नवीन तंत्रज्ञान पूजा

नवीन बाळ जन्माला येते तेव्हा तर आनंद असतो ना मग सोयर का पाळतात? देवाची पूजा वगैरे का करत नाही . सुतक ठीक आहे कुणाचाही मृत्यु झाला तर पाळणे. पण सोयर का पाळतात?

1 उत्तर
1 answers

नवीन बाळ जन्माला येते तेव्हा तर आनंद असतो ना मग सोयर का पाळतात? देवाची पूजा वगैरे का करत नाही . सुतक ठीक आहे कुणाचाही मृत्यु झाला तर पाळणे. पण सोयर का पाळतात?

6
घरात बाळ जन्माला आल्यावर नवी 'सोयरीक' होते, म्हणून त्याला 'सोयर' म्हणतात. हे परंपरेने चालत आलेले नियम आहेत. ते वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळे असू शकतात. “पर्वा नाही” किंवा “ देणेघेणे नाही.” या अर्थी मराठीत “सोयरसुतक नाही” असा वाक्प्रचार वापरला जातो.
कारण असे आहे की स्त्रियांना आराम मिळावा या करिता सर्व काही
स्त्रियांना हे चार दिवस असे बंदिस्त ठेवणे अयोग्य वाटते, पण प्रसूती झाल्यावर आई व मुलाला सव्वा महिना सोयर (विटाळ) का असतो ह्याचा विचार करताना कोणी दिसत नाही. प्रसुतीसारख्या प्रखर परीक्षेतून बाहेर पडल्यावर नक्कीच सव्वा महिना आराम मिळायला हवा असे आपले धर्मशास्त्र सांगते, तेही चूकच आहे का मग? तसेच बालकाला दुध पाजणे, त्याची अतिशय काळजी घेणे हे आवश्यक असतेच असते पण शरीराची झालेली झीज, प्रसुतीत झालेल्या जखमा, नंतर वाहणारे दुषित रक्त ह्या सगळ्यातून सावरण्यासाठी हा काळ आरामाचा ठरवला गेला आहे. त्यावर बोलण्यास मात्र बरेच लोक तयार नसतात.

असे नियम नसते तर पाळीच्या काळात किवा प्रसुतीनंतर दुसऱ्याच दिवशी स्त्रीला कामाला जुंपले गेले असते. कदाचित फार पूर्वी असे झालेही असेल. त्यात अनेक स्त्रिया दगावल्या देखील असतील म्हणूनच तर हा नियम निर्माण केला गेला. 
घरात शिवता-शिवत नको म्हणून (कारण घरात देव-देव्हाराअसतो) स्त्रीला एका ठिकाणी बसवून ठेवणे हे आता गमतीचे वाटत असले तरी पूर्वीच्या जीवनशैलीचा विचार केला तर ते स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक होते. 
आता स्त्रिया नोकरी करतात. त्यांना असे महिन्याला चार दिवस सुट्टी असलेली नोकरी कोणी देणार नाही. स्वतंत्र कुटुंबात तिलाच घरातील कामे करावी लागतात. अशावेळी जे पूर्वीच्या प्रथा मानतात त्यांच्या मनात फार गोंधळाचे वातवरण निर्माण होते. असा गोंधळ होऊ देण्याची गरज नाही म्हणून हा लेखप्रपंच केला आहे. पण असे असले तरी स्त्रियांनी ह्या काळात कमी कष्टाची कामे करावीत. पतीनेही घरातील कामात पत्नीला मदत करावी हा संदेश ह्यामागे आहे. काळ बदलला आहे, आधुनिकतेमुळे जीवन बदलले आहे, पण स्त्री तीच आहे, कष्ट थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत पण कष्ट तर आहेतच. शिवाय मानसिक ताण वाढतो आहे. ह्या परिस्थितीत जुन्या प्रथांचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे. 
विटाळाचे नियम न पाळल्याने देवाचा/देवीचा कोप असे काही होत नसते, पण एका स्त्रीला त्या कठीण प्रसंगात अतिकष्टाच्या कामाला जुंपणे हेही अयोग्य आहे. संसाराच्या गोडीत भले ती कष्ट करायला तयार असली तरीही तिनेही स्वतःवर संयम ठेवायला हवा.


.........
सुतक का पाळावे


आपली जवळची व्यक्ती जर मृत्यू पावली तर आपण सुतक पाळतो त्यात आपण देवपूजा करीत नाही तेलकट व मसालेदार पदार्थ खात नाहीत स्त्रिया टिकली लावत नाहीत व एका ठिकाणी बसून आपण दहा दिवस शोक व्यक्त करतो. पण सुतक म्हणजे नेमकी काय सुतक हा का पाळावे व त्यामागे नेमके वैज्ञानिक कारण काय.

हे आपल्याला माहित आहे का की परंपरा आहे सर्वजण करतात म्हणून आपण हे तसेच करावे तर हे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. आपले शरीर हे पंची महाभूतांनी बनलेले असते आपल्या शरीरात नेहमी अग्नी प्रज्वलित असतो त्यामुळेच आपल्याला भूक लागते.

परंतु शरीरातून आत्मा निघून गेला की शरीरातला अग्नी वितळून जातो व देहा निस्तेज होतो. आणि जेथे तेज म्हणजेच अग्नी नाही तेथे विषारीक जीवजंतूंची वाढ खूप वेगाने होते हे जीवजंतू त्या मृत शरीराचे आसपास सगळीकडे पसरतात व ह्या जंतूंचा इतरांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये.

म्हणून व याचा संसर्ग होऊ इतरांना रोग बाधा होऊ नये म्हणून यासाठी मृतशरीर अपने दहन केल्या जाते. हा अंतिम विधी करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे हे जीवजंतू सगळीकडे पसरतात ते खूप सूक्ष्म असतात आणि त्यांना नष्ट होण्यासाठी दहा दिवस लागतात हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात.

पण अशिक्षित व्यक्तींना ते समजणार नाही व ते ऐकूनही घेणार नाहीत. म्हणून आपल्या पूर्वीचे ऋषीमुनींनी याला श्रद्धा व प्रेमाचे चौकटीत बांधले व त्याला सुतक असे नाव दिले व दहा दिवस सुतक पाळुन एका ठिकाणी बसण्यास सांगितले म्हणजे त्या जंतूंचा इतरांना संसर्ग होणार नाही व जंतू ही नष्ट होतील.

हे झाले सुतका विषयी आता देवपूजा का करू नये हे आपण बघूयात. कुठलाही धार्मिक विधी पूजा परायण हे मनापासून केले तरच त्यातून ऊर्जा मिळते व त्यातून नकळत आळंद व प्रसन्नता प्राप्त होते सुतक हे आरोग्याच्या दृष्टीने शरीराला असते मनाला नाही. परंतु घरातील एखादी व्यक्ती मृत पावली तर तेथील वातावरण हे मन प्रसन्न मुळे इतके शुद्ध नसते.

मृत पावलेल्या व्यक्तीच्या आठवणी व भेटायला येणारे माणसे यांचे मुळे काहीही केले तरी उपासना व पूजा करणाऱ्या चे मन एकाग्र होऊ शकत नाही म्हणून सुतकाचे काळात 10 ते 15 दिवस धार्मिक विधी करू नयेत असे म्हटले जाते. आता स्त्रिया टिकली का लावत नाहीत ते आपण बघू यात. ज्यांचे घरातील व्यक्ती मृत पावते ते शोकमग्न अवस्थेत असतात.

मग त्यांना टिकली लावणे चांगले कपडे घालने डोक्याला तेल लावणे ह्या गोष्टी करणे योग्य वाटत नाही व त्यासाठी वेळही असत नाही. घरातील व्यक्ती मृत झाली आहे आणि आपण व्यवस्थित तयारी करून राहणे हे योग्य नाही म्हणून स्त्रियां टिकली लावत नाहीत तसेच केसांना तेल ही लावत नाहीत यामागे कोणतेही धार्मिक किंवा वैज्ञानिक कारण नाही.

तसेच घरातील व्यक्ती जर मृत झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या आठवणीत जेवण केले जात नाही व भूक ही लागत नाही म्हणून त्या व्यक्तीच्या आठवणीत जेवण केले जाते व त्या व्यक्तीची आठवण व दुःख म्हणून जास्त मसालेदार तळलेले पदार्थ हे आपण खात नाही म्हणून दहा दिवस तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत अशाप्रकारे सुतक पाळले जाते.



उत्तर लिहिले · 8/1/2022
कर्म · 121725

Related Questions

पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात?
पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाला सर्व शिधा (सामान) का दिले जाते?
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. (1 Point) पूजा किराणा दिवा पुस्तक?
उजव्या हाताने पूजा आणि भोजन करणे का शुभ मानले जाते?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
शंकराची पूजा करताना आपण त्याच्या मूर्तीऐवजी लिंगाची पूजा का करतो? यामागे काही आख्यायिका आहे का?
पिंपळाच्या झाडाची पूजा का करतात?