गाणे भक्ती

देशभक्तीपर गाणी कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

देशभक्तीपर गाणी कोणती आहेत?

2
देशभक्ती वर भरपूर गाणी आहेत.

राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासना तळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
*****************************
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
***************************
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती? देव, देस अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं लढुन मरावं मरुन जगावं हेच आम्हाला ठावं देसापायी सारी इसरू माया ममता नाती  
****************************
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
****************************
जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते तुजसाठि मरण तें जनन तुजवीण जनन तें मरण तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण
**************************
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
***************************
उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर हो युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला उठा उठा, चला चला वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला उठा उठा, चला चला चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू शूरता शिवाजीची नसानसांत साठवू दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला उठा उठा, चला चला यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला उठा उठा, चला चला
****************************
म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात !
***************************
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला हे कोटिकोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू बलवंत उभा हिमवंत करि हैवानांचा अंत हा धवलगिरी, हा नंगा हा त्रिशूळ कांचनगंगा जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार ह्या नसानसांतिल रक्त जाळील आसुरी
***************************
उत्तर लिहिले · 11/8/2022
कर्म · 51830
0

देशभक्तीपर गाणी (Deshbhakti Songs) म्हणजे अशी गाणी जी देशावर प्रेम व्यक्त करतात, देशासाठी त्याग करण्याची भावना जागृत करतात आणि देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असतात.

काही लोकप्रिय देशभक्तीपर गाणी:

  • ऐ मेरे वतन के लोगों - लता मंगेशकर
  • मेरे देश की धरती - महेंद्र कपूर
  • जहां डाल डाल पर सोने की चिड़िया - मोहम्मद रफी
  • ये देश है वीर जवानों का - मोहम्मद रफी, मन्ना डे
  • भारत हमको जान से प्यारा है - हरीहरन
  • माँ तुझे सलाम - ए. आर. रहमान
  • ऐसा देस है मेरा - लता मंगेशकर, उदित नारायण
  • संदेशे आते हैं - सोनू निगम, रूप कुमार राठोड
  • रंग दे बसंती चोला - सुखविंदर सिंग, दलेर मेहंदी
  • चक दे इंडिया - सुखविंदर सिंग

या व्यतिरिक्त, अनेक चित्रपट आणि अल्बममध्ये देशभक्तीपर गाणी आहेत.

तुम्ही YouTube आणि इतर संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ही गाणी ऐकू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 230

Related Questions

आद्यआत्मा, अध्यात्म, विद्य, विज्ञान, सुज्ञ, प्रज्ञान, सत्संग, विवेक तसेच आर्त, आर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन, आयुष्याचे वस्त्र विणणे, याला प्रेम, नम्रता, एकत्वाची जोड देणे याला जीवन असे नाव? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे, आषाढी एकादशी आहे.
योग्य खात्रीशीर बियाणे मिळेल, ते विकणारे व विकत घेणारे आम्ही कशावर विश्वास ठेवावा? उगवण झाली नाही तर कशाला दोष देणार? नशिब की उपजाऊ माती? शुद्ध बीजापोटी.. इथं बीजाला महत्व आहे? मग खरं बियाणे कसे पारखावे? माय मातीची ओटी भरताना श्रद्धा, भक्ती, भावनेने केलेली प्रार्थना महत्त्वाची? स्पष्ट करा.
विठ्ठलाला आपलेसे करण्यासाठी संत जनाबाईंनी कशाप्रकारे भक्ती केली?
आचार्य विनोबा भावे यांची 'गीता प्रवचने' मिळवा. त्यात सगुण निर्गुण भक्तीचे विवेचन असणाऱ्या १२ व्या अध्यायातील सगुण निर्गुण भक्ती विषयी सुमारे २० ओळी लिहा.
वरीलपैकी काय परकीय शब्द आहे: भौतिक संस्कृती, भक्ती, संगीत, परीट?
गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा, शब्दशक्ती कोणती येईल?
योगी केला पुस्तकातून, सपना डीजे सॉंग, पहिली भक्ती कोणती? भूषण माझी कथा श्रवण करावी याची सेवा करा, मानापमान सोडून शेवटी भगती, मामा गुणगान करणे, छोड कपाटाची घाण सोडून माझ्या भक्तीचा गुणगान करा, लेखिकेला पुस्तकातून भेटणारे जोग कोण?