दूध व्यवसाय

छोट्याशा बाळांना गाढविणीच दूध का पाजले जाते?

1 उत्तर
1 answers

छोट्याशा बाळांना गाढविणीच दूध का पाजले जाते?

3
गाढविणीच्या दुधातील पोषणमूल्ये शहरी-ग्रामीण भागात सर्रास बालकांना पाजण्यात येणाऱ्या गाढविणीच्या दुधाचा वापर अलीकडे कमी झाला आहे...

काही दशकांपूर्वीपर्यंत शहरी-ग्रामीण भागात सर्रास बालकांना पाजण्यात येणाऱ्या गाढविणीच्या दुधाचा वापर अलीकडे कमी झाला आहे. गाढविणीच्या दुधामध्ये असंख्य पोषणमूल्ये असून, मातेच्या दुधापेक्षा ६० पट जास्त क जीवनसत्व (व्हिटॅमिन सी) या दुधामध्ये आहे. त्याशिवाय अनेक आजारांवर हे दूध रामबाण औषध आहे आणि या दुधातून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर कामाला येते. गाढवांच्या कातडीपासून चीनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या औषधाची किंमत प्रतिकिलो ३८८ अमेरिकी डॉलर आहे, तर याच दुधापासूनच्या एक किलो पनीरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एक हजार युरोपर्यंत आहे. गाढवांची आयात-निर्यातही फार मोठ्या प्रमाणावर होत असताना, भारतात मात्र गाढवांची मंदबुद्धी प्राणी म्हणून गणना केल्या जात असल्याची खंतदेखील अभ्यासक डॉ. डी. एस. काटे यांनी लंडनमध्ये सादर केलेल्या प्रबंधातून व्यक्त झाली आहे.

गायीच्या दुधाची महती सर्वमान्य आहे. बकरीच्या दुधाकडेही महात्मा गांधी यांच्यासह अनेकांनी लक्ष वेधले. त्याचवेळी एकेकाळी गाढविणीच्या दुधाचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी अलीकडे गाढविणीचे दूध पार दुर्लक्षित आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बालकांना अल्प प्रमाणात दिल्या जाणाऱ्या गाढविणीच्या दुधाविषयी नवीन पिढीला किंवा शहरी लोकांना फारसे माहीत नसल्याचेही दिसून येत आहे आणि नेमके हेच हेरून शहरातील अर्थविषयक अभ्यासक तसेच उद्योजक डॉ. डी. एस. काटे यांनी याच विषयीचा शोधप्रबंध लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करुन याकडे जगाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात डॉ. काटे यांना विचारले असता ते म्हणाले, 'पाच हजार वर्षांपासून गाढव हा कष्ट करणारा प्राणी म्हणून परिचित आहे. तब्बल १८५ प्रजाती असलेल्या गाढवांची संख्या मात्र घटून आज चार कोटींवर आली आहे आणि जगातील सुमारे ९६ टक्के गाढव हे अविकसित; तसेच विकसनशील देशांमध्ये आहेत. भारतामध्ये पूर्वापार धोबी, कुंभार, आदिवासी, मेंढपाळ समाजामध्ये गाढवांचा वापर होत असे. अजूनही कष्टाच्या कामासाठी, अडगळीच्या ठिकाणी बांधकामासाठी, उंच-पहाडी ठिकाणी कामावर गाढवांचा वापर केला जातो. अजूनही राज्यात मढी, माहेगावात गाढवांचा बाजार भरतो. केवळ भारतात नव्हे तर प्राचीन ग्रीसच्या साहित्यात, धार्मिक ग्रंथातही गाढवांच्या नोंदी आढळतात. बायबलमधील काही कथांमध्ये शांती; तसेच नम्रतेचे प्रतिक म्हणूनही गाढवांना प्रतिबिंबित केले आहे.'

मुळात गाढविणीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन बी, बी-१२ यांची मात्रा; तसेच उष्मांक जास्त आहेत. मातेच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधामध्ये ६० पटींनी जास्त व्हिटॅमिन सी आहे. संसर्गजन्य, जंतुजन्य रोगांपासून या दुधामुळे संरक्षण मिळते. त्याचवेळी दमा, सर्दी, खोकला, कावीळ आदी रोगांवरही हे दूध रामबाण औषध असल्याचे सिद्ध झाले आहे. गाढवीण एका वेळेस अर्धा ते दीड लिटर दूध देते आणि लहान मुलांना औषध म्हणून १५ एमएल दूध दिले जाते व त्यासाठी ५० रुपये आकारले जातात, असेही काटे यांनी सांगितले.

\Bचीनमध्ये कातडीपासून औषध

\Bगाढवांच्या कातडीपासून चीनमध्ये 'इंजिवो' नावाचे औषध तयार केले जाते. रक्ताभिसरण, रक्तशुद्धी, निद्रानाश, चक्कर येणे आदींवर ते उपयुक्त ठरते, असे मानले जाते. या औषधाला खूप मागणी असून, ३८८ अमेरिकी डॉलर प्रतीकिलो अशी त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत आहे. त्यामुळेच चीनने २०१६मध्ये आफ्रिकेतून ८० हजार गाढवांची आयात केली व त्यानंतर जगभारत गाढवांची किंमत वाढली. एवढेच नव्हे तर चीनने पाकिस्तानमध्ये गदर्भ पालनाचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक सुरू केल्याचेही समजते. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेल्या एक किलो पनीरसाठी एक हजार युरो (८० हजार रुपये) इतकी किंमत आकारली जाते आणि २५ लिटर दुधापासून एक किलो पनीर तयार होते. गाढविणीच्या दुधाला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली किंमत गृहित धरून भारतासारख्या देशामध्ये गदर्भ संवर्धन व पालन व्यवसाय वाढला पाहिजे, असेही मत डॉ. काटे यांनी 'मटा'शी बोलताना नोंदविले.

\B'क्लिओपात्रा'च्या आंघोळीसाठी ७०० गाढवे

\Bइजिप्तमधील क्लिओपात्रा राणी ही जगातील सर्वांत सुंदर राणी म्हणून गणली जाते. ही राणी गाढविणीच्या दुधाने आंघोळ करीत होती आणि त्यासाठी ७०० गाढवांचे पालन पोषण इजिप्तमध्ये केले जात होते. आपल्या सुंदरतेचे गुपित हे गाढविणीचे दूध असल्याचेही राणीने म्हटल्याचे इतिहासात नोंद आहे. हे लक्षात घेऊन भारतामध्ये गाढविणीच्या दुधावर संशोधन व्हावे व पेटंट घेतले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उत्तर लिहिले · 9/1/2022
कर्म · 121725

Related Questions

अभिवृत्ती म्हणजे -------?
दूध, खीर, शेवया यामध्ये काय बनवायचं?
पाश्चरीकरण केलेले दूध शरीरासाठी चांगले असते का?
दूध मध आणि हळद एकत्र करून पिल्याने फायदा होतो का तोटा?
व्यवसाय कसा वाढवायचा याची माहिती मिळेल का?
दुधामध्ये गुळ टाकून पिल्याने काय होते?
नवीन व्यवसाय चालू करायच्या काही टिप्स?