगाला ,उद्याच्या युगाला

नवीन आकार देऊ

ओसाड उजाड जागा , होतील सुंदर बागा

शेतांना मळ्यांना , फुलांना फळांना

नवीन बहार देऊ मोकळ्या आभाळी जाऊ ,

मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने ,

आनंदभराने आनंद देऊ अन घेऊ प्रेमाने एकत्र राहू ,

नवीन जीवन पाहू , अनेक देशांचे ,

भाषांचे , वेशांचे अनेक

एकत्र होऊ कवी

 – वसंत बापट


          🥀🌹🌹
बहिण

।। मायेचं साजुक तुप

आईचं दुसरं रूप।।

।। काळजी रूपी धाक

प्रेमळ तिची हाक।।

।। कधी बचावाची ढाल

कधी मायेची उबदार शाल।।

।। ममतेचं रान ओलांचिंब

पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

।। दुःखाच्या डोहावरील

आधाराचा सेतू।।

।। निरपेक्ष प्रेमामागे

ना कुठला हेतू।।

।।कधी मन धरणारी ,

तर कधी कान धरणारी.।।

।।कधी हक्काने रागवणारी,

तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

।।बहिणीचा रुसवा जणु,

खेळ उन-सावलीचा.।।

।।भरलेले डोळे पुसाया

आधार माय- माऊलीचा.।।

।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी

या नात्यात ओढ आहे.।।

।।म्हणूनच बहिणीचं हे नातं

चिरंतन गोड आहे.।।

।।भरलेलं आभाळ रितं कराया

तिचीच ओंजळ पुढे येई .।।

।।जागा जननीची भरुन

काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।



🌺🌹🌹आईसमान भासते मोठ्या बहिणीची माया,

वटवृक्षाप्रमाणे तिची निःस्वार्थ छाया,

न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव,

प्रसंगी माझ्या ओठी फक्त तिचेच नाव..!!

जिद्दीने हिम्मतीने गाठले तू यशाचे शिखर,

मावशी-काकांचे झाले स्वप्न साकार,

कुठे दूरदेशी जाऊन स्वप्न साकारते आहेस,

सर्वांच्या सुखासाठीच तर झटते आहेस..!!

कठीण समयी देतेस मला तू कायम साथ,

असावा माझ्या माथ्यावर तुझ्या आशिर्वादाचा हात,

सासर-माहेर कुटुंबाचा अतूट विश्वास तू,

आधार देण्या त्यांना जणू आधारवड तू..!!

दुःखाची सर कधी तुजपाशी न यावी,

प्रत्येक जन्मी तू मला

दीदी म्हणून हवी,

रहाविस तू खूप सुखी आणि

आनंदी हीच माझी इच्छा,

–वसुंधरा

🌹🥀🌸
बहीण मायेचं साजूक तूप,
आईचं दुसरे रूप |
काळजी रुपी धाक,
प्रेमळ तिची हाक |
कधी बचावाची ढाल,
कधी मायेची उबदार शाल |
ममतेच रान ओलेचिंब
पाण्यातले आपलेच प्रतिबिंब |
बहीणीचं प्रेम हे
अथांग समुद्रासारखं,
निखळ असं नातं
आयुष्यभर जपण्याचं,
इथे असतो फक्त जिव्हाळा
अन असतो अतूट विश्वास,
बंधन नसतं कुठलं त्यात
निर्मळ हास्याचं असतं खास,
सोन्याहून सुंदर असं
जगात आहे अनमोल,
नातं असं हे आपुलकीचं
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं
❤️❤️❤️❤️
बहीण न सांगताच मनातलं

ओळखणारी अग काय झालंय

सांग ना ” प्रेमाने विचारणारी ..

काहीही कारण नसताना भांडण

करणारी रागाचे दोन शब्द

ऐकवुन रडवणारी .. ” पुरे झाले

तुझे नखरे आता ” असं रागाने

म्हणणारी पुन्हा प्रेमाने जवळ

घेऊन समजवणारी ..

बोलता बोलता मधेच आठवणींमध्ये

रमून जाणारी लग्नाचा विषय

काढला की डोळ्यात पाणी आणणारी ..

सासरी जाताना शेवटचं एकदा

मिठी मारून रडणारी ” नाही

आता कुणी तुला ओरडणार “

असं रडता रडता म्हणणारी ..

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी

‘ बहीण ‘ असावी जीवापाड जपणारी

न खुप खुप प्रेम करणारी ..

-नंदिता पाटील

बहिण

।। मायेचं साजुक तुप

आईचं दुसरं रूप।।

।। काळजी रूपी धाक

प्रेमळ तिची हाक।।

।। कधी बचावाची ढाल

कधी मायेची उबदार शाल।।

।। ममतेचं रान ओलांचिंब

पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

।। दुःखाच्या डोहावरील

आधाराचा सेतू।।

।। निरपेक्ष प्रेमामागे

ना कुठला हेतू।।

।।कधी मन धरणारी ,

तर कधी कान धरणारी.।।

।।कधी हक्काने रागवणारी,

तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

।।बहिणीचा रुसवा जणु,

खेळ उन-सावलीचा.।।

।।भरलेले डोळे पुसाया

आधार माय- माऊलीचा.।।

।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी

या नात्यात ओढ आहे.।।

।।म्हणूनच बहिणीचं हे नातं

चिरंतन गोड आहे.।।

।।भरलेलं आभाळ रितं कराया

तिचीच ओंजळ पुढे येई .।।

।।जागा जननीची भरुन

काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।


🌺🌹🌹
आईसमान भासते मोठ्या बहिणीची माया,

वटवृक्षाप्रमाणे तिची निःस्वार्थ छाया,

न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव,

प्रसंगी माझ्या ओठी फक्त तिचेच नाव..!!

जिद्दीने हिम्मतीने गाठले तू यशाचे शिखर,

मावशी-काकांचे झाले स्वप्न साकार,

कुठे दूरदेशी जाऊन स्वप्न साकारते आहेस,

सर्वांच्या सुखासाठीच तर झटते आहेस..!!

कठीण समयी देतेस मला तू कायम साथ,

असावा माझ्या माथ्यावर तुझ्या आशिर्वादाचा हात,

सासर-माहेर कुटुंबाचा अतूट विश्वास तू,

आधार देण्या त्यांना जणू आधारवड तू..!!

दुःखाची सर कधी तुजपाशी न यावी,

प्रत्येक जन्मी तू मला

दीदी म्हणून हवी,

रहाविस तू खूप सुखी आणि

आनंदी हीच माझी इच्छा,

–वसुंधरा

🌹🥀🌸

आज सकाळपासूनच बहिण

आठवत होती एकसारखी

सहज पाहिले नभात संध्येच्या

रंगीत ढगांची बनलेली राखी.आईसमान भासते मोठ्या बहिणीची माया,

वटवृक्षाप्रमाणे तिची निःस्वार्थ छाया,

न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव,

प्रसंगी माझ्या ओठी फक्त तिचेच नाव..!!

जिद्दीने हिम्मतीने गाठले तू यशाचे शिखर,

मावशी-काकांचे झाले स्वप्न साकार,

कुठे दूरदेशी जाऊन स्वप्न साकारते आहेस,

सर्वांच्या सुखासाठीच तर झटते आहेस..!!

कठीण समयी देतेस मला तू कायम साथ,

असावा माझ्या माथ्यावर तुझ्या आशिर्वादाचा हात,

सासर-माहेर कुटुंबाचा अतूट विश्वास तू,

आधार देण्या त्यांना जणू आधारवड तू..!!

दुःखाची सर कधी तुजपाशी न यावी,

प्रत्येक जन्मी तू मला

दीदी म्हणून हवी,

रहाविस तू खूप सुखी आणि

आनंदी हीच माझी इच्छा,

–वसुंधरा

उत्तर लिहिले · 24/5/2022
कर्म · 48555

Related Questions

कथेची संकलपणा स्पश्ठ करा?
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण कोणते येईल? धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दुधभात भरवीन?
केशवसुतांच्या प्रीती कवितेतून कशाची माहिती सांगितली आहे?
आकाशात कवीला इंद्रधनुष्य पाहून काय वाटते?
मराठी काव्याचा प्रभात काल असे कोणी म्हटले आहे?
कवितेची व्याख्या कशी स्पष्ट कराल?
आशयानुसार कवितेचे प्रकार कोणते ते थोडक्यात कसे स्पष्ट कराल?