Topic icon

भक्ती

0
आद्य आरंभ आई माझी माय माऊली जिच्या ठायी एक तत्व आद्य पूर्ण असा जो ईश्वर ज्याची ओळख करून सहजतेने विशालतेकडे झेपावत जाणं शक्य आहे.
त्याकरिता आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे.
होय , त्यासाठी आई कडून आशिर्वाद घेऊन आत्म तत्व काय आहे, त्याचं शिक्षण झाले तर मला तुम्हांला माहिती मिळेल अशी एक देवता जी विद्या सरस्वती आहे तिच्याकडून जाणकारी प्राप्त होते . मानवाला कान नाक डोळे तोंड पाय  त्वचा  आदि सजग संवेदनशील असे मिळाले आहेत. त्याद्वारे आपल्याला जाणकारी ओळख करून देण्यात हे मन मेंदू मनगट मजबूत करावे लागते. विद्या सरस्वती ही काया मने वाचे आपणांस उघड्या डोळ्यांनी शिक्षण देते. या निसर्गातील पशुपक्षी कीटक झाडे वनस्पती वनराई तसेच हे डोंगर दर्यां निर्झर धबधबे जलप्रवाह नदी ओहळ सागर आकाश आदि द्वारे शिक्षण उपलब्ध आहे.  हे उद् भव पाहून ओळख ही  दृढ विश्वासाने कायमदायम होते आणि मनी समर्थपणे रूजते. कारण देवाचेच देणं जे वर्तमान आज ही आहे पूर्वीही होते व निसर्ग पुढेही तेच चालू ठेवेल. कारण कणाकणात देवकणांची ऊर्जा ताकद शक्ति बळ अजर अमर आहे हा विश्वास आहे.
हे सुज्ञानी लोक जाणतात आणि मग हे विज्ञान नियमांचा आधार घेत आपले कौशल्य वाढीस लागते. हे एकच एक तत्व दृढ आहे तर मग आपण विवेक विचारधारा जपुन काही मिलवर्तन परिवर्तन घडवून आणू शकतो . हा विश्वास स्थिरमनाचा भाग माणसाला स्वस्थ कसा बसू देईल . जर निसर्ग कायमदायम समर्थपणे आपले चक्र सुरू ठेवतोय तर माझी निरिक्षणे नोंदवली पाहिजेत व बदल करता येणार अशी बुद्धी त्यांनेच दिली आहे. तिचा वापर करून मला प्रतिसाद मिळतोय का याचा विचार मागोवा हे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रज्ञान एकमेकांना पूरक होईल ही जिज्ञासा जागी झाली. यात आर्तता आहे व अर्थार्जन ही आहे . मग आपले ज्ञान तेजाचे प्रतीक हे झळकले पाहिजे अशी निर्मल ओढ लागली. 
ही आर्तता आर्थार्थी जिज्ञासू वृत्तीने ज्ञानी बनली तरच मिलवर्तन एक सद्भाव सद्विचार पुढे परिवर्तन घडुन येईल ही खात्री झाली. यातूनच नवविधा भक्ती भाव मिळत गेला .आणि माणूस या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधताना तहानभूक विसरला . उपासतापास  सुरू झाले . व्रतवैकल्ये साधनं समोर आली. एक नवीन दृश्य पाहून आनंदित वृत्तीने सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतील हे जाणून तो हरीला भजू लागला . आता हरी हा व्यथा दूर करणारा , हर्ता कर्ता करविता आहे .ही मूळ माऊली आई आहे .आणि आत्मा ईश्वरी देहादेही एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी...अशी ही आठवण ...कधी विसर ना व्हावा...संतसंग देई सदा ...असा भाव... भाव तोचि देव भावेविण देव न कळे नि :संदेह ... ही भावना स्थिर झाली , आणि हृदयांहृदयी हा अंश देवकणं प्रत्येक मानवी हृदयांत 
 लपला आहे तोच आत्मा हा पांडुरंगाचा एक अंश  आहे त्यालाच आपण सतत सक्रीय सहभाग घेऊन कार्यप्रवण करण्यासाठी सतत ध्यानी मनी जागृती स्वप्नी नामामृताने अंभ्यग्यस्नान घालावे लागेल . भजन पूजन कीर्तन सत्संग सेवेने हा अंश चमकदार बनतो व मुखकमलावर एक गोड तेज येते . असा चैतन्य लावण्याचा गाभा प्रकाशित राहील हे पाहिले पाहिजे. आयुष्याचा ताणाबाणा बुनियाद विणं ही रेशीम वस्त्राप्रमाणे मजबूत व्हावी . हातात काम मुखाने राम..
हे विठ्ठल, विठ्ठल जय हरी नाम अमृत कुपी साधुसंतांना सापडली .
म्हणून तो हा विठ्ठल बरवा,तो हा माधव बरवा करीत पायी वारी करत आहे कारण तो देव एक करूनी घ्यावा, त्याशिवाय सुख समाधान नाही. ही खात्री आहे की, विटेवरचा पांडुरंग हा वाटसरूंना , चुकलेल्या लोकांना , थकलेल्या जीवाला, असाह्य वेदनांना पळवून लावणारा तसेच आंधळ्या पांगळ्यांना ही डोंगर पार करायला बळ देतोय ,असा विश्वास वाटतो. 
आणि म्हणूनच जनजागृती व्हावी यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी भावार्थी आपल्यात सामावून घेत मनं जोडण्याची किमया साधत ही आषाढी एकादशी निमित्त जी वारी आहे तिला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, देवशयनी एकादशी या व्रताचा ही महिमा आहे, तुझे नाम घेता देवा होई समाधान...असं  ते प्रेमानं जगणं सुंदर करीत पुढे वाट चालत आहे.सर्व दुःख यातना सहन करत तो भजनात किर्तनात एकरसी एकनिष्ठ एकजीवी दैदिप्यमान प्रेम कामगिरी विश्वासाने पार पाडतो आहे.. कारण विठ्ठल मी पाहिला... आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे हरि पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी व्यापक हा मुरारी...
वि म्हणजे विनाश ना होणारा अटळ अजर अमर अखंड                          एकच एक जो विशुद्ध आहे..
ठ्ठ म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे मागे उभा मंगेश पुढे उभा                    मंगेश असा ठासून भरलेला 
ल म्हणजे ज्याला अंत लय नाही असा...हा पांडुरंग 
तो पूर्ण अंश प्रभु परमात्मा आहे..
वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी !!!
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी आहे आणि म्हणूनच या वारीत .... १. कुणालाही निमंत्रण नाही 
२. कुठलीचं भंपकबाजी नाही.
३.कोणाचा कोणावर राग रूसवा नाही 
४. कोण खायला घालेल की नाही हे माहित नाही 
५.खिशात एक रूपया या दमडीची गरज नाही 
६.कुठेही गालबोट लागत नाही 
७.इहलोकी एवढां मोठा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही  नाही 
८. कोठेच कुणाजवळ गर्वाचा किंवा अहंकाराचा लवलेश नाही 
९. असा नेत्रदिपक सोहळा , ऊर भरून आनंद प्रसन्नता लाभणारा सोहळा 
१०. श्रीमंतच नाही तर गर्भश्रीमंतीचा सोहळा,कुबेराला ही लाजवेल असा दिमाखदार सोहळा 
११.   हा सगळा वारीचा अट्टाहास का ?
         तर फक्त....
       मुख दर्शन व्हावे आता, 
        तू सकळं जनांचा दाता  ||
       घे कुशीत या माऊली तुझ्या 
        पायरी ठेवीतो माथा. !!!

या आषाढी एकादशीच्या दिवशी आपले मन नमन करून सहजतेने विशालतेकडे पहात ... देवा तूचि गणेशु, सकलार्थ मति प्रकाशु... भला करो कर्तार,सबका सबविधी हो कल्याण !!!
दुरितांचे तिमीर जावो,विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ...
जो जो वांछिल ते ते लाहो सकळ प्राणिजात  !!
विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय जय राम कृष्ण हरी !!

 
उत्तर लिहिले · 17/7/2024
कर्म · 475
2
श्री गणेशा .. म्हणणं ही खरी रीत आहे.
एकतर विश्वासाने एक तत्व दृढ धरी मना...असा भाव ठेवून नेहमीच्या ठिकाणी, त्या दुकानात जाऊन माल घ्यावा.
दुसरं असं आहे, आपली शेती ,माती आमची मेहनत ,श्रम यांची बांधिलकी प्रेमभाव आहे . नियोजन हवे.पाणी व बी पेरताना योग्य जाणीवेतून सुंदर परिस्थिती वस्तुस्थिती पाहता जमिनीला सुयोग्य घहात पाहिजे ते पाहून , आपली तयारी..बी पेरताना आनंदी मन हवे . 
सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतात . माती परीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी.सुयोग्य पाणी नियोजन रहावे . 
आणि खात्रीशीर बियाणे उगवण शक्ती आदि अजमवावी .
सगळं काही प्रेमानं केल़ तर सेवा निर्मल महान कार्य करते.
पेरुनि शेता जाईजे... पहा उगवण क्षमता ऊर्जा बलस्थान आहे ते कर्म बोलते आहे... निश्चितच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात.. तण खुरपणी कोळपणी कौशल्याने करा . खतमात्रा द्यावी. पाणी पुरवठा पावसाने योग्य हजेरी लावली तर आपले पिक शिवारात उभे राहिल डोलेल वाढेल बिजधारणा वगैरे पोषक वातावरण निर्माण होईल.. ही ईश्वरचरणी प्रार्थना करत रहायचं असतं... शेवटी आधार कोणाचा शोधावा... त्या एकाचा !!
उत्तर लिहिले · 14/6/2024
कर्म · 475
1
.


१.सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ .
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.


२.‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट 
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *
उत्तर लिहिले · 24/7/2023
कर्म · 48465
2
देशभक्ती वर भरपूर गाणी आहेत.

राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासना तळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
*****************************
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
***************************
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती? देव, देस अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं लढुन मरावं मरुन जगावं हेच आम्हाला ठावं देसापायी सारी इसरू माया ममता नाती  
****************************
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
****************************
जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते तुजसाठि मरण तें जनन तुजवीण जनन तें मरण तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण
**************************
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
***************************
उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर हो युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला उठा उठा, चला चला वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला उठा उठा, चला चला चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू शूरता शिवाजीची नसानसांत साठवू दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला उठा उठा, चला चला यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला उठा उठा, चला चला
****************************
म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात !
***************************
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला हे कोटिकोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू बलवंत उभा हिमवंत करि हैवानांचा अंत हा धवलगिरी, हा नंगा हा त्रिशूळ कांचनगंगा जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार ह्या नसानसांतिल रक्त जाळील आसुरी
***************************
उत्तर लिहिले · 11/8/2022
कर्म · 48465
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
 गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा शब्द भक्ती
उत्तर लिहिले · 10/3/2022
कर्म · 0