उत्तर मराठी

उत्तर ॲपचा उपयोग काय आहे?

2 उत्तरे
2 answers

उत्तर ॲपचा उपयोग काय आहे?

5
दैनंदिन जीवनात आपल्याला बरेच प्रश्न पडतात. काही प्रश्न व्यवहारिक ही असतात. काही वेळा काही गोष्टींबाबत आपल्याला दुसऱ्यांचे मत जाणून घ्यायचे असते. काही वेळा आपल्याला इतरांचे सजेशन (Suggestions) हवे असते. ते आपल्याला या उत्तर अँपवर आपल्या भाषेत मिळते. 

आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण इंटरनेटवर शोधू शकतो, पण काही प्रश्नांची उत्तरे इंटरनेटवर (गूगलवर) मिळत ही नाहीत. 

पण, सरासरी या आपल्या उत्तर अँपवर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

एखाद्या विषयावर प्रश्न - उत्तरांच्या माध्यमांतून आपल्याला सविस्तर चर्चा उत्तर अँपवर प्रभावीपणे आणि समाधानकारकरित्या करता येते. 

एखादी गोष्ट न समजल्यास परत विचारता ही येते. 

प्रश्नांचे स्पष्ट आणि सखोल स्पष्टीकरण आपल्या उत्तर अँपवर वरिष्ठांद्वारे दिले जातात. 

येथे प्रश्न - उत्तरांद्वारे अनेकांचा अनुभव (Experience) ही अनुभवायला मिळतो. 

अर्थातच आपल्या उत्तर अँपवर अनुभवावर आधारित उत्तरे दिली जातात. 
उत्तर लिहिले · 6/10/2022
कर्म · 25830
0

उत्तर ॲप (Uttar App) हे एक प्रश्न-उत्तर (Question-Answer) आधारित ॲप आहे. याचा उपयोग खालीलप्रमाणे होतो:

  1. शंका निरसन: तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्ही या ॲपवर शोधू शकता.
  2. ज्ञानवृद्धी: विविध विषयांवर माहिती उपलब्ध असल्याने तुमच्या ज्ञानात भर पडते.
  3. शिकणे आणि शिकवणे: या ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्वतः शिकू शकता आणि इतरांना शिकवू शकता.
  4. समुदाय आधारित: तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि इतर सदस्यांच्या उत्तरांवर चर्चा करू शकता. यामुळे सामुदायिक ज्ञानाची निर्मिती होते.
  5. उपलब्धता: हे ॲप स्मार्टफोनवर उपलब्ध असल्याने तुम्ही ते कधीही आणि कोठेही वापरू शकता.

अधिक माहितीसाठी, तुम्ही उत्तर ॲपच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 180

Related Questions

कथेची संकलपणा स्पश्ठ करा?
असे अचानक ढग गडगडले याचा आशय काय?
व्हॉट्सॲप ॲप वरील अति आवश्यक असलेली माहिती ब्लॉगर वर अपलोड करू शकता का?
लेखनात येणाऱ्या अडचणी लिहा?
Uttar.com ads चे पैसे कोण कमावतो, मालक कोण आहे? उत्तर देणाऱ्यांना काही मिळेल का?
उत्तर ॲप प्रत्येक वेळेस लॉग इन करावे लागते, बॅकग्राउंड डेटा हटवला की परत लॉग इन का करावे लागते? ॲप अपडेट असताना सुद्धा परत लॉग इन का करावे लागते?
उत्तर apk वर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात, उत्तर देणारे उत्तर देतात, पण प्रश्न विचारणारा धन्यवाद वगैरे comment तर दूर, Like सुद्धा करत नाही? असे का?