1 उत्तर
1
answers
माझ्या मित्राला आधार कार्ड काढायचे आहे पण कोणतेही कागदपत्रे नाही काय करावे?
6
Answer link
UIDAI च्या आधार एनरोलमेंट फॉर्मनुसार, जर कोणाकडे प्रूफ ऑफ आयडेंटिफिकेशनसाठी कागदपत्र नसेल तरी ती व्यक्ती आधार कार्डासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी एकतर कोणी परिचयदाता किंवा कुटुंबातील सदस्याची आवश्यकता असते.
जर कोणाकडे अधिकृत ओळखपत्राचा पुरावा नसेल तरी तो आधार कार्डासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याचं नाव त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका कागदपत्रावर असावं लागतं. उदाहरणार्थ, रेशन कार्ड (शिधापत्रिका). पण यासाठी हे अनिवार्य आहे की आधी कुटुंबप्रमुखाने आधार कार्ड बनवावं. त्यानंतर तो प्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा परिचयदाता होऊ शकतो.
परिचयदात्याने आपलं ओळखपत्र सोबत घेऊन जावं. केंद्रावर तो सदस्यही स्वत: उपस्थित हवा. दोघांमधील नातं दाखवणारं कोणतंही कागदपत्र हवं. या नात्याच्या पुराव्यासाठी पुढील विविध प्रकारच्या कागदपत्रांची यादी सरकारने दिलेली आहे.
१) पीडीएस कार्ड
२) मनरेगा जॉब कार्ड
३) ईएसआयसी मेडिकल कार्ड
४) पेंशन कार्ड
५) आर्मी कँटीन कार्ड
६) पासपोर्ट
७) जन्मदाखला
८) केंद्र किंवा राज्य सरकारचं फॅमिली एन्टायटलमेंट कागदपत्र
९) फॅमिली एन्टायटलमेंट डॉक्युमेंट
१०) पोस्टाचं अॅड्रेस कार्ड
११) रुग्णालयाचं डिस्चार्ज कार्ड
१२) खासदार,आमदार, नगरसेवक किंवा गॅजेटेड अधिकाऱ्यांद्वारे दिलेलं फोटो प्रमाणपत्र
१३) सरपंचाने दिलेलं फोटो प्रमाणपत्र
परिचयदाता म्हणजे अशी व्यक्ती जिला रजिस्ट्रारद्वारे अशा निवासींसाठी सत्याधारित प्रत देण्यास नियुक्त केले जाते ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही. परिचयदात्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, शिवाय अशा व्यक्तीला आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहणेदेखील अनिवार्य आहे.