1 उत्तर
1
answers
पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात?
0
Answer link
तांदूळ हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे.
कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता.
अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जाते. कोणताही पदार्थ वापरत असताना त्याची उपलब्धता हे पण एक कारण असते. तांदूळ आपणास सहज उपलब्ध होतात.
अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.
भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचे जेवण पूर्ण होत नाही. तसेच कोणत्याही कार्यात अक्षतांशिवाय ती पूजा पुर्णत्वास पोहोचत नाही.
अक्षता ह्या अखंड तांदुळाच्या असतात.
अगोदर गव्हाचा पण वापर होत असे. पण गहू वापरल्यावर काही तांत्रिक अडचणी येत होत्या जसे की फोटो हलणे, मूर्ती हलणे. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ उत्तम.
आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी विविध डाळी पण वापरतात.
तांदुळाच्या रंग पांढरा असल्यामुळे तांदळाला हळद लावून पिवळसर रंग करणे, कुंकू लावून लालसर रंग व खाण्याचे विविध रंग वापर करून विविध रंगांचे तांदूळ तयार करता येतात. यामुळे पूजा विधी ही आकर्षक होते . पूजा विधी ही आकर्षक झाल्यामुळे मनाला प्रसन्न वाटते. पूजा मांडणी ही पण एक उत्तम कला आहे.
तांदुळाचे वैशिष्ट्य. रेल्वे ट्रॅक वर गीट्टी का टाकतात ?[1] . तोच वापर , तेच तत्त्व इथे तांदूळ वापरून पूजाविधीमध्ये केला जातो. तांदळावर देवाच्या प्रतिमा , मूर्ती , फोटो ठेवल्यावर त्या सहसा हलत सरकत नाहीत. किंचित नकळत धक्का जरी लागला तरी तांदुळ एकमेकात सरकून फोटो , मुर्ती , पडत नाही . पूजा विधी करत असताना फोटो , मूर्ती यांना जर धक्का लागला तर ….. आणि ते जर पडले तर …. आपल्याच मनाला अपशकुन वाटतो. हे टाळण्यासाठी तांदळाच्या एकात एक गच्च बसण्याच्या या गुणधर्माचा उत्तम उपयोग केला जातो.