कर्ज
कागदपत्रे
मी दिव्यांग आहे मला चहा सेंटर फ्रँचायजी घ्यायची आहे त्यासाठी कर्ज प्रकरण करायचे आहे मी काय करू शकतो या कर्ज प्रकरणासाठी कुणी काही सांगू शकेल का कृपया किंवा हे बीजभांडवल प्रकरण काय असत ते कुणी माहिती देऊ शकेल काय आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
1 उत्तर
1
answers
मी दिव्यांग आहे मला चहा सेंटर फ्रँचायजी घ्यायची आहे त्यासाठी कर्ज प्रकरण करायचे आहे मी काय करू शकतो या कर्ज प्रकरणासाठी कुणी काही सांगू शकेल का कृपया किंवा हे बीजभांडवल प्रकरण काय असत ते कुणी माहिती देऊ शकेल काय आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
3
Answer link
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना. ... अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजने अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के एवढी रक्कम अनुदान व 80 टक्के एवढी रक्कम बँकेकडून कर्जरुपात देणे
दिव्यांगसाठी कर्ज योजना
महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधःकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणावे या उद्देश्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ डिसेंबर २००१ रोजी, जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्याचा शासन निर्णय जारी केला. त्याप्रमाणे कंपनी अधिनियम १९५६ नुसार दिनांक २७ मार्च २००२ रोजी महराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली. अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा अंगीकृत उपक्रम असणारे हे महामंडळ ही एक स्वायत्त संस्था असून महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रुपये ५०० कोटी एवढे आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम (NSHFDC), फरीदाबाद (हरियाना) या राष्ट्रीय महामंडळाच्या योजनांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम प्रामुख्याने या महामंडळाद्वारे केले जाते.
अपंग बांधवांना पारदर्शक व तत्पर सेवा देता यावी म्हणून नुकतेच महामंडळाचे आय.एस.ओ. ९००१:२००८ हे अंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.
उद्दिष्ट
राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी विवध योजना राबविणे
वैयक्तिक थेट कर्ज योजना
उद्देश : मुख्यत्वे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करणे.
कर्जाची कमाल मर्यादा : रुपये २0 हजार.
व्याजदर : दरसाल दरशेकडा २%
परत फेडीचा कालावधी : ३ वर्षे (मासिक/ त्रैमासिक)
उत्पन्नाची कमाल मर्यादा : १ लाखा पर्यत (उत्पन्नाचा दाखला जोडावा)
वय मर्यादा : १८ ते ५५ वर्षे
अर्जदार योग्य तो कोणताही व्यवसाय निवडू शकतो.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१. मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा.
२. १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबत दाखला /डोमिसाईल सर्टीफिकेट.
३. वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
४. अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
५. उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण भागासाठी तलाठी/शहरी भागासाठी तहसीलदार)
६. निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत /आधार कार्ड /पॅन कार्ड किवा अपंग ओळखपत्र.
७. पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)
८. जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा)
वैधानिक कागदपत्र
नमुना क.
१. जमीनदार वैयक्तिक माहिती
२. पैसे दिल्याची पावती
३. डि. पी. नोट
४. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु च्या स्टॅम्प पेपरवर)
५. जमीन करारनामा (१०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)
या योजनेअंतर्गत अपंग व्यक्ती कोणताही लघु उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकतो.
प्रकल्प मर्यादा : रुपये ५ लाखापर्यंत
व्याजदर (वार्षिक): रुपये ५०,०००/- पर्यंत ५%
रुपये ५०,०००/- वरील ६%
स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे .
तसेच अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात ०.५% टक्के सुट अनुज्ञेय आहे.
परत फेडीचा कालावधी: ५ वर्षे
लाभार्थीचा सहभाग : ५% (एक लक्षावरील कर्ज प्रकरणाकरीता)
अर्जदार योग्य तो कोणताही व्यवसाय निवडू शकतो.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत/ आधार कार्ड/ पॅन कार्ड किंवा अपंग ओळखपत्र
पासपोर्ट साईज व पूर्ण आकारच फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)
जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकांची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा )
कर्जबाजारी/वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतीज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल रु.३ लाख पर्यत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल.
दरपत्रक
रुपये ३ लाख पेक्षा जास्त कर्जासाठी शासकिय सेवेत असलेल्या जामीनदाराची कागदपत्रे (पगारपत्रक, ओळखपत्र व हमीपत्र)
वैधानिक कागदपत्र
नमुना क्र.
१. स्थळपाहणी
२. जामीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी.पी. नोट
५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थीच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
६. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर )
७. तारण करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर ) पशुपालन व्यवसायाकरिता नमुना क्र. १,२,३,४,५,७,९
महिला समृध्दी योजना
या योजनेअंतर्गत अपंग महिला कोणताही लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकते. मुख्यत्वे करून अपंग महिलांचे स्वावलंबनाकरीता प्राधान्य दिले जाते. तसेच अपंग महिलांना व्याजदरामध्ये १% सुट दिल्या जाते.
वार्षिक व्याजदर
रुपये ५०,०००/- पर्यंत ४%
रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाख पर्यंत ५%
रु. ५ लाखापेक्षा जास्त ७%
परत फेडीचा कालावधी ५ वर्षे
लाभार्थ्याचा सहभाग ५% (१ लक्षावरील कर्ज प्रकरनाकारिता)
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण तया भरलेला असावा.
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्या बाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत/आधार कार्ड /पॅन कार्ड किवा अपंग ओळखपत्र
पासपोर्ट साईज व पूर्ण आकारचा फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)
जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा)
कर्जबाजारी/ वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल रु. ३ लाख पर्यंत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल.
दरपत्रक.
ज्यांचे हद्दीत व्यवसाय करावयाचा आहे त्यांचे व्यवसाय करण्यास हरकत नसल्याबाबत प्रमाणपत्र (ग्रामीण भागाकरिता ग्रामपंचायत, सरपंच किंवा सचिव, शहरी भागाकरिता महानगर पालिका किंवा गुमास्ता प्रमाणपत्र)
वैधानिक कागदपत्र
नमुना क्र.
१. स्थळपाहणी
२. जमीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी.पी. नोट
५. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
६. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
७. तारण करार नामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर) पशुपालन व्यवसाया करिता नमुना क्र. १,२,३,४,५,७,९
मुदती कर्ज योजना (पशुसंवर्धन)
प्रकल्प मर्यादा : रु. ५ लाख पर्यंत
व्याज दर (वार्षिक) : रु. ५००००/- पर्यंत ५%
रु. ५००००/- वरील ६%
स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे.
परत फेडीचा कालावधी : ५ वर्षे
लाभार्थींचा सहभाग : ५% (एक लक्षावरील कर्ज प्रकरणाकरिता)
स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे .
तसेच अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात ०.५% सुट अनुज्ञेय आहे
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्या बाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
वयाचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत )
निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत /आधार कार्ड / पॅन कार्ड / किवा अपंग ओळखपत्र.
पासपोर्ट साईज व पूर्ण आकारचा फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)
जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा)
कर्जबाजारी/ वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
व्यवसायात मदत करण्याच्या हमीबाबत प्रतिज्ञापत्रक (फक्त वाहन कर्जासाठी)
व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल व दरपत्रक.
पशुवैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त असल्याबाबत दाखला (फक्त पशुपालन व्यवसायासाठी)
ज्यांचे हद्दीत व्यवसाय करावयाचा आहे त्यांचे व्यवसाय करण्यास हरकत नसल्याबाबत प्रमाणपत्र(ग्रामीण भागाकरिता ग्रामपंचायत, सरपंच किंवा सचिव, शहरी भागाकरिता महानगर पालिका किंवा गुमास्ता प्रमाणपत्र )
वैधानिक कागदपत्र
नमुना क्र.
१. स्थळपाहणी
२. जमीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी.पी. नोट
५. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
६. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
७. तारण करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
सुक्ष्म पतपुरवठा योजना
नोंदणीकृत अशासकीय संस्था मार्फत स्वयंसहाय्यता बचत गटास कर्ज पुरवठा करणेसाठी संस्थेला रु. ५ लाखापर्यंत कर्ज
नोंदणीकृत संस्थेला सभासदांसाठी थेट कर्ज.
संस्था बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त रुपये २५०००/- पर्यंत कर्ज देऊ शकते. तथापि जास्तीत जास्त सभासदांना कर्ज वितरीत करणे अपेक्षित आहे.
संस्थेचा एकूण कर्ज रकमेच्या २५% राहील. सदर रक्कम हमीशुल्क म्हणून महामंडळात जमा करावी लागते.
लाभार्थींना ५% दराने व्याज आकारले जाते व महिलांना १% सुट दिली जाते.
परतफेडीचा कालावधी ३ वर्षे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
विहित नमुन्यातील पुर्ण भरलेला कर्ज मागणी अर्ज (रु. ५ लाखापर्यंत २ प्रती मध्ये व त्यावरील प्रकरण असल्यास ३ प्रती मध्ये साक्षांकित कागदपत्रे अर्जासह)
संस्था नोंदणी प्रमाणपत्र
संस्था निवेदन (मॅमोरॅन्डम)
संस्थाचे उद्देश
कार्यकारी सभासद यादी
आमसभा ठराव (बैठक क्र.)
मागील तीन वर्षात संस्थेद्वारा अपंगांसाठी केलेल्या कार्याचा तपशील अहवाल
कोणत्याही वित्तीय संस्थान / राज्य किंवा राष्ट्रीय सरकार मान्य संस्थान / आंतराष्ट्रीय वित्तीय संस्थान कडून घेतलेल्या अर्थ सहाय्य बाबत माहिती
संस्थाद्वारे कर्ज स्वरुपात अर्थ सहाय्य पुरवठा करण्यात येणाऱ्या लाभार्थींची यादीत नमूद विषय नाव, पत्ता, वय, जात, अपंग टक्केवारी, ग्रामीण किंवा शहरी, वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचा तपशील, लाभार्थीद्वारा मागणी केलेली रक्कम
संस्थेचा मागील तीन वर्षाचा अधिकृत लेखा अहवाल
संस्थेचे पॅन कार्ड, बँक खाते, पासबुक, जागेबाबतचे कागदपत्र यांचे साक्षांकित सत्यप्रत
वैधानिक कागदपत्र -
कर्जमंजुरी नंतर वैधानिक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा कार्यालयात करावी लागेल.
शैक्षणिक कर्ज योजना
एच.एस.सी. नंतर स्वत: अपंग असलेला शिक्षणार्थी/प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एच.एस.सी. नंतर नोकरी मिळण्यायोग्य असलेल्या सर्व पाठ्यक्रमाकरिता ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे. सदर पाठ्यक्रम शासन मान्य असावा. या कर्ज योजनेत वसतिगृह, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकाम निधी इ. शुल्क व पुस्तके, पोषाख खरेदी, शैक्षणिक यंत्र व उपकरणे खरेदी, प्रवास खर्च, संगणक खरेदी पन्नास हजार रुपयापर्यंत दुचाकी वाहन खरेदी, शैक्षणिक साहित्य व साधने खरेदी, फिल्ड वर्क, प्रोजेक्ट वर्क इ. सर्व खर्च कर्ज रक्कमेकरिता ग्राह्य धरण्यात येतात.
कर्ज मर्यादा : देशांतर्गत रुपये १० लाख
परदेशात रुपये २० लाख
वार्षिक व्याज दर : ४%
महिलांना ३.५%
कर्ज परतफेड : ७ वर्षे
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
शैक्षणिक कर्ज अर्ज पूर्णतया भरलेला असावा. (४ प्रती मध्ये साक्षांकित करून)
अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
वयाचा दाखला (एच.एस.सी. टिसी)
शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र
एक पासपोर्ट साइज व एक पूर्ण आकाराचे फोटो (तीन प्रती करिता एकूण आठ)
कोणत्याही शासकीय यंत्रणेतून वित्तीय सहाय्य घेतले नाही याबाबत १००/- रु. स्टॅम्पपेपरवर वर प्रतिज्ञापत्र
मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्या बाबतच्या गुणपत्रिका
शिष्यवृत्ती अथवा शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळत असल्यास त्याबाबत तपशील द्यावा.
अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र (बोनाफाईड)
लाभार्थ्यांचे सादर करावयाचे अभ्यासक्रमाला लागणाऱ्या खर्चाचे पत्रक
लाभार्थींच्या वैयक्तिक बँक खात्याचे मागील सहा महिन्याचा लेखाजोखा असलेले
बँक द्वारा प्रमाणित केलेली स्वाक्षरी पडताळणी प्रमाणपत्र.
पासपोर्ट/मतदान ओळखपत्र/अधिवास अथवा रहिवासी दाखला (Domecile)
पालकांचा उत्पन्नकर दाखला (मागील दोन वर्षाचा)
उत्पन्नाबाबतचा दाखला (पगार पत्रक)
स्थावर मालमत्ता बाबतचे विवरणपत्र (जमिनीचा ७/१२ खरेदी खत)
वैधानिक कागदपत्रे -
कर्जमंजुरी नंतर खालील प्रमाणे वैधानिक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा कार्यालयात करावी लागेल.
कर्जवसुली -
कर्जवसुली चेक घेतल्यानंतर पुढील महिन्यापासून वसुली सुरु होईल. कर्जवसुलीमध्ये कसुरदार लाभार्थीवर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
युवा स्वावलंबन योजना
कर्ज मर्यादा : रुपये २५ लाख
वय मर्यादा : १८ ते २५ वर्षे
व्याज दर : रुपये ५०००० पर्यंत ५ %
रुपये ५०००० ते रुपये ५ लाख पर्यंत ६%
रुपये ५ लाखाच्यावर ८ %
महिलांना १% सुट
कर्ज परतफेड : १० वर्षे पर्यंत
कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज मागणी अर्ज (रु.५ लाखापर्यंत २ प्रती व त्यावरील प्रकरण
असल्यास ३ प्रती )
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्याचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
वयाचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/ एस.एस.सी.बोर्ड. प्रमाणपत्र/ जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र / आधारकार्ड (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे ) यापैकी कोणतेही एक
सक्षम वैद्यकीय प्राधीकारांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित सत्यप्रत)
प्रस्तावित व्यवसायासंबंधींचे प्रमाणपत्र
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/ समाज कल्याण ओळखपत्र /पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक
तीन पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो
जातीचे प्रमाणपत्र (अनिवार्य नाही )
अ) व्यवसायाच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा नमुना नं.८/ करपावती/ सिटी सर्वे उतारा/ भाडेपावती
ब) जगाधार्काचे नोटरी केलेले संमतीपत्र /भाडेकरार रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर (Affidevit/ प्रतिज्ञापत्र)
कुठल्याही बँकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र
वाहन कर्ज करिता वाहन परवाना धारकाचे पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसायात मदत करण्याचे/ वाहन चालविण्याचे रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र
व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (Project Report)
व्यवसायाच्या मालाचे सविस्तर दरपत्रक/ कोटेशन (दिनांकासहित)
पशुपालन व्यवसायासाठी पशु वैद्यकीय सेवा प्राप्त असल्याबाबतचा दाखला
शेतीविषयक कर्जासाठी अर्जदाराच्या नावे असणाऱ्या जमिनीचा ७/१२ चा उतारा व ८ अ चा उतारा
शेती व्यवसायासाठी पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर, पाईपलाईन )
मतीमंद सेरेब्रल पाल्सी /ओटीझाम अर्जादाराकरिता जिल्हा लोकल लेव्हल कमिटी द्वारा प्रमाणित केलेला कायदेशीर पालकत्वाचा दाखला, मतीमंद व्यक्तीसह कुटुंबाचा एकत्रित फोटो ३.
मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे.
सर्व झेरॉक्स प्रती अर्ज दाराने स्वत: साक्षांकित करणे आवश्यक आहे
विवाह नोंदणी दाखला/विवाहानंतर नावात बदलाबाबत प्रतिज्ञापत्र/ नावात बदलाचे गेझेट (विवाहित महिला अर्ज दारासाठी)
मानसिक विकलांग (मनोरुग्ण), सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न (ऑटीझम) अशा अपंगांसाठी स्वयंरोजगार योजना
कर्ज मर्यादा : रुपये १० लाख
कर्ज देताना त्यासाठी करावा लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांना खालील व्याक्तीमार्फात कर्ज मिळवता येईल.
मनोरुग्णाचे आई-वडील
मनोरुग्णाचे सहचर (पती अथवा पत्नी)
कायदेशीर पालक
कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र
मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्या बाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
अपंगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत /आधार कार्ड /पॅन कार्ड किंवा अपंग ओळखपत्र
पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो (अर्जावर चिकटवण्यात यावेत)
जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाड्याची असल्यास भाडे करार नामा )
कर्जबाजारी/ वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल रु.३ लाख पर्यंत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल
दरपत्रक
मतीमंद सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम अर्जदाराबाबत पालकत्वाचा दाखला
मतीमंद सेरेब्रल पाल्सी/ ऑटिझम अर्जदाराकरिता जिल्हा लोकल लेव्हल कमिटी द्वारा प्रमाणित केलेला कायदेशीर पालकत्वाचा दाखला, मतीमंद व्यक्तीसह कुटुंबाचा एकत्रित फोटो ३
मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे
वैधानिक कागदपत्र
नमुना क्र.
१. स्थळपाहणी
२. जमीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी.पी. नोट
५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर )
६. जामीन करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
७. तारण करारनामा ( १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
मतीमंद व्यक्तींच्या पालकांचा संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना
प्रकल्प मर्यादा: कमाल रुपये ५ लाख पर्यंत
अशासकीय संस्थेचा सहभाग: प्रकल्प किंमतीच्या ५ %
पालक संस्थेची नोंदणी निदान ३ वर्षे आवश्यक
कर्ज परत फेडीचा कालावधी: १० वर्षे
सुरक्षा: एकूण मंजूर रकमेच्या २५% रक्कम एन.एच.एफ.डी.सी.च्या नावे
मुदत ठेव स्वरुपात तारण किंवा ४०% रक्कम साम्पश्विक (Collateral)
संस्थेमध्ये कमीत कमी ५ सभासद आवश्यक
वार्षिक व्याजाचे दर: रुपये ५००००/- पर्यंत ५%
रुपये ५००००/-ते रुपये ५ लाखा पर्यंत ६%
पालक संस्था तीन वर्षापूर्वी अधिकृतरित्या नोंदणीकृत असावी
संस्थेत कमीतकमी ५ पालकांचे कार्यकारी सदस्यत्व असावे
संस्था कोणत्याही केंद्र शासन, राज्य शासन, वित्तीय संस्थान बँक यांच्या द्वारे वित्तीय क्षेत्रात बहिष्कृत नसावी
कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज मागणी अर्ज (रु. ५ लाखापर्यंत २ प्रती व त्यावरील प्रकरण
असल्यास ३ प्रती )
संस्था नोंदणी प्रमाणपत्र
संस्था निवेदन (मॅमोरॅन्डाम)
संस्थाचे उद्देश
कार्यकारी सभासद यादी
आमसभा ठराव (बैठक क्र.)
मागील तीन वर्षात संस्थेद्वारा अपंगांसाठी केलेल्या कार्याचा तपशील अहवाल
कोणत्याही वित्तीय संस्थान/ राज्य किंवा राष्ट्रीय सरकार मान्य संस्थान/ अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थान कडून घेतलेल्या अर्थ सहाय्य बाबत माहिती
संस्थाद्वारे कर्ज स्वरुपात अर्थ सहाय्य पुरवठा करण्यात येणाऱ्या लाभार्थींची यादीत नमूद विषय, नाव, पत्ता, वय, जात, अपंग टक्केवारी, ग्रामीण किंवा शहरी वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचा तपशील, लाभार्थिद्वारा मागणी केलेली रक्कम
संस्थेचा मागील तीन वर्षाचा अधिकृत लेखा अहवाल
संस्थेचे पॅन कार्ड, बँक खाते, पासबुक, जागेबाबतचे कागदपत्र यांचे साक्षांकित सत्यप्रत
टीप:-
वैधानिक कागदपत्रांची पूर्तता नियमानुसार करावी लागेल.
अपंग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना
प्रकल्प मर्यादा: रुपये १० लाख पर्यंत
लाभार्थींचा सहभाग: ५%
राज्य महामंडळाचा सहभाग: ५%
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग: ९०%
वार्षिक व्याजदर:
रुपये ५ लाखापर्यंत पुरुषांसाठी ६%
महिलांसाठी ५%
रुपये ५ लाखांच्या पुढे: ७%
कर्ज परत फेडीचा कालावधी: ५ वर्षे
मंजुरी अधिकार: ५ लक्ष पर्यंत म.रा.अं.वि.महा.मुंबई व ५ लक्ष नंतर NSHFDC
कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज अर्ज २/३ प्रती मध्ये खालील साक्षांकित सत्यप्रत कागदपत्रासह
१५ वर्ष महाराष्ट्र वास्तव्य केल्या बाबतचा दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र तहसीलदार प्रमाणित
वयाचा/ शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्या बाबत कागदपत्र
अपंगत्वाचा दाखला सिव्हील सर्जन प्रमाणित
अनुभव प्रमाणपत्र अपव्यय जोडावा
निवडणूक आयोग व आधार ओळखपत्र
३/२ पासपोर्ट व पूर्ण आकाराचे फोटो
अर्जदाराच्या नावे जमीन/ शेती असण्याबाबत चा पुरावा ( ७/१२ व ८ अ चा उतारा )
व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थान चा नाहरकत दाखला (उदा ग़्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद) सचिव /मुख्याधिकारी द्वारा प्रमाणित
व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report) व दरपत्रक (Quotation)
कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (Affidavit) १००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर
पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर पाईपलाईन) या करिता
वैधानिक कागदपत्रे
नमुना क्र.
१. स्थळ पाहणी
२. जमीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी. पी. नोट
५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
६. जमीन करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
७. तारण करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
अपंग कर्मचारी/उद्योजक यांचेसाठी सहाय्यक साधनांसाठी कर्ज योजना