संगीत संगीतकार

पाश्चात्य संगीत म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

पाश्चात्य संगीत म्हणजे काय?

2
जागतिक संगीत क्षेत्रात ज्या अत्यंत प्रभावी संगीत पद्धती मानल्या जातात . त्यामध्ये पाश्चात्य संगीतास मानाचे स्थान द्यावे लागेल. भारतीय संगीत जागतिक संगीताच्या तुलनेत सर्व श्रेष्ठ संगीत म्हणून ओळखले जाते . संगीतातील राग पद्धती हि एक अतुलनीय व अजोड अशी स्वरांची किमया आहे. परंतु अशा प्रकारचे राग्पद्धतीवर आधारित संगीत भारतातच वापरले जाते . त्या तुलनेने विचार केला तर पाश्चात्य संगीत व पाश्चात्य स्वर लेखन यांचा प्रचार जगाच्या पाठीवर फार मोठ्या प्रमाणात आहे . भारतावर इंग्रजांनी जवळजवळ दीडशे वर्षे केले. त्यांच्या राहणीचा , आचार-विचाराचा ,एकूण पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम भारतीय जीवनावर झालेला येतो. परंतु भारतीय संगीतावर मात्र पाश्चात्य संगीताचा तसा कोणताही परिणाम झाला नाही . भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा याही कालखंडात स्वच्छ व निर्मल राहिली . मात्र अलीकडे लोकप्रिय झालेल्या हिंदी चित्रपट (काही अंशी मराठी चित्रपट पण ) संगीतावर या पाश्चात्य संगीताचा प्रभाव पडला असून , त्या संगीत रचनात हार्मनीवर आधारलेली रचना , तशाच स्वरूपाचे वाद्य मेळ यांचा सर्रास वापर केला जातो. काही मराठी गाणी तर अशा पाश्चात्य स्वर रचनेमुळे हास्यास्पद वाटतात .


हार्मनी : पाश्चात्य संगीतात सामुहिक गायन किंवा सामुहिक वादन याला प्राधान्य दिले जाते . त्यामुळे त्यांच्या सर्व संगीताची उभारणी वृंदवादन किंवा वृंदगान याला उपयुक्त अशी असते . हार्मनी हा पाश्चात्य संगीताचा प्राणभूत आधार आहे. हार्मनी म्हणजे स्वरमेळ . दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्वर एकाच वेळी वाजवणे या क्रियेला हार्मनी किंवा स्वरमेळ म्हणतात .
मेलोडी: मेलोडी म्हणजे एकापुढे एक स्वर, स्वरसंगीताने घेऊन एक एक स्वराचा आकर्षक आविष्कार करीत संगीत बांधायचे . मेलोडी म्हणजेच स्वरसंगती होय .

स्केल्स : पाश्चात्य संगीतातील स्केलचा विचार करण्यापूर्वी पाश्चात्य संगीताबाबत एक महत्वाची गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे पाश्चात्य संगीतात सा हा स्वर निश्चित असतो . आवाजाच्या चढ -उताराची मानवी कंठाची क्षमता व्यक्ती व्यक्ती प्रमाणे भिन्न असल्याने भारतीय संगीतात स या स्वराचे स्थान निश्चित नाही . कोणाचा पांढरी एक हा सा असेल तर कोणाचा काळी एक हा सा असेल. पाश्चात्य संगीत प्रधान गायन-वादन (आर्क्रेस्टा )असल्याने , त्यांनी सा हा स्वर निश्चित केला आहे . पियानो हे पाश्चात्य संगीताचे आधारभूत वाद्य आहे. या वाद्यावरील सर्व पांढऱ्या पट्या शुद्ध स्वरांच्या व सर्व काळ्या पट्या विकृत स्वरांच्या मानल्या गेल्या आहेत . पियानोवरील पांढरी एक हा स्वर सप्तकातील सा मानला असून तो निश्चित केला गेला आहे . त्याची कंपनसंख्या पण २४०हि निश्चित केली आहे . पाश्चात्य संगीतात या सा स्वरालाच फक्त सा म्हणतात .



कार्ड्स : पाश्चात्य संगीत रचनेत स्केल्स प्रमाणे कार्ड्स चा उपयोग केला जात असल्याने कार्ड्स प्रकार हाही पाश्चात्य संगीताचा आधार मानला जातो . भारतीय संगीतात हा प्रकार नाही . भारतीय संगीतात सा -मम किंवा सा -प असे स्वरसंवाद आहेत . उलट पाश्चात्य संगीतात कार्ड्स प्रकारात अनेक विसंगत स्वर एकत्र आणून एक वैचित्र्यपूर्ण पण आकर्षक स्वर रचना केली जाते . उदा . ध सा ग , सा ग प या दोन कार्ड्स वर आधारित आहे . 
भारतीय संगीतात शेकडो राग -रचना आहेत . तर पाश्चिमात्य संगीतात शेकडो कार्ड्स असून अशा अनेक कार्ड्सनी पाश्चात्य संगीत समृद्ध बनवले आहे .     


उत्तर लिहिले · 4/1/2022
कर्म · 121725

Related Questions

संगीतकाराचे कौशल्य ललित कला व ललित लेटर कलांमधील कलानंदाचे स्वरूप काळ व सामाजिक परिस्थिती?
संगीतातील सात मूळ स्वरांच संच?
गिटारची एवढी का क्रेझ आहे तरुणाईत ? एवढं काय विशेष आहे त्यात ? सूर पण एकदम बेसूर असतात,त्यापेक्षा हार्मोनियम, पियानो,सनई अशी किती तरी सुरेल वाद्ये आहेत , फक्त दिसायला स्टायलिश एवढंच एक कारण असेल का ?
व्हायोलिनची माहिती मिळेल का?
राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
मला स्वतःचा DJ घ्यायचा आहे त्यासाठी ऑपरेटिंग कोर्स वगैरे करावा लागतो का?
रानू मंडलच्या या मेकअपला लागला होता इतका वेळ, वाचा सविस्तर?