1 उत्तर
1
answers
विठ्ठलाला आपलेसे करण्यासाठी संत जनाबाईंनी कशाप्रकारे भक्ती केली आहे?
1
Answer link
.
१.सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ .
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.
२.‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *