मानसिक स्वास्थ्य

मला मरायची इच्छा झालीय तर त्यावर मी काय करू शकतो?

2 उत्तरे
2 answers

मला मरायची इच्छा झालीय तर त्यावर मी काय करू शकतो?

7
बाकी लोकं तुमच्याशी ओळख नसताना तूम्ही यातून बाहेर यावेस या साठी  मनापासून  सल्ले देताना तुम्ही इथे बघाल.  हेच जीवनाचे सौंदर्य आहे. जीवनात अशा अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्या वर आपण शतगा प्रेम करू शकतो पण आत्ता ज्या मनस्थितीत तुम्ही आहात त्यामध्ये तुम्हाला त्या भावणार नाहीत. तुम्ही जे सांगता आहात ती कदाचित तात्पुरती निराश अवस्था असू शकते (एक low phase किंवा तुमच्या जीवनात घडलेल्या एखाद्या घटनेवरची तुमची तात्पुरती reaction) किंवा तुम्हाला डिप्रेशन किंवा नैराश्य हा मनोविकार असू शकतो. माहितीअभावी मी कुठलीच गोष्ट हलक्यात घेऊ इच्छित नाही आणि म्हणूनच तुम्ही सांगता आहात हा तुमच्या डिप्रेशन चा भाग आहे असे मानून पुढील उत्तर देतो. तसे असेल तर तुम्हाला मेडिकेशन (औषधे) आणि professional counseling ची जरूर आहे असे मी आवर्जून सांगेन. मी तुम्हाला एक मोफत हेल्पलाईन चा नंबर देतो तिथे जरूर एकदा कॉल करून बोला - 7412049300.

तसेच वर लिहिल्या प्रमाणे तुमच्या असे हताश वाटण्यात मानसिक अस्वास्थ्य (डिप्रेशन किंवा anxiety, किंवा इतर काही ) तर नाही ना याची एकदा खात्री करून घेण्यासाठी मी तुम्हाला मानसिक परीक्षण (testing ) करण्याचा सल्ला देईन. हे परीक्षण ' उत्तर ' वरील वाचकांसासाठी मोफत आहे आणि त्याची लिंक मी इथे खाली देत आहे.  या परिक्षणातील प्रश्नांना प्रामाणिक उत्तरे दिली तर आणि तरच results बरोबर येतील. 
18 ते 60 वर्षे वयोगट - https://forms.gle/deewgfd6tKW9D6ud6

60+ वर्षे वयोगट - https://forms.gle/ZhsEy6MRbeivY7LaA

(ह्या links किंवा ही post whatsapp द्वारे तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या group वर जरूर share करा)

 त्याचा रिपोर्ट ताबडतोब तुमच्या ई-मेल वर येईल. त्यात तुम्हाला डिप्रेशन, Anxiety अशा काही मनोविकाराची लक्षणे असतील असतील तर समजतील आणि त्याच बरोबर तुम्ही किती positively विचार करता हे पण समजेल. जो रिपोर्ट येईल तो घेऊन तुम्ही या हेल्पलाईन वरील counselor शी बोला. निश्चित फायदा होईल. लक्षणे आढळली तर डॉक्टर कडे जायला आजिबात कुचराई करू नका. ते तुम्हाला पाच सहा महिन्यात यातून निश्चित बाहेर काढतील आणि मग तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या आई वडिलांनी तुमच्या साठी बघितलेली स्वप्न निश्चित पुरी कराल.
उत्तर लिहिले · 21/10/2022
कर्म · 530
1
तुम्हाला मरायची इच्छा का झाली आहे त्याची कारणे काय आहेत हे तुम्हालाच माहिती असतील असो.
मरण म्हणजे काय वाटतं तुम्हाला मरण हे सोपे आहे का तुम्ही मरणाची इच्छा व्यक्त केली आणि मरण आले असं होतं नाही मरण आपण ठरवून येत नाही तुम्ही किती हि मरण्यासाठी प्रयत्न करावा मरण येत नाही  मरण का येत नाही तुम्हाला कारण माहित आहे  तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेऊन आलात तर   पृथ्वीवर काहीतरी कार्य करण्यासाठी आलात ते कार्य जो पर्यंत तुमच्या हातून होत नाहीत  तोपर्यंत तुमची सुटका नाही
आता तुम्ही म्हणाल कसलं कार्य
तर आपलं कुटुंब आपला परिवार यांच्या साठी कार्य करायचं  आईवडिलांची सेवा करा कुटुंबांची जबाबदारी पार पाडा  तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा सकंट अडचणी प्रत्येकाला आयुष्यात येतात त्यातून आनंदी राहून मार्ग काढा सकंट अडचणी आल्या म्हणून पळ काढता  आणि मरणाची इच्छा व्यक्त करता  माणसांमध्ये पळपुटेपणा नसावा   तर धाडस असलं पाहिजे प्रत्येक संकटाला अडचणींना सामोरं जाण्याची वेळ आली तर धाडसी निर्णय घेतले पाहिजेत   आणि मनापासून पासून मार्ग शोधाल तर मरणाची इच्छा व्यक्त करणार नाही . आनंदी राहून मनापासून घेतलेले निर्णय    तुम्हाला जगण्याची इच्छा व्यक्त करील.
मरणाची इच्छा व्यक्त हि करू नका मरण तुम्ही ठरवायचे नाही   मरण जेव्हा येणार असतं तेव्हा ते कधीही येत ते तुम्हाला हि कळणार नाही मरण समोर आलं कि बरोबर जगायचं आठवतं.तेव्हा मरण नको वाटते.
आयुष्य सुंदर आहे मस्त मजेत आनंदी राहा आणि इतरांना आनंद कसा देता येईल ते बघा घरच्यांना दुखात टाकायचं कि आनंदी ठेवायचं तुमच्या हातात आहे    आपलं आयुष्य आपलं कधीच नसतं हे विसरू नका आपलं आयुष्य दुसऱ्या साठी जगायचं असतं त्यात हि किती अडचणी असल्या तरी     आणि अडचणी चा सामना करतो ते  खरं आयुष्य 
 असतं त्यातून शिकायला हि मिळतं हे लक्षात ठेवावे.
त्यात मरणाची इच्छा व्यक्त करू नका तर आयुष्याशी लढण्याची इच्छा व्यक्त करा.
उत्तर लिहिले · 19/7/2022
कर्म · 48555

Related Questions

मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे?
जुने दिवस मला परत मिळतील काय? मी बर्‍याच गोष्टी गमावून बसलो? माझ्या हाती काहिच नाही? ज्या वयात मला यश आले पाहिजे होते ते आले नाही? अजूनही मी दुसऱ्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं? मला चांगल्या दुनियेत जायचं वाटतं?
स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवणे म्हणजे काय?
मानवाने सुष्टी पदार्थामध्ये बदल का घडवले?
आदर्शवादी राजकीय सिद्धांत आणि अनुभव कोणते येतील?
रिकाम्या वेळेमध्ये दुसऱ्यांच्या अडचणी सोडवणे हा वेळकाढूपणा तर नाही ना? कारण त्यावर प्रतिक्रिया नाही व परोपकार नाही?
चराचरात काय भेदभाव आहे?