मराठी कविता

कवितेची व्याख्या कशी स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

कवितेची व्याख्या कशी स्पष्ट कराल?

1
कविता म्हणजे त्यातून आपल्याला काही तरी बोध होतो,काहीतरी स्पष्ट होते त्याला कविता असे म्हणतात
कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द घातले की कविता ही छान होते.
कविता याचा सरळ अर्थ सांगता येत नाही

उत्तर लिहिले · 15/10/2022
कर्म · 110
0
अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद-मुक्तशैलीत लिहिली गेलेली संहिता आपण कविता म्हणून स्वीकारत असतो. अलीकडच्या काळात सुधीर रसाळ यांनी प्रतिमेला केंद्रीभूत मानून "शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय,' अशी एक व्याख्या केली


 कवितेची व्याख्या

अगदी सुरुवातीच्या काळापासून काव्य म्हणजे काय याविषयी आपल्या समजुतीनुसार

विवेचन केलेले आढळते. काव्याच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे देता येतील.

भामह

मम्मट

काव्यात शब्द आणि अर्थ दोहोंनाही सारखेच प्राधान्य असते.

दोषरहित गुणांनी युक्त आणि सामान्यतः अलंकारांनी युक्त परंतु

क्वचित तसे नसलेले शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य

जगन्नाथ पंडित

वामन

आनंदवर्धन

रमणीय अशा अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य

- रीती म्हणजे शैली हाच काव्याचा आत्मा आहे

ध्वनी हाच काव्याचा आत्मा होय

विश्वनाथ

रसात्मक वाक्य म्हणजे काव्य

कार्लाईल

पो

लयबद्ध विचार म्हणजेच काव्य

काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती

हॅलझिट

काव्य ही कल्पना आणि भावना यांची भाषा होय उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य

वर्डस्वर्थ

ह.ना. आपटे

काव्याचे घटकावयव तीन दिसतात, नाद, अर्थ आणि ध्वनी, नुसती शब्दरचना म्हणजे काव्य नव्हे. ती नादवती, अर्थवती व ध्वनीवती पाहिजे. शब्द यथोचित पाहिजेत. बाह्यर्थ सुंदर पाहिजे. त्या बाह्यार्थाच्या अंतरंगी असणारा जो अर्थ जो रसिकाने आपल्या रसिकतेनेच काढावा लागतो तो अर्थही फार सुंदर पाहिजे.

रा. श्री. जोग

काव्य ही एक कला आहे व तिचे शिल्प, चित्र, नर्तकलाबरोबर साधर्म्य आहे. या साऱ्या कलांचे अस्तित्व त्यातील सौंदर्यदर्शनावर अवलंबून आहे.

सुधीर रसाळ -

• प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय.

वसंत डहाके नादवती, अर्थवती, ध्वनिवती शब्दरचना म्हणजे कविता

काव्याच्या वर दिलेल्या व्याख्यांमधून कवितेची विविधता व्यक्त झाली आहे. संपूर्ण कवितेची अशी व्याख्या करता येत नाही. कविता ही स्वानुभवाचा विषय आहे. या सर्व दिसत नाहीत. पाश्चात्य साहित्य परंपरेतही काव्याच्या व्याख्या करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. त्यांचा थोडक्यात परामर्ष घेणे आवश्यक ठरावे.
उत्तर लिहिले · 1/6/2022
कर्म · 48555

Related Questions

कथेची संकलपणा स्पश्ठ करा?
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण कोणते येईल? धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दुधभात भरवीन?
केशवसुतांच्या प्रीती कवितेतून कशाची माहिती सांगितली आहे?
आकाशात कवीला इंद्रधनुष्य पाहून काय वाटते?
मराठी काव्याचा प्रभात काल असे कोणी म्हटले आहे?
बहिणीसाठी एक कविता मिळेल का?
आशयानुसार कवितेचे प्रकार कोणते ते थोडक्यात कसे स्पष्ट कराल?