मंदिर
गोदावरी नदीतील मोरेश्वर महाराजांचे मंदिर कोणी बांधले?
2 उत्तरे
2
answers
गोदावरी नदीतील मोरेश्वर महाराजांचे मंदिर कोणी बांधले?
0
Answer link
माधवराव पेशव्यांनी मोरेश्वर महाराजांचे मंदिर बांधले
महाराष्ट्रात गणपतीची 21 पुरातन तीर्थक्षेत्र आहेत. यातील एक तीर्थक्षेत्र माजलगाव तालुक्यातील गंगामसलामधील मोरेश्वर मंदिर (Moreshwar ganapati Gangamasala) आहे. गोदावरीच्या पवित्र पात्रात अगदी मध्यावर दिमाखात हे मंदिर उभे असून पावसाळ्यामध्ये हे मंदिर पाण्याच्या खाली जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून येथील गणपतीची ओळख आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीला भाविक नवस पूर्ती म्हणून येथे दर्शनासाठी पायी वारी करतात.
गणेश कोशातील 21 गणपतीचे महत्त्व आगळीवेगळी आहेत. या 21 गणपतीपैकी एक म्हणजे माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर गणपती. या गणपतीचा उल्लेख भालचंद्र असाही होतो. गोदावरीच्या पवित्र पात्रात अगदी मध्यावर दिमाखात मंदिर उभे आहे. माजलगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर गंगामसला येथे मोरेश्वर गणपतीचे हे मंदिर असून हा गणपती स्वयंभू असल्याने गणेश भक्तांची इच्छा पूर्ण होते. मंदिर गोदावरी नदीच्या मधोमध उभे आहे. या मंदिराची स्थापना पेशव्यांनी केल्याची आख्यायिका सांगितली जाते.