मंदिर
देव
आपण देवपूजा करतो, तेव्हा नेहमी देवघरात मंदिरात देवासमोर उदबत्ती व दिवा लावतो. मी ही नेहमी लावते पण या मागे नक्की खर काय कारण आहे, दिवा लावल्यामुळे काय होत?
1 उत्तर
1
answers
आपण देवपूजा करतो, तेव्हा नेहमी देवघरात मंदिरात देवासमोर उदबत्ती व दिवा लावतो. मी ही नेहमी लावते पण या मागे नक्की खर काय कारण आहे, दिवा लावल्यामुळे काय होत?
1
Answer link
अग्नी किंवा दिवा हे तेजाचे स्वरुप आहे. ज्याप्रमाणे दिवस उजाडला की आपली कार्यक्षमता वाढते. आपण कामाला लागतो. फक्त आपणच नाही तर जवळपास सर्व पशुपक्षी. म्हणजेच सूर्य व त्याचे तेज व प्रकाश यामुळे कार्यक्षमता अस्तित्वात येते व प्रोत्साहित होते. त्याच अनुषंगाने जेव्हा आपल्या समोर देवा व तेज असते त्यामुळे आपोआपच पॉझिटिव्हिटी निर्माण होणे नैसर्गिक आहे. यामुळेच तुम्ही एक गंमत बघितली असेल ते म्हणजे धर्मांमध्ये इतर कितीही विचार वेगवेगळे असले तरी देखील अग्नीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक धर्मात. कारण व त्याचे तेज याचा संपूर्ण मानवी जीवनावर किंवा एकंदरीतच सृष्टीवर अत्यंत मोठा पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतो. किंबहुना त्यामुळेच सृष्टी अस्तित्वात आहे. म्हणून दिवा लावून बसल्याने आपोआप पॉझिटिव्हिटी वाढणे एकाग्रता वाढणे कार्यक्षमता वाढणे एकाप्रकारे सुरक्षित वाटणे या गोष्टी घडू लागतात