1 उत्तर
1
answers
व्हायोलिनची माहिती मिळेल का?
3
Answer link
व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. व्हायोलिनलाच फिडल म्हणतात. भारतात या वाद्याला बेला हे नाव आहे..
चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते.
भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरुन गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.