उत्तर अभिप्राय
उत्तर मराठी
Uttar.co ads चे पैसे कोण कमावतो, मालक कोण आहे. उत्तर देणाऱ्यांना काही मिळेल का?
2 उत्तरे
2
answers
Uttar.co ads चे पैसे कोण कमावतो, मालक कोण आहे. उत्तर देणाऱ्यांना काही मिळेल का?
7
Answer link
प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद.
उत्तर वेबसाइट आणि ॲप्लिकेशन जेव्हा चालू झाले तेव्हा त्याचे वापरकर्ते तुलनेने कमी होते. त्यामुळे उत्तरसाठी लागणारा खर्चही कमी होता. कमी असला तरी तो खर्च होताच, आणि तो स्व खर्चाने केला जात होता, आणि उत्तरवर कुठल्याही जाहिरातीही नव्हत्या.
मात्र काही दिवसांपासून उत्तरची लोकप्रियता खूप वाढली, आणि वापरकर्तेही वाढले. यातूनच खर्चही वाढला, जो खिशातून पूर्ण करणे अशक्य होत होते. आणि याचा परिणाम म्हणून उत्तरची सेवा बंद करायची देखील वेळ येऊ शकत होती.
असे काही होऊ नये म्हणून उत्तरवर नुकत्याच काही दिवसांपासून जाहिराती दाखवायला सुरवात केलेली आहे. यातून मिळणार्या उत्पन्नातून उत्तरचा खर्च भागत आहे, आणि कुठलाही नफा अजून होत नाही.
काही लोक म्हणतात वेबसाइटसाठी फक्त होस्टिंगचे पैसे लागतात, जास्त पैसे लागत नाही, मग जाहिरातीचे पैसे कुणाला जातात, अशा लोकांसाठी खाली काही खर्चाच्या गोष्टी लिहीत आहे.
जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉग चालवता किंवा लहान वेबसाइट असेल तेव्हा तुम्हाला कमी साधने(लहान सर्व्हर, कमी आकाराचा डेटाबेस) लागतात, तसेच नेटवर्किंगच्या गोष्टी(लोड बॅलन्सर) लागत नाही. जेणेकरून खर्च कमी असतो.
सध्या तुम्ही उत्तरचे जे ॲप्लिकेशन आणि वेबसाइट वापरता ते चालवण्यासाठी खालील गोष्टी वापरात आहेत.
- होस्टिंगसाठी कुबरनेटीस क्लस्टर(Kubernetes Cluster), अगदी काही मिलिसेकंदात तुम्हाला माहिती पोहचू शकेल.
- डेटाबेस सेर्व्हर - जिथे उत्तरचा डेटाबेस राहतो
- लोड बॅलेन्सर - एकाच वेळी अधिकाधिक लोक उत्तर वापरू शकतील
- उत्तर ईमेल अकाऊंट खर्च आणि ईमेल सर्विस खर्च
- डेव्हलपमेंटसंबंधी खर्च - उत्तर वर्डप्रेस, किंवा इतर रेडीमेड सेवा वापरत नाही, त्यामुळे कोडिंग, मेंटेनन्स यासाठी अधिक वेळ आणि खर्च येतो
वरचे सर्व खर्च हे प्रॉडक्शन ग्रेड खर्च आहेत, म्हणजे सामान्य खर्चापेक्षा अधिक खर्च यात येतो. उदा. डेटाबेस सर्व्हरमध्ये डेटाबेससाठी रेपलिका आहेत, जेणेकरून डेटा लॉस होणार नाही, आणि ॲप्लिकेशन स्लो वाटत नाही.
याची सर्व गोळाबेरीज केली तर उत्तरचे मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा अजूनही ताळमेळ बसत नाही. जाहिरातींमधून संपूर्ण खर्च वसुल होत नाही, आणि आजही काही पैसे पदरचे जात आहेत.
त्यामुळे उत्तर खूप पैसे कमावत आहे आणि हे पैसे कुणा व्यक्तिला जात आहेत हा समज मनातून काढून टाका.
असे असले तरीही, भविष्यात मात्र जर वापरकर्ते आणि कमाई वाढली आणि उत्तर नफ्यात आले, तर नक्कीच हा नफा उत्तरकर्त्यांत वाटला जाईल याची आम्ही खात्री देतो.
तोपर्यंत तुमची साथ अशीच राहुद्या, अशी विनंती!
धन्यवाद!
3
Answer link
Uttar.co हे पैसे कमविण्याच्या कोणत्याही हेतूने केलेले नाही. येथे सामान्य माणसाला ज्ञान मिळविण्याच्या हेतूने तयार केलेले आहेत.
उत्तर देणाऱ्याला एक समाधान मिळतं
Uthar co चे मालक आहेत चंद्रशेखर गारकर आहेत.
इथे कोणाला काही पैसे वगैरे काही नाही मिळत उत्तर ॲप च्या मालकाला आणि उत्तर देणाऱ्याला पैसे नाही मिळत
इथे तुम्हाला फक्त समाधान, तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मला एक विचारायचे आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली कि तुम्हाला काय मिळतं किंवा काय वाटते ते सांगा.
बघुयात किती लोक काय सांगतात ते बघूया.