भक्ती
योग्य खात्रीशीर बियाणे मिळेल , ते विकणारे व विकत घेणार आम्ही कशावर विश्वास ठेवावा ? उगवण झाली नाही तर कशाला दोष देणार ? नशिब की उपजाऊ माती ? शुद्ध बीजापोटी.. इथं बीजाला महत्व आहे ? मग खरं बियाणे कसे पारखावंं .. माय मातीची ओटी भरताना श्रद्धा भक्ती भावनेने केलेली प्रार्थना महत्वाची ? स्पष्ट करा .
1 उत्तर
1
answers

2
Answer link
श्री गणेशा .. म्हणणं ही खरी रीत आहे.
एकतर विश्वासाने एक तत्व दृढ धरी मना...असा भाव ठेवून नेहमीच्या ठिकाणी, त्या दुकानात जाऊन माल घ्यावा.
दुसरं असं आहे, आपली शेती ,माती आमची मेहनत ,श्रम यांची बांधिलकी प्रेमभाव आहे . नियोजन हवे.पाणी व बी पेरताना योग्य जाणीवेतून सुंदर परिस्थिती वस्तुस्थिती पाहता जमिनीला सुयोग्य घहात पाहिजे ते पाहून , आपली तयारी..बी पेरताना आनंदी मन हवे .
सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतात . माती परीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी.सुयोग्य पाणी नियोजन रहावे .
आणि खात्रीशीर बियाणे उगवण शक्ती आदि अजमवावी .
सगळं काही प्रेमानं केल़ तर सेवा निर्मल महान कार्य करते.
पेरुनि शेता जाईजे... पहा उगवण क्षमता ऊर्जा बलस्थान आहे ते कर्म बोलते आहे... निश्चितच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात.. तण खुरपणी कोळपणी कौशल्याने करा . खतमात्रा द्यावी. पाणी पुरवठा पावसाने योग्य हजेरी लावली तर आपले पिक शिवारात उभे राहिल डोलेल वाढेल बिजधारणा वगैरे पोषक वातावरण निर्माण होईल.. ही ईश्वरचरणी प्रार्थना करत रहायचं असतं... शेवटी आधार कोणाचा शोधावा... त्या एकाचा !!