भारताचा इतिहास
गणित
भारत
भारतीय सेना
भारतीय दंड संहिता
फरक
भारतीय स्वातंत्र्य दिन
हवामान
भारत व ब्राझील हवामान यातील फरक?
मूळ प्रश्न: ब्राझील व भारत हवामानातील फरक कोणता आहे?
1 उत्तर
1
answers
भारत व ब्राझील हवामान यातील फरक?
0
Answer link
भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :
(१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट,ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
(२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
(३) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
(४) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.