मराठी कविता
मराठी काव्याचा प्रभात काल असे कोणी म्हटले आहे?
1 उत्तर
1
answers
मराठी काव्याचा प्रभात काल असे कोणी म्हटले आहे?
0
Answer link
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची प्रेरणा स्वतंत्र आहे, हे खरे. शाहिरांनी त्यांची रचना पूर्वीच्या संस्कृत-मराठी कवींची रचना डोळ्यांसमोर ठेवून केलेली नाही. त्यांचे काव्य लोकजीवनातून निर्माण झाले. त्यामुळे त्यांचा अविष्कार नाविन्यपूर्ण व ताजातवाना आहे. शाहीर हे खऱ्या अर्थाने लोककवी होत. शाहिरी काव्य शिवकाळापासून सुरू झाले, पेशवाईबरोबर वाढले आणि तेथेच विराम पावले. त्यानंतर त्याची पुनरावृत्ती व रूढ अनुकरण होऊ लागले. त्यापूर्वी यादवकालीन वाङ्मयात मधूनमधून शाहीर, गोंधळी, भाट इत्यादींचे उल्लेख आढळतात. शिवपूर्वकाळात एकनाथांचे गोंधळ, भारुडे, पाईक, गौळणी इत्यादीचे उल्लेख आढळले होते. तत्पूर्वीही ते असावेत, त्यातून कालानुरूप असा वाङ्मयप्रकार जन्माला आला असावा