मंदिर
मंदिरात घंटा का असते?
1 उत्तर
1
answers
मंदिरात घंटा का असते?
2
Answer link
हिंदू हा एक महान धर्म आहे. हिंदू धर्मात प्रत्येक रूढी परंपरेमागे काहीना काही कारण असते. हिंदू धर्मात मंदिरांना खूप महत्व आहे. प्रार्थना करण्यासाठी मंदिराइतकी पवित्र जागा दुसरी कोणती नाही. मंदिर असो वा देवघर , घंटा असतेच. ह्याला काही शास्त्रीय तसेच मानसिक कारणे आहेत.
घंटा हि कॅडमियम (जस्तासारखा एक धातू) ,तांबे ,निकेल,क्रोमियम, मॅंगनीज ह्या धातूंपासून बनवली जाते. प्रत्येक धातूचे विशिष्ट प्रमाण असते. ह्या धातूंपासून घंटा अशी बनवली जाते कि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण होतो जो उजव्या आणि डाव्या मेंदूला जागृत करतो. घंटा वाजवल्यावर निर्माण होणारा ध्वनी मानवी शरीराच्या सात चक्रांना स्पर्श करत सात सेकंद चालू राहतो.
घंटा वाजवल्यावर मन विचारांपासून मुक्त होते आणि अधिक सावध व ग्रहणशील अवस्थेत प्रवेश करते. मंदिरात प्रवेश करण्याआधी मन आणि विचार जागृत करणे गरजेचे असते म्हणून घंटा वाजवतात.
असेही मानतात कि घंटा वाजवल्यावर कंपने (vibrations) निर्माण होतात जी वातावरणात लांबपर्यंत पसरतात. त्यामुळे वातावरणात असलेले रोगाचे सूक्ष्मजंतू ,सूक्ष्मजीव नाश पावतात. वातावरण शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा निघून जातात.
घंटा वाजवून आपण देवांना आपल्या प्रार्थना स्वीकार करण्यासाठी आमंत्रित करतो अशीही समजूत आहे.