कारखाना
पहिल्या महायुद्धाची कारणे कोणती होती?
1 उत्तर
1
answers
पहिल्या महायुद्धाची कारणे कोणती होती?
1
Answer link
पहिल्या महायुद्धाची कारणे
1) युरोपियन राष्ट्रांचा साम्राज्यवाद - 1) 19 व्या शतकात युरोपियन राष्ट्रांनी वसाहतवादाचा स्वीकार केला.
2)स्वतःच्या मालकीची साम्राज्ये असणे, हे राष्ट्रीय प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले.
3) औद्योगिकीकरण झालेल्या राष्ट्रांना हुकमी बाजारपेठा व कच्चा माल पुरवणाऱ्या प्रदेशाची गरज होती.
4) या सत्तास्पर्धेत इंग्लंड - फ्रान्स आघाडीवर होते.
5) जर्मनी व इटली सत्तास्पर्धेत उशिरा उतरल्याने युरोपिय राष्ट्रांत कलह वाढून त्याचे पर्यवसान महायुद्धात झाले.
2) आक्रमक राष्ट्रवाद - 1) आपले राष्ट्र आणि परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. या साम्राज्यवादी राष्ट्रांच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतून युरोपात आक्रमक राष्ट्रवाद वाढीस लागला.
2) राष्ट्राचा प्रादेशिक विस्तार जेवढा मोठा, तेवढी त्या राष्ट्राची शक्ती व प्रतिष्ठा मोठी, अशी युरोपियन राष्ट्रांची समजूत झाली
3) या समजुतीतूनच जर्मनी, रशिया, आॉस्ट्रिया, आदि बडि राष्ट्रे विस्तारवादी बनली.
3) तात्कालिक महायुद्धाचे कारण - 1) 28 जून 1914 रोजी आॉस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियन नागरिकाने हत्या केली.
2) पहिल्या महायुद्धाचे हे तात्कालिक कारण ठरले..