स्वयंपाक
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
2
Answer link
हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद -
ii. मराठी भाषेची खास शैली -
परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको : 'तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?" नवरा : 'नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!"
आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण बनवणे' हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भातरांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त 'बनवले' जातात. मराठीत 'बनवणे म्हणजे 'फसवणे' असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस 'बनवणारा' जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे' हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. 'मारणे' म्हणजे 'मार देणे' हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार