1 उत्तर
1
answers
दगड दवाखाना ही कथा कोणी लिहिली आहे ?
1
Answer link
मलोसे यांनी लिहिलेल्या 'महात्मा गांधी दगड दवाखाना' या कथासंग्रहातील 'दगड दवाखाना' ही कथा बीएच्या प्रथम वर्षाच्या 'समकालीन मराठी कथा' या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून, हे पुस्तक पुण्याच्या अक्षरबंध प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ... सन २०१९ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या या पुस्तकाचे संपादन डॉ.मलोसे
जिल्ह्यातील चांदवड येथील ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या कथेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
डॉ. मलोसे यांनी लिहिलेल्या 'महात्मा गांधी दगड दवाखाना' या कथासंग्रहातील 'दगड दवाखाना' ही कथा बीएच्या प्रथम वर्षाच्या 'समकालीन मराठी कथा' या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून, हे पुस्तक पुण्याच्या अक्षरबंध प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात डॉ. मलोसे यांच्यासह बाबूराव बागूल, भास्कर चंदनशिव, गौरी देशपांडे, सदानंद देशमुख, उषाकिरण आत्राम, अभिराम भडकमकर, संजय कळमकर, सचिन पाटील यांच्या कथांचा समावेश आहे. सन २०१९ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या या पुस्तकाचे संपादन डॉ. शिरीष लांडगे, डॉ. दिलीप पवार व डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे. डॉ. मलोसे यांच्या यापूर्वी 'स्वप्नपंख', 'गाथा सप्तपदी' या कादंबऱ्यांसह नखपुराण, मोबाइलपुराण, अंघोळपुराण, 'बखर व तुझं माझं घर' आदी पुस्तके प्रकाशित असून, त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत.