उत्तर अभिप्राय
उत्तर मराठी
उत्तर apk वर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात, उत्तर देणारे उत्तर देतात, पण प्रश्न विचारणारा धन्यवाद वगैरे comment तर दूर, Like सुद्धा करत नाही? असे का?
2 उत्तरे
2
answers
उत्तर apk वर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात, उत्तर देणारे उत्तर देतात, पण प्रश्न विचारणारा धन्यवाद वगैरे comment तर दूर, Like सुद्धा करत नाही? असे का?
8
Answer link
उत्तर ॲप वर प्रश्नांच्या उत्तरावर. पहिलं लाईक करणारे कुणाल तिवळकर आहेत आणि कमेंट्स करणारे ही कुणाल तिवळकर मी यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏 देते.
बाकीचे फाॅलर्स फक्त वाचण्याची काम करतात पण लाईक मात्र करत नाही कुणाल तिवळकर म्हटल्या प्रमाणे प्रश्न विचारणारे आभार ही मानत नाहीत त्यांना उत्तर देऊन देखील परत ते काय करतात परत तोच प्रश्न काही दिवसांनी परत लिहितात म्हणजे एक प्रश्नाच उत्तर एक सारखे द्यावे का मग त्या उत्तराची उजळणी तोंडपाठ होतय उत्तर देणाऱ्याचे पण प्रश्न टाकणारे तोच तोच प्रश्न टाकतच राहतोय. तुम्ही प्रश्न टाकता तेव्हा लिहिता तेव्हा तुमचा प्रश्न अगोदर च असतोच पण ते तुम्ही बघत नाही.खाली तुम्हाला प्रश्न वेगवेगळे प्रश्न दिसतात त्या प्रश्नांना किती जणांनी उत्तर दिली आहेत ते दिसतं पण तुम्ही बघत नाही.
काहीजण असं करतात प्रश्नाचं उत्तर दोन तीन चार पाच अशी अक्षरं लिहून कांहीही उत्तरं लिहून टाकतात मग ते उत्तर सेव्ह होऊन जातं तुम्हाला कित्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं दिसेल ते ही एका वाक्यात हि नाही अपूर्ण उत्तर दिसेल.
सर्वांना विनंती आहे की माझ्याच उत्तरांना लाईक कराच अस नाही म्हणत ज्या प्रश्नांची उत्तरे वाचता त्यांना लाईक करा कोणाचे कर्म वाढण्यासाठी नाही तर तुम्हाला प्रश्नाच उत्तर आवडलं म्हणून एवढं तर करु शकता.
काही लोक अशीही आहेत प्रश्नाचं उत्तर वाचून झाले कि कमेंट्स मध्ये आणखीन अपेक्षा असते कि अजून नविन वेगवेगळ्या विषयाची माहिती काढण्यासाठी
पण पहिल्या प्रश्नांन लाईक तर करा लोक डोकं चालवून आणि तुम्हाला कळतील त्या भाषेत लिहितात त्यांचे आभार तर यांना
कमेंट्स मध्ये किंवा संदेश यांचं काय तुमचा वाॅटसाॅफ नंबर द्या हे लिहायला वेळ आहे आणि तुम्हाला लाईक आणि आभार मानायला वेळ नाही फक्त उत्तरं लिहिणाऱ्या नी उत्तर लिहितच राहावे हिच अपेक्षा आहे तुमची.
0
Answer link
मला तुमच्या प्रश्नाची नोंद आहे. तुम्ही विचारले आहे की, 'उत्तर APK' वर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात, उत्तर देणारे उत्तर देतात, पण प्रश्न विचारणारा धन्यवाद वगैरे comment तर दूर, Like सुद्धा करत नाही? असे का होते?
या संदर्भात काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:
- वेळेची कमतरता: बऱ्याच लोकांना घाई असते आणि त्यामुळे त्यांना उत्तर वाचल्यानंतर लगेच प्रतिक्रिया देण्यास वेळ मिळत नाही.
- प्रतिक्रिया देण्याची सवय नसणे: काही वापरकर्त्यांना ऑनलाइन प्रतिक्रिया देण्याची सवय नसते.
- उत्तराने पूर्णपणे समाधानी नसणे: वापरकर्त्याला उत्तराने पूर्णपणे समाधान झाले नसेल, तर ते प्रतिक्रिया देणे टाळू शकतात.
- विसरणे: काही वेळा प्रश्न विचारणारे उत्तर वाचल्यानंतर प्रतिक्रिया देणे विसरून जातात.
- गुंतवणुकीचा अभाव: काही वापरकर्ते फक्त माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारतात आणि त्यांना समुदायात सक्रियपणे सहभागी होण्याची इच्छा नसते.
यापैकी कोणते कारण तुमच्या बाबतीत लागू होते हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु ही काही सामान्य कारणे आहेत.